हा आहे पंचगंगेचं पाणी पिणारा कोल्हापूरचा पठ्ठ्या… विवेकानंद पाटील. #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रात्री एकटाच अडीच-तीन तास ‘बॅटिंग’ करत होता आणि सकाळीही जब्बर ‘टोलेबाजी’ केली. चौफेर वाचन, ग्रामीण आणि शहरी समज, सामाजिक-राजकीय परिस्थितीचा आवाका असलेला आणि प्रामाणिक… असे अनेक विद्यार्थी हे #MPSC ची तयारी करतात पण भ्रष्ट व्यवस्थेमुळं शेवटी त्यांच्या हाती केवळ निराशा येते. त्यामुळं #MPSC मधील भ्रष्टाचाराचं प्रमुख खोडच मुळासकट उपटून काढण्यासाठी हे विद्यार्थी सत्याग्रहाला बसले आहेत. एकदा भ्रष्टाचाराचं खोड हटवलं तर फांद्या आपोआप बाजूला होतात.. त्यामुळं भिमनवारांचा राजीनामा होईपर्यंत आता माघार नाही..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा__राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
जिल्हा परिषद भरती २०२३
३० कॅडर पैकी २५ कॅडर परीक्षा झाल्यात
मंत्रालयातून सर्व ZP ना पशुधन पर्यवेक्षक वगळता बाकी २४ पदांचे निकाल लावण्याचे आदेश दिलेत.
एक महिना झालाय तरी अजूनही ४-५ पदांच्या पुढे कोणत्याही ZP ने निकाल लावला नाही.
या आठवड्यात निकाल जाहीर करावेत.
@girishdmahajan
निकाल जाहीर करण्याचे आदेश दिल्यापासून एका महिन्यात #ZP भरती मधील 25 संवर्गापैकी जेमतेम फक्त 3-4 निकाल जाहीर केले.
परीक्षा होऊन 4-5 महिने झालेत.ही गती आहे ऑनलाईन परीक्षेची (#IBPS) ची व स्वयंघोषित गतिमान सरकार ची.
#ZP_Results@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
जिल्हा परिषद निकाल संथ गतीने देण्याचं काय कारण @girishdmahajan ?
5 वर्ष वाट पाहायला लावली तरी अजून नाटक सुरूच का?
उर्वरित ZP निकाल या आठवड्यात जाहीर करा.
#ZPRESULT
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@mpsc_office
मा. आयोग PSI 2022 निकाल काय मुहूर्त काढून लावणार आहात का?
काही अडचणी असतील निकाल लावण्यात तर त्या जाहीर कराव्यात....इतकं साधं सोपं असत ते.
आणि जर अडचणी नाहीत तर मग निकाल लावा पटकन....#PSIMAINS2022RESULT
Dear Ratan Tata ji, @RNTata2000
We are writing this open letter on the behalf of lakhs of competitive exam students from Maharashtra state. One of company "TCS_ION" under your Tata group of companies, going through crucial phase. Maharashtra govt. has appointed TCS ION as recruitment agency to fill various group-C/D post for state govt. TCS ION responsible to take online test of candidates, declair there answer sheet and marks. But TCS ION management failed to provide us trasnparent exam system.
During the recruitment of Talathi post, one of TCS ION exam center in Sambhaji Nagar (Aurangabad) district is being managed various paper leak rackets. Exam invigilator and other staff was caught red handed while providing answers through rough sheet to the some of candidates, but fortunately city police got a clue about it and they got arrested. TCS ION dont have exam centers across in all district of Maharashtra so they simply tie-up with local computer centers and appoint them as exam centre. But as per our info. some of private exam centres especially from Latur district is being managed my paper leak rackets. In return of lacs of money they are providing answers to selective candidates. Two members of TCS ION from latur centre is being arrested by police for providing answers to candidates. We have doubt that many more exam centers are there in Maharashtra which is being managed by diff. paper leak rackets.
We dont want pvt. exam centers to conduct our exam because the local center owner or staff can be managed easily for lacs of rupees. We want all our exams to be conducted in authoried TCS ION exam centers only, if you dont have enough exam centres we humbly request you kindly built such infrastructure and after that only conduct the exams. We are about to request Maharashtra govt. to blacklist TCS ION because your company failed to provide transparent exam system. TCS ION and its management have not taken any stern actions on it, even if future of lakhs of students was on stake.
We all Indians know, Tata group is patriotic and reputed buisness empire. You and your forefathers done a significant work for our nation but if we look at TCS ION, it seems your company lagging much to gain trust of lakhs of students. We request you to please take a look at TCS ION management, to see what's going wrong with your team. We hope you will take the right decision for lakhs of students of Maharashtra.
Yours sincerely,
All competitive exam students from Maharashtra
@TCS@vrswamy@TCSResearch @people_TCS @AnupamSinghal5@TataCompanies@AbKumar1@kramanuj@TCS_iON@KrishnanCA@Akhilesh_Global@TCS_Digital .
मा. देवेंद्र जी,
सर्व पुरावे देऊन देखील महसूल विभागाने आत्ताच थोड्या वेळापूर्वी तलाठी भरतीचा जिल्हा निहाय निकाल लावला आहे.
पेपरफुटी होऊन घोटाळा झाल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असून देखील सदोष नोकर भरती रेटून "तलाठी भरतीचा" निकाल लावण्याच्या सरकारच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या राज्यातील ८.५ लाख विद्यार्थ्यांवर सरकारच्या कृतीमुळे खूप मोठा "अन्याय" झाला आहे. २०१४ पासून आत्तापर्यंत आपल्या मुख्यमंत्री, गृहमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्रिपदाच्या काळात झालेल्या सर्वच परीक्षांमध्ये सदोष प्रक्रियेमुळे घोटाळे झाले आहेत. मंत्री या नात्याने या सर्व घोटाळ्यांची जबाबदारी आपली आहे. तलाठी भरती, म्हाडा, आरोग्य विभाग, वन विभाग, पोलीस विभाग आदी सर्वच विभागात घोटाळे करून आपण "संघ आणि भाजपाच्या" भ्रष्ट लोकांना सरकारमध्ये खालपासून वरपर्यंत भरण्याचा गुन्हा केला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
गेल्या १० वर्षांत प्रामाणिकपणेअभ्यास करून सरकारी नोकरर्यांचे स्वप्न बघणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील लाखो तरुण तरुणींची पिढी आपण उध्वस्त केली आहे.
आम्हाला आता रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने "सत्याग्रह" करण्याशिवाय पर्याय नाही.
जय महाराष्ट्र!
@AAPMaharashtra@waglenikhil@Dev_Fadnavis@rautsanjay61@AUThackeray@VijayWadettiwar@BJP4Maharashtra@NANA_PATOLE@iambadasdanve@Mpsc_Andolan@punyachiMPSC @degree_holders @RSSorg@SandeepPathak04@TulsidasBhoite@ameytirodkar@RavindraAmbekar@ashish_jadhao
गुन्हा दाखल करायचाच म्हटल्यावर कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. गुन्हा नोंद झाल्याची प्रत आता प्राप्त झाली आहे, अगदी क्षुल्लक कारणासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या सभांमध्ये एखाद्या चौकात स्टॉप घेऊन ०५-१० मिनिटांचे आतापर्यंत कितीतरी भाषणे झाली असतील पण कितींवर गुन्हे दाखल करण्यात आले? तुमचा आवाज म्हणून आम्ही काम करतोय, टार्गेट करून आमचाच आवाज बंद करण्याचे कारस्थान रचण्यात आलं आहे.
राज्यात कोणाचीही बेबंदशाही आणि मोघलाई चालणार नाही, घोटाळे करून नोकरीवर लागऱ्यांना पायघड्या अंथरूण नोकऱ्यांचे नियुक्ती पत्रे वाटण्यात येतील आणि इथं घोटाळे बाहेर काढणाऱ्या आमच्या सारख्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.
फडणवीस आणि विखे-पाटलांना आम्ही आज इशारा देतोय, भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास संविधनिक मार्गातील आंदोलनाने राज्यभर रान पेटवून देऊ.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@CMOMaharashtra@RRPSpeaks@VijayWadettiwar@AAPMaharashtra@abpmajhatv@Awhadspeaks @Dhananjay_AAP @LoksattaLive@KunalNitinRaut@ShivSenaUBT_@TV9Marathi@zee24taasnews
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल कवठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@KunalNitinRaut@girishkuber@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews
तलाठी भरती रद्द करण्यासाठी आपल्या एका भावाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, घरच्यांच्या प्रसंगावधणाने त्याचा जीव वाचला आहे.
आपली कोणतीही इंटेलिजन्स एजन्सी नसताना आपण सर्व विद्यार्थांच्या मदतीने आम्ही रोज पुरावे टाकतोय, तरीही सरकारकडून निर्णय होताना दिसत नाही. रस्त्यावरील आंदोलन आपण करूच पण आजच्या ट्विटर वॉर मध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती.🙏
👉आजचा ट्विटर हॅश टॅग : #तलाठी_भरती_रद्द_करा
आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा.
ठाणे जिल्हा तलाठी टॉपर
1) ऋषिकुमार दामोदर लोखंडे (208 मार्क)1st टॉपर
2) तेजश्री शिवाजी नवले (198 मार्क) 2nd टॉपर
तेजश्री यांचं हे माहेर च नाव आहे. त्यांचा सासरच नाव तेजश्री अमोल विधाते आहे. अमोल विधाते यांचे दाजी आहेत ऋषीकुमार लोखंडे.
या दोन्ही जणांचा स्पर्धा परीक्षा शी काडीमात्र संबंध नाहीये संबंध असा की अमोल विधाते हा tcs मध्ये काम करतो आणि याने यांना चिट्टी द्वारे पास केला.
@Dev_Fadnavis तुम्ही गृहमंत्री आहात ना मग या ऋषीकुमार ची चौकशी करा आणि सत्य बाहेर काढा. कळू द्या महाराष्ट्र ला tcs ने कसा घोळ केला आहे ते आणि सत्य समोर आले तर करून टाका परीक्षा रद्द आणि पारदर्शक एमपीएससी @mpsc_office आयोगाकडे देऊन टाका पेपर. Tcs ला काळया यादीत टाका
स्वीकारता का चॅलेंज गृहमंत्री साहेब?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RVikhePatil@maharevenue@TCS_iON@abpmajhatv@LoksattaLive@VijayWadettiwar@SVW790@PatilKailasB@RRPSpeaks@KunalNitinRaut@Awhadspeaks@rautsanjay61 @Dhananjay_AAP @lokmat@TV9Marathi@AAPMaharashtra@zee24taasnews
Normalisation बाबत कोणाच्या मनात काहीच शंका नाहीये तरीही यांनी त्यात पण घोळ केला त्या बाबत पोस्ट करूच पण ज्यांना कोणाला हे मार्क पडले आहेत ते त्या लायकीचे आहेत का? ज्यांनी आधी पेपर फोडले आहेत ते पेपर फोडण्याचा धंदा करतात त्यांना 200 प्लस मार्क आहेत आता हे 200 प्लस मार्क त्यांनी अभ्यास करून तर नसेल ना मिळवले. मुंबई पोलीस भरतीचा एक पेपर बाहेर आला होता तो पेपर 500 मुलांपर्यंत गेला होता. तलाठी च किती गोधळ झाला आहे. विद्यार्थ्यांना वेड्यात काढायचे बंद करा. तलाठी भरती रद्द करा आणि ती एमपीएससी मार्फतच घ्या. बस झाले या सरकारचे लाड.
@Dev_Fadnavis@maharevenue@CMOMaharashtra@RRPSpeaks@abpmajhatv@AAPMaharashtra@KunalNitinRaut@VijayWadettiwar@SVW790@satyajeettambe
फडणवीस एकीकडे म्हणताय परीक्षा पारदर्शक घेतली दुसरकडे असं पण म्हणताय पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू.
तर ठीक आहे पुरावाच बघाच.
हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून एका उमेदवाराने पेपर फोडून बाहेर पाठविला. ती प्रश्न पत्रिका संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आली होती, तेथील TCS ION परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरून सेटिंग लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या आसनापर्यंत जाऊन प्रश्नांची उत्तरे पुरविली. पण त्या सर्वांचे बिंग फुटले आणि तपासात या गोष्टी समोर आल्या. पण फोडलेला पेपर अनेक ठिकाणी पाठविला असण्याची शक्यता आहे, फक्त त्याच केंद्रावरील पर्यवेक्षकाला अटक झाली, इतर ठिकाणचे काय? इतर परीक्षा केंद्र सुद्धा मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तलाठीच्या कट-ऑफने मोठी उंची गाठली आहे.
तलाठी पेपर फुटल्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणजे सर्वांनी समजून जावे याचे तार कुठवर जोडले गेले असतील. तलाठी परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर परीक्षा रद्द करून तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार संतप्त आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास सबंध महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@maharevenue@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RVikhePatil@RRPSpeaks@AAPMaharashtra@KunalNitinRaut@LoksattaLive@lokmat@abpmajhatv@PatilKailasB@TV9Marathi@mataonline@INCMaharashtra@PawarSpeaks