राज्यसेवा च्या ६ मुख्य परीक्षा दिलेला एक प्रामाणिक विद्यार्थी श्री.योगेश नवले सांगतोय ,
जर परीक्षेचा पॅटर्न वर्णनात्मक (Descriptive) राहिला, तर दर सहा महिन्यांनी आंदोलने होतील आणि पेपर पुन्हा तपासणीसाठी (Rechecking) पाठवले जातील. हा सर्व गोंधळ आणि अ��िश्चितता थांबवण्यासाठी लवकरात लवकर वस्तुनिष्ठ (Objective) पॅटर्न लागू झालाच पाहिजे.
@yogsara
@GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @Liberal_India1 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RahulAsks
एक गोष्ट नक्की जाणवली आहे,नुकतंच ग्रॅज्युएशन झालेले आणि MPSC वर प्रोफाईलसुद्धा न बनवलेले जे नवखे तरुण विद्यार्थी आहेत, त्यांना डिस्क्रिप्टिव्ह क्लासवाल्यांकडून (फक्त पैशांसाठी) भलतंच घाबरवलं जातंय! "ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न परत आला तर तुमचं काही होणार नाही, त्यांनी १० हजार MCQ रटलेले आहेत, तुम्ही स्पर्धेत टिकूच शकणार नाही," असला फुकटचा ड्रामा सुरू आहे.
मग मला अशा विद्यार्थ्���ांना आणि त्या सरांना एकच विचारायचंय... तुमचे हेच शिक्षक कालपर्यंत याच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने शिकवत होते ना? आणि दाव तर असा करायचे की "माझ्याच नोट्समधून १५० पैकी १५१ प्रश्न आले!" मग हे शिक्षक कधी ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा सोडा, ग्रुप-C ची क्लर्क तरी का पास होऊ शकले नाहीत? त्यांना तर पाठ असतील ना ते १० हजार MCQ?
आणि विद्यार्थ्यांनो, एक साधा हिशोब लावा—प्रीलिम्स तर आधीपासूनच MCQ बेस्ड आहे ना? जर १० हजार MCQ रटलेल्यांसमोर तुमचं काहीच चालणार नसेल, तर मग तुम्ही आयुष्यभरात कधी प्रीलिम्स तरी पास होऊ शकाल का?
मला अशा दुकानदारी चालवणाऱ्या शिक्षकांना हात जोडून विनंती करायची आहे—पैशांच्या लालसेपोटी या तरुण मुलांचं ब्रेनवॉशिंग करणं आता थांबवा! स्वतःच्या स्वार्थासाठी 'Gen Z' सारखे शब्द वापरून विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका... पाप लागेल तुम्हाला.
@GaneshgSpeaks @phoenixiasbyNS @BaliramDoleyINC
MPSC चे माजी अध्यक्ष श्री. सुधीर ठाकरे यांनी आयोगात सर्वात मोठे सुधारणात्मक निर्णय (Reforms) आणले आहेत:
१. वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षा पद्धत: परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ते वस्तुनिष्ठ पॅटर्न सुरू करतात.
२. मुलाखतींसाठी कोडिंग सिस्टम (Coding System): मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला एक गुप्त कोड दिला जातो. त्यामुळे मुलाखत पॅनेलला उमेदवाराचे नाव, आडनाव, जात किंवा गाव यांपैकी काहीही माहित नसते.
अशा प्रकारची कोडिंग सिस्टीम UPSC किंवा भारतातील इतर कोणत्याही लोकसेवा आयोगात नाही. त्यामुळे श्री. सुधीर ठाकरे सर हेच खरं तर MPSC मधील 'सुधारणांचे जनक' (Father of Reforms) आहेत.
@GaneshgSpeaks@BaliramDoleyINC
आमचे 1/2/3/4/5 आंदोलन नाही = एकच आंदोलन आहे आमचे S.M. जोशी पुलावर
🔥अध्यक्ष राजीनामा ☑️
🔥Objective 2027☑️
🔥70 हजार मेगाभरती =mpsc गट क 2026 मध्ये 25हजार पदे (technical +non technical) add करा तात्काळ ☑️
या प्रमुख 3 मागण्या वर आम्ही ठाम आहोत
(बाकी राजकारण आम्हाला जमत नाही)
मी आंदोलनाची वेगळी चूल का मांडली?" —
श्री नितीन अंधाळे.
हाच तो नितीन अंधाळे वाघ 🐅, ज्याने कालपर्यंत मागे पडलेला 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न'चा मुद्दा आज पुन्हा केंद्रस्थानी आणून ठेवला आहे... 🔥
आमचा राजीनाम्याच्या मुद्द्याला कोणताही विरोध नाही, पण आमच्या विद्यार्थ्यांना 'झुंडशाही' म्हणणाऱ्या दिल्लीप्रेमी शिक्षकांना आमचा ठाम आणि स्पष्ट विरोध आहे!🔥
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न २०२७
अहिल्या लायब्ररी,पुणे
OBJECTIVE 2027 🔥
@RRPSpeaks@Ni3KumarSpeaks@GaneshgSpeaks@BaliramDoleyINC
Sunday Wisdom!'चांगले'?अधिकारी निवडीसाठी "वर्णनात्मक की वस्तुनिष्ठ मुख्य परीक्ष��" ही चर्चाच मुळी अप्रस्तुत.परीक्षेेतूून साध्य करावयाच्या उद्दिष्टांवर तीच्या स्वरूपाची प्रासंगिकता अधोरेखीत."आधुनिक तंत्रज्ञानाचे युग व नागरिकांच्या बदललेल्या आकांक्षाची सत्वर पूर्ती" यास्तव सुयोग्य व्यक्तीची तत्परतेेने निवड करणे व वर्णनात्मक उत्तरपत्रिकांंच्या मुल्यांकनातील आव्हानांवर मात करण्याचे उद्देेशाने,यापूर्वी #MPSC ने स्विकार��ेल्या पर्यायी परीक्षा योजनेत कालसुसंगत सुधारणा करत पुुढे जाण्याऐवजी आभासी अपेक्षांच्या उद्देेशाने,जुन्या परीक्षा योजनेतील वैकल्पिक विषयांचा नव्याने केलेला अनावश्यक प्रयोग, उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनावर झालेले आरोप व त्यामुुळे करावे लागलेले फेरमुल्यांकन,यांत कोलमडलेेल्या नियोजनाची झळ सर्वांनाच.
'पाठांंतर करून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे' क्लास चालकांच्या अशा विस्मयकारक दाव्याला व्यावसायिक हीतसंबंधाची किनार तर विशिष्ट परीक्षा पद्धतीच्या लाभार्थी वर्गांचा त्या परीक्षा पद्धतीसाठी असलेला आग्रह हा समजण्याजोगा.
वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या मुुल्यांंकनात वेगवेगळ्या परीक्षकांंनी दिलेल्या गुणांमधील तफावत केवळ स्पर्धा परीक्षांपूरती मर्यादित नव्हे तर ती विद्यापीठीय परीक्षांमधे सुद्धा. तद्वतच विशीष्ट विद्यापीठांत गुणदान करतांंना परीक��षकांंचा हात सैल तर अन्य विद्यापीठांत तो आखडता याचीही बर्याच���ा प्रचिती.असाच अनुुभव भिन्न विद्याशाखांतील विषयांतही. काही विषयांत नुसतीच भूमिका बांधणीचा फाफट पसारा तर काही विषयांत मुद्द्यांच्या नेमकेपणाला अनन्य साधारण महत्व.अशा कारणांमुळे येणाऱ्या गुण तफावतीची तिव्रता कमी करण्यासाठीच तर स्पर्धा परीक्षांत वैैकल्पीक विषयांतील गुणांचे सामान्यीकरण.
मुल्यांकनाच्या गुणवत्तेेतील "तटस्थता व अचूकता" या निकषांवर मात्र बहुुपर्यायी 'वस्तुनिष्ठ' ���रीक्षा पद्धत 'वर्णनात्मक' परीक्षा पद्धतीवर निर्विवाद श्रेष्ठ!
Objective objective aniObjective पाहिजेच Boss 💯..
ते पण 2027 पासून हवी 👍...
बाकी सगळे Descriptive साठी उघड भूमिका घेताहेत. मग मुल��ंना Objective साठी काही अडचण नसावी 💯...
MPSC विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून त्यांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेण्यासाठी आज अहिल्या अभ्यासिका, पुणे येथे सायं 4:30 वाजता उपस्थित असणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल.
#MPSC#MPSCStudents#MPSCProtest
आम्हाला ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ) परीक्षाच हवी आहे! याचे मूळ कारण म्हणजे पारदर्शकता, आणि कार्बन कॉपी हेच आमचे ढाल आणि कवच-कुंडल आहे!
असला कोणताही बिनकामाचा ५०% ऑब्जेक्टिव्ह आणि ५०% डिस्क्रिप्टिव्ह हायब्रिड पॅटर्न आम्हाला मुळीच खपवून घेतला जाणार नाही! ही आमची अंतिम आणि स्पष्ट मागणी आहे.
आम्हाला जुन्या ९०:१० च्या रेशोनुसारच परीक्षा हवी आहे! जसे २०२४ पर्यंत लिखित परीक्षेच्या एकूण ८०० गुणांपैकी ७०० गुण ऑब्जेक्टिव्ह आणि १०० गुण डिस्क्रिप्टिव्ह असायचे, तसेच झाले पाहिजे!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nikhil_A_Patil@BaliramDoleyINC@Nikhil_A_Patil
आदरणीय IAS व्ही. राधा मॅडम,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) क्षेत्रात अभ्यास करताना महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी वर्गात आपले नाव नेहमीच आदराने ऐकायला मिळते. आपली कार्यपद्धती, आपले प्रशासन आणि काम करण्याची शैली एमपीएससीच्या वर्तुळात अत्यंत मानली जाते. आम्ही आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनाच आमचा आदर्श मानून प्रामाणिकपणे अभ्यास करतो.
आज संपूर्ण भारतात कुठेही झाली न���ेल अशी 'व्ही. राधा समिती' स्पर्धा परीक्षेच्या सुधारणांसाठी स्थापन झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मागण्या अत्यंत मन लावून ऐकून घेतल्या आणि प्रत्येकाला आपले मत मांडण्याची पूर्ण संधी दिली, याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत.
आता या समितीसमोर संपूर्ण महाराष्ट्रातून एकच आवाज ९५% गुंजत आहे—तो म्हणजे 'वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) परीक्षा पद्धत' राज्��सेवा, अभियांत्रिकी, अन्न व औषध प्रशासन (FSO), आणि कृषी सेवा या सर्व परीक्षांना लागू करण्यात यावी.
आदरणीय मॅडम, २०२५ च्या मुख्य परीक्षेचे निकाल वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीने तपासल्यानंतरही रद्द झाले आणि मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरलेले विद्यार्थी अत्यंत निराश झाले. म्हणूनच आमच्या ९९% विद्यार्थ्यांची हीच नम्र मागणी आहे की, २०१२ ते २०२४ या काळात अत्यंत यशस्वीपणे चाललेली 'ऑब्जेक्टिव्ह पद्धत' पुन्हा लागू करण्यात यावी आणि परीक्षेची प्रक्रिया पूर्वीसारखी सोपी व पारदर्शक कराव���.
रहीला प्रश्न वर्णनात्मक (Descriptive) ज्ञानाचा, तर निवडीनंतर 'यशादा' (YASHADA) या प्रीमियम संस्थेत २ वर्षांचे प्रशिक्षण असते. तिथे 'MA in Development Administration' नावाचा ४ सेमिस्टरचा कोर्स पूर्ण करावा लागतो, जो पूर्णपणे वर्णनात्मक स्वरूपाचा असतो आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी ६०% गुणांची अट असते.
आपणास हीच नम्र विनंती आहे की, ज्याप्रमाणे २०१२ मध्ये एमपीएससीचे माजी अध्यक्ष आदरणीय सुधीर ठाकरे साहेबांनी आमच्यासाठी क्र��ंती घडवून आणली होती, तशीच क्रांती आता आपणही २०२७ पासून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करून घडून आणावी.
एमपीएससीच्या क्षेत्रातील लाखो प्रामाणिक विद्यार्थी आपले हे योगदान नेहमी लक्षात ठेवतील आणि महाराष्ट्र प्रशासनाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहिले जाईल.
आपले नम्र विद्यार्थी,
एमपीएससी परीक्षार्थी, महाराष्ट्र.
@Nikhil_A_Patil @GaneshgSpeaks
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @EA_OfficialMH @BaliramDoleyINC