व्यक्त होत रहा. मुद्दा महत्वाचा आणि रास्त असेल तर त्याची दखल नक्की घेतली जाते, ही सोशल मिडिया ची ताकत आहे.
मी आज सकाळी सकाळी केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी वरील आदेश tweet केला होता.
धन्यवाद @RRPSpeaks@kolhe_amol@Devdattanikam
तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला.
31 मार्च पर्यंत लागू असलेली कांदा निर्यात पुढील आदेशापर्यंत वाढवली आहे.
@sdsurvase@suvishelke@SandeepTikate
केंद्र सरकारच्या वेबसाईट वर अधिक माहिती दिली आहे.
https://t.co/eJz19vlFrP
गोकुळच्या निमित्ताने एवढेच
हुकूमशाही कितीही ताकदवान असली, तरी तिचा अंत एक दिवस निश्चित असतो… कारण सत्ता कायमची नसते, पण जनतेचा आवाज कधीच संपत नसतो
२०२९ ला हा चेहरा तुमची हुकुमशाही संपवेल
फक्त हा चेहरा लक्षात ठेवा
🔥🔥
@satejp
गोकुळ वरती राज्य शासनाकडून 4 संचालक नेमणे म्हणजे सामान्य जनतेच्या भावनेचा, त्यांनी दिलेल्या निकालाचा अनादर करणे असच आहे.
जनतेनं निवडून दिलं नाही तरी सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे भाजपचा.
ही एक प्रकारची वोट चोरीच आहे.
@satejp
आहे त्या धरणांमधील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवता येऊ शकते. त्यातून उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर करून विकासाचे प्रकल्प राबवता येऊ शकतील.
विकासाच्या नावाखाली जंगलांची कत्तल करण्यापेक्षा, आधीपासून असलेल्या जलस्रोतांचा विकास का करू नये? 🌳💧
निसर्ग वाचला पाहिजे!
#SaveBhimashankar
खरं तर मी स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो आणि आजही मला स्पष्टच बोलायचं आहे.
सतेज दादा पाटील यांची स्तुती करताना इतर नेत्यांनी कोल्हापुरात नेमकं काय घडलं, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
कोल्हापुरात जवळपास ९८ मतं रद्द करण्यात आली. अन्यथा सतेज पाटील यांच्या आणखी आठ जागा निवडून आल्या असत्या, असं सांगितलं जातं. म्हणजेच, २१-४ असा निकाल लागून संपूर्ण गोकुळवर बंटी पाटील यांचं वर्चस्व निर्माण झालं असतं, अशी चर्चा आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरू असताना सतेज पाटील साहेब तिथे ठामपणे उपस्थित राहिले. मतदानाचा आणि निकालाचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्यांनी मैदान सोडलं नाही. अखेर १३-१२ असा निकाल त्यांच्या बाजूने लागला.
यातून इतर नेत्यांनी एक महत्त्वाचा धडा घेण्याची गरज आहे.
राजकारणात केवळ भाषणं करून किंवा सोशल मीडियावर भूमिका मांडून चालत नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून, घटनास्थळी उपस्थित राहून आणि प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून संघर्ष करावा लागतो.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मतदान प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्या वेळी मतदान केंद्रापासून फार दूर नसतानाही ठाकरे यांनी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवायला हवं होतं, असं मला वाटतं. ते वेळेत तिथे गेले असते, तर कदाचित प्रशासनावर दबाव निर्माण झाला असता आणि परिस्थिती वेगळी असू शकली असती.
अमोल कीर्तिकर यांच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. त्या वेळी उद्धवजी ठाकरे यांनी अधिक सक्रियपणे मैदानात उतरून संघर्ष केला असता, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.
माझा मुद्दा स्पष्ट आहे.
सतेज पाटील यांनी जे केलं, त्यातून ठाकरे आणि इतर नेत्यांनी शिकण्याची गरज आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी फक्त लोकप्रियता पुरेशी नसते. प्रत्येक मतासाठी लढण्याची तयारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची हिंमत आणि निकाल लागेपर्यंत मैदानात ठामपणे उभं राहण्याची वृत्ती असावी लागते.
राजकारणात मैदानात ठामपणे उभे राहणारे नेतेच कार्यकर्त्यांना बळ देतात!
राज्यात दुष्काळाने जनता होरपळली आहे पण सरकार आपल्याच मस्तीत आहे. राम शिंदे विधानपरिषदेचे सभापती आहेत. बँकेच्या मतदारांना लक्ष्मीदर्शन होत आहे हे यातून सर्वश्रुत आहे. ट्वीट करून सांगण्यासारखी ही अभिमानास्पद गोष्ट नसून लोकशाहीतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
रोहित दादांचे आभार मानले पाहिजेत!
गोपीचंद पडळकर,संग्राम जगताप,राम सातपुते यांसारख्या नेत्यांना लव्ह जिहाद,हिंदू-मुस्लिम आणि जनआक्रोश मोर्चांच्या बाहेरही महाराष्ट्रात प्रश्न असतात याची जाणीवच नव्हती.रोहित दादांच्या MPSC आंदोलनामुळे किमान आता MPSCसारख्या ‘सामान्य’ विषयावर तरी बोलायला लागलेत याला आंदोलनाचा परिणाम म्हणतात.
@RRPSpeaks
मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं.. 27 हजार रुपये पर हेक्टरच्या घोषणा झाल्या… पण दिवाळीला फक्त 940/- मिळाले.
धायमोकलून रडतानाही डोळ्यातून थेंब खाली पडू दिला नाही म्हाताऱ्याने! इथे दुष्काळ जाणिवांचा आहे.. भावनेचा आहे.
#मराठवाडा#दुष्काळ
As per section 10A of the Payment and Settlement Systems Act, 2007 (51 of 2007), the Central Government prohibits banks and system providers from imposing, directly or indirectly, any charges on a person making or receiving payments using debit cards powered by RuPay and UPI transactions up to Rs 2,000: Ministry of Finance
14 months after the inauguration of Kasarwadavli Flyover, serious safety concerns have emerged.
The flyover was inaugurated by Transport Minister Shri Pratap Sarnaik on 8 July 2025. Now, a large chunk of concrete appears dangerously close to falling onto the busy road below.
If this is the condition of a major public infrastructure project within just 14 months, who will take responsibility?
Crores are spent, but Quality, Safety & Accountability — NO COMPROMISE.
Authorities must inspect the site immediately and ensure public safety.
Source: Adv. Radhika Prakash Rane
@PratapSarnaik@CMOMaharashtra@ThaneCityPolice@MMRDAOfficial@discoveryofmaha@MohnaazS
#ThaneCity #Kasarwadavli #Thane #PublicSafety
मी आणि मनोज प्रधानांनी ९३-९४ साली दहीहंडीचा उत्सव सुरू केला, तेव्हा हा उत्सव एक दिवस एवढा मोठा आणि भव्य सांस्कृतिक सोहळा बनेल, याची कल्पनाही नव्हती.
वर्षानुवर्षे सवंगडी जोडत गेले… गोविंदा पथकं जोडत गेली… आणि दहीहंडी केवळ उत्सव न राहता, हजारो माणसांना एका भावनेने जोडणारा सोहळा बनत गेला. हा प्रवास २०१५ पर्यंत सुरू राहिला.
या संपूर्ण प्रवासातील माझ्या मनाजवळचा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे — ‘जय जय महाराष्ट्र माझा!’
२००५ साली पहिल्यांदा दहीहंडीच्या व्यासपीठावर हे गीत सादर केलं. सगळ्या सवंगड्यांना आणि गोविंदा पथकांना सोबत घेत, हजारो आवाज एकत्र आले आणि महाराष्ट्रगीताचा जयघोष झाला.
तो सोशल मीडिया आणि रिल्सपूर्वीचा काळ होता. त्यामुळे तो क्षण फार दूरवर पोहोचला नाही. पण त्या दिवशी मनात निर्माण झालेला महाराष्ट्राभिमान आजही तितकाच जिवंत आहे.
आज सोशल मीडियामुळे दहीहंडीतील असे क्षण लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अनेकांना हे कदाचित नवीन वाटत असेल; पण माझ्यासाठी हा क्षण केवळ आजचा नाही.
ही माझ्या आयुष्याची आठवण आहे.
ही माझ्या दहीहंडीच्या प्रवासाची आठवण आहे.
आणि ही महाराष्ट्राविषयीच्या अभिमानाची अविभाज्य भावना आहे.
दहीहंडी म्हणजे केवळ हंडी फोडणं नाही.
एक पडला, तर दुसऱ्याने त्याला सावरायचं…
एकाची ताकद कमी पडली, तर दुसऱ्याने खांदा द्यायचा…
आणि एकमेकांवर विश्वास ठेवून आकाशाला गवसणी घालायची…
हीच मराठी मातीची शिकवण.
हीच दहीहंडीची खरी ताकद.
जय जय महाराष्ट्र माझा!
गर्जा महाराष्ट्र माझा!
कारण हे केवळ एक गीत नाही…
हा प्रत्येक मराठी मनाच्या अभिमानाचा आवाज आहे!
🚩 जय महाराष्ट्र! 🚩