राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांना आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरतीबाबत खुले पत्र पाठविले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीची आश्वासने दिली जात आहेत, मात्र जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे हजारो पदे रिक्त असून लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. ग्रामीण आरोग्य सेवेलाही याचा मोठा फटका बसत आहे.
शासनाने तात्काळ आकृतिबंध मंजूर करून सेवा प्रवेश नियमावलीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि आरोग्य विभाग पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी.
उमेदवारांच्या संयमाची परीक्षा आता थांबवा!
@abitkar_prakash@INCHarshsapkal@mieknathshinde@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis
#ArogyaBharti #MaharashtraJobs #स्पर्धापरीक्षा #आरोग्यविभाग #YouthEmployment
#DhananjayShinde #Dhananjay_Shinde
आरोग्य विभाग भरतीबाबत केवळ आश्वासने,पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल नाही. आकृतिबंध मंजुरी व सेवा प्रवेश नियम रखडल्याने हजारो उमेदवारांचे भविष्य अधांतरी.कृपया जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. @CMOMaharashtra@MahaDGIPR @MahaHealthIEC @MoHFW_INDIA@Dev_Fadnavis@abitkar_prakash
आरोग्य मंत्री @abitkar_prakash यांनी पदभरती ची घोषणा करून तीन महिने झाले परंतु अद्याप आरोग्य विभागाने याबाबत कसल्याही प्रकारचे Notification प्रसिद्ध केलेले नाही, आरोग्य विभाग पदभरती बाबत तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी नम्र विनंती@CMOMaharashtra
नगर परिषद सेवा प्रवेश नियम मध्ये आरोग्य सहायक या पदासाठी 2 वर्षे अनुभवाची जाचक अटी मुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहणार आहे. अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
कृपया सदरील अट रद्द करण्यात यावा
@mieknathshinde@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Dhananjay4INC@AbhiPawarBJP
नगरपरिषद संचालयनाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून देखील अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. @mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
राज्यातील आरोग्य विभागात हजारो पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने सार्वजनिक आरोग्यव्यवस्था ढासळत आहे. रुग्णालयांत कर्मचारीअभावाची तीव्र तक्रार आहे, तर दुसरीकडे हजारो सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आणि आरोग्यमंत्री @abitkar_prakash यांनी तातडीने आरोग्य भरती प्रक्रिया पूर्ण करून राज्याच्या आरोग्य यंत्रणेला बळ द्यावे आणि बेरोजगारांना न्याय द्यावा, ही विनंती !
@INCHarshsapkal@INCMaharashtra
#आरोग्यभरती_लवकरात_लवकर
#ArogyaBharti
#महाराष्ट्रसरकार
#रोजगार
#आरोग्यसेवा
#Maharashtra
महिला व बाल विकास विभागाचा प्रोबेशन ऑफिसर या पदाचा पेपर फुटला आहे.
फेब्रुवारी 2025 या महिन्यात या पदाची परीक्षा @TCS ने घेतली होती. पेपर ऑनलाइन होता आणि पेपर सुरू असतानाच मायक्रो कॅमेरे द्वारे फोटो काढण्यात आले ते फोटो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीस प्राप्त झाले आहेत. पेपर फुटला हे 100% यावरून सिद्ध आहेच प्रश्न हा आहे की हे आता पर्यंत बाहेर आले नव्हते म्हणजे कोणालाच याबाबद शंका नव्हती असे प्रकार किती पेपर मध्ये झाला असेल आणि मुले बोगस रित्या लागली असतील याचा विचार न केलेला बरा. आम्ही सरकारला वारंवार सांगतोय पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत तरी सरकारला एकही पेपर वाचवता आला नाहीये. प्रत्येक पेपर फुटतच आहे अजून काय पुरावा पाहिजे या बोगस सरकारला. निष्क्रिय गृहमंत्री आणि निष्क्रिय सरकार यांना मुलांच्या भविष्याच काहीच घेणे देणे नाहीये. सर्व कारभार राम भरोसे आहे याना या खाजगी कंपन्याकडून बक्कळ पाकिटे मिळत असतील म्हणून या बोगस खाजगी कंपन्या आमच्या माथी मारल्या आहेत. @mpsc_office आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार आहे पण बोगस सरकारला पाकीट कोण देणार न.
@iAditiTatkare बघा आपल्या खात्याचा पेपर कसा फुटला आहे ते. ही मुलगी फक्त पेपर बाहेर काढण्याचे काम करते. लागणाऱ्या मुली दुसऱ्याच आहेत. या टोळी विषयी आम्हाला सर्व माहिती आहे जर सरकारची इच्छा असेल तपास करण्याची तर आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहोत पण माय बाप सरकार सर्व परीक्षा लवकरात लवकर MPSC कडे द्या.
@DGPMaharashtra पोलिस यंत्रणा खूप निष्क्रिय आहे त्यांना पेपर फुटीचा तपास करता येत नाही आणि आरोपी तर पकडताच येत नाही. फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्या पासून पेपर फुटीचा 200 घटना झाल्या आहेत एक पण तपास पूर्ण नाहीये. हजारो आरोपी फरार आहेत. काही आरोपी तर फरार असून पण बोगस रित्या सरकारी नोकरीस लागले आहेत. काही तरी उपाय योजना करा सर्व गुन्हे एकत्र करून तपास करा आणि एक तपास करण्यासाठी स्पेशल विभाग तयार करा. तुमच्या नाकावर हे पेपर फोडत आहेत आणि मुलांच्या आयुष्याचे वाटोळे करत आहेत. बघा जमत असेल तर.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@Aple_Sarkar@AjitPawarSpeaks@abpmajhatv@zee24taasnews@mataonline@LoksattaLive@GondaneDevesh@SakalMediaNews@waglenikhil@anjali_damania@gajabhauX@RRPSpeaks@AUThackeray@satejp@INCHarshsapkal@Dhananjay4INC@degree_holders
📢 #MahaTransco LDC / Manager परीक्षेला ६० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही निकाल प्रकाशित झालेले नाहीत.
हजारो विद्यार्थी पारदर्शक निकालाची वाट पाहत आहेत.
आम्ही @mahatransco आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर LDC निकाल प्रकाशित करावा. #JusticeForAspirant
प्रति,
मा. सौरभ राव
आयुक्त,
ठाणे महानगरपालिका,
ठाणे.
विषय: सरळसेवा भरती २०२५ मध्ये स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र लागू करण्याबाबत.
महोदय,
ठाणे महानगरपालिका सरळसेवा भरती २०२५ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक व मल्टी पर्पज वर्कर (आरोग्य सेवक) या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अटींमध्ये MSBSVT (महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ) चे स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र मान्य करण्यात यावे, ही परीक्षार्थींची मागणी आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची ही भरती असल्याने महाराष्ट्र राज्य मंडळाचे प्रमाणपत्र वैध मानणे हे न्याय्य आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी MSBSVT कडून अधिकृतरीत्या स्वच्छता निरीक्षक प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या हक्काचे संधीसमान्यत्व अबाधित ठेवणे आवश्यक आहे.
त्यामुळे, या भरती प्रक्रियेत MSBSVT च्या प्रमाणपत्राला शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यता देण्यात यावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@INCHarshsapkal@TMCaTweetAway@MPLodha
#स्वच्छता_निरीक्षक
#Sanitary_inspector