माननीय कॅबिनेट मंत्री @SanjayDRathods साहेब यांनी दिनांक २९ जुलै रोजी सदरील ट्विट करून आकृतीबंध शासन निर्णय तत्काळ प्रसिद्ध करून नोकरभरती करण्यात यावी सांगितले आहे, आज २२ सप्टेंबर आहे अद्याप ना जाहिरात प्रसिद्ध झाली ना आकृतीबंध.
@naikindranil@SanjayDRathods@CMOMaharashtra
📍रिक्त 3 लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज तर आहेच परंतु रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे रिक्त पदांची पदभरती लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती 🙏.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
जलसंधारण पदभरतीबाबत मृद व जलसंधारण मंत्री मा. संजय राठोड यांनी आतापर्यंत ९ वेळा घोषणा केल्या आहेत. पहिल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होत आले असले तरीही पदभरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. High Power Committee तसेच वित्त विभागाची परवानगी मिळालेली असतानाही विभाग कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे, हे न समजणारे कोडे ठरत आहे.
वाढते वय आणि वाढती बेरोजगारी यामुळे विद्यार्थी आधीच चिंतेत आहेत. त्यामुळे जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना विनंती आहे की पुढील #Cabinet बैठकीत मृद व जलसंधारण विभागाच्या नवीन आकृतीबंधाला मान्यता देऊन कृपया लवकरात लवकर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी आणि ती प्रक्रिया TCS मार्फत राबवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AbhiPawarBJP@SanjayDRathods
मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार मा. उमेशरावजी यावलकर यांना जलसंपदा आणि मृद व जलसंधारण भरती प्रक्रियांचे निवेदन देण्यात आले आणि त्यांच्याकडून संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना पाठवण्यात आले.
@SanjayDRathods@girishdmahajan@CMOMaharashtra
प्रवीण भैया दटके (आमदार) यांना प्रलंबित जलसंधारण पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी निवेदन दिले तसेच मंगळवारी कॅबिनेट मीटिंग वेळी मंत्रालयात संबंधित विभागाचे मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून पदभरती बाबत निवेदन देण्याची विनंती देखील केली.
#जलसंधारण_पदभरती@PravinDatke@SanjayDRathods
जलसंधारण विभागातील रिक्त पदांवरील भरतीचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती. अभियंते सातत्याने ‘इंजिनिअरिंग असोसिएशन’ च्या माध्यमातून मागणी करत असून, आंदोलन करूनही आजपर्यंत ठोस निर्णय झालेला नाही. वय वाढत आहे, बेरोजगारी वाढते आहे आणि हजारो अभियंते गंभीर चिंतेत आहेत.
राज्यातील सुशिक्षित अभियंत्यांच्या भविष्याचा विचार करून ही भरती तातडीने जाहीर करून वेळेत पूर्ण करावी, अशी आम्ही सरकारकडे ठाम मागणी करतो. उशीर म्हणजे अन्याय ठरणार आहे.
@CMOMaharashtra@SanjayDRathods