शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती...
महाराष्ट्र में मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) के नाम पर 1.34 लाख युवाओं को सपने दिखाए गए कि प्रशिक्षण के बाद उन्हें सरकारी नौकरी मिलेगी। आज वे सभी युवा नासिक की सड़कों पर बैठकर न्याय की भीख मांग रहे हैं, भूख हड़ताल पर हैं, बीमार पड़ रहे हैं और सत्ता के गलियारों में सन्नाटा पसरा है। एक ओर मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री चुनावी मंचों पर “युवा सशक्तिकरण” की बातें करते हैं, वहीं दूसरी ओर उन्हीं युवाओं की पुकार अनसुनी की जा रही है। यह सिर्फ एक वादा तोड़ना नहीं, बल्कि युवाओं के विश्वास, मेहनत और भविष्य की हत्या है। अगर सरकार को इन युवाओं की तकलीफ़ नहीं दिखती, तो उसे सत्ता में रहने का नैतिक अधिकार भी नहीं बचता।
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
राजकीय स्वार्थासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करणाऱ्या सरकारने आता राज्यातल्या युवांना वाऱ्यावर सोडलं आहे. एकतर योजना कंत्राटी स्वरूपाची होती त्यात वेळेवर पगार देखील देण्यात आले नाहीत परिणामी योजनेतील युवांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने आपल्या न्याय्य मागण्यासाठी राज्यभरातील युवा मोठ्या संख्येनं नाशिकमध्ये आंदोलन करत आहेत.
सरकारने किमान आपले प्रतिनिधी पाठवून युवांच्या मागण्यांबाबत चर्चा करणं अपेक्षित होते परंतु दुर्दैवाने या सरकारला मात्र युवांचे काही घेणे देणे दिसत नाही. युवांना गृहीत धरणार असाल तर इतिहासातील सर्वात भ्रष्ट असलेल्या या सरकारला पायउतार करण्याशिवाय युवा स्वस्थ बसणार नाहीत, हे सरकारने लक्षात असू द्यावे.
@Dev_Fadnavis
सरळसेवा भरतीचे आज पर्यंत एक ही पेपर इमानदारीने झाले नाहीत. खाजगी कंपन्या मग त्या कोणत्याही असेना त्या घोटाळे करतातच. यात सहभागी सरकार पण आहे कारण ते या कंपन्यांकडून मलिदा घेतात आणि ह्या कंपन्या खाली .... खातात. प्रत्येक वेळेस आम्ही सरकारला सांगत आलो आहोत घोटाळे होतात परीक्षा @mpsc_office कडे द्या पण परीक्षा जर #MPSC कडे दिल्या तर सरकारला घोटाळ्याचा महसूल कसा मिळेल? म्हणून सरकार सर्व परीक्षा MPSC कडे देत नाहीये.
@TCS@Mars_TCSiON एक तरी परीक्षा आपण नीट घेतली का? कश्याला खाजगी सेंटर देत आहात. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला घोडा लावायचे काम तुम्ही आणि @Dev_Fadnavis करत आहेत. तलाठी भरतीला तेच केला. सेंटर मॅनेज करून प्रत्येक परीक्षा मध्ये हेच होत आहे. आता शिक्षक भरतीची TAIT झाली त्यात सुद्धा हेच झालं. प्रामाणिक आणि होतकरू मुलांचे भविष्याचे वाटोळे केले आहे या सरकारने. आता तरी सरकारने TCS आणि IBPS यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करून परीक्षा ह्या Mpsc आयोगाकडे देण्यात यावे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ssaunik@NANA_PATOLE@INCHarshsapkal@AUThackeray@RRPSpeaks@Awhadspeaks@PawarSpeaks@LoksattaLive@SakalMediaNews@abpmajhatv@TV9Marathi
प्रति,
मा. दादा भुसे,
मा. मंत्री,
महाराष्ट्र शासन,
मुंबई.
विषय: पूरस्थिती आणि परीक्षा आयोजनातील विसंगतीमुळे विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा.
महोदय,
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी हाय अलर्ट घोषित केला आहे. अशा गंभीर आपत्तीजन्य पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शैक्षणिक भविष्यातील प्रश्नांचा विचार होणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने, परीक्षा आयोजन करणाऱ्या यंत्रणांकडून या परिस्थितीचा गंभीरपणे विचार केला गेलेला नाही.
उदाहरणार्थ:
1.TAIT-3 परीक्षा 27 मेपासून सुरू होत असून, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या केंद्रांऐवजी तिसऱ्या अथवा अत्यंत लांबच्या परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले आहे, जी काही केंद्रे तर पुरामुळे अडचणीच्या भागात येतात.
2.अनेक विद्यार्थ्यांची TAIT-3 परीक्षा आणि MPSC मुख्य परीक्षा एकाच दिवशी असून या दोन्ही परीक्षा करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
3.याशिवाय, D.Ed., B.Ed. आणि इतर स्पर्धा परीक्षाही याच कालखंडात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळच्या दोन अथवा तीन परीक्षांमधून एक निवडण्याचा अन्यायकारक निर्णय घ्यावा लागत आहे.
सदर परिस्थिती प्रशासनाच्या भोंगळ नियोजनामुळे उद्भवली असून अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भविष्य, आणि समान संधी या सर्व बाबींचा विचार करता, आम्ही आपणास विनंती करतो की:
1.पूरग्रस्त भागातील परीक्षा केंद्रांची तत्काळ फेरतपासणी करून विद्यार्थ्यांना पर्यायी सोयीस्कर केंद्र दिली जावी.
2.जे विद्यार्थ्यांचे पेपर एकाच दिवशी आहेत, त्यांना एक पेपर पुढे ढकलण्याची किंवा पर्यायी तारीख देण्याची व्यवस्था करावी.
3.यासंबंधीचा निर्णय लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांना स्पष्टता द्यावी.
ही विनंती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण तातडीने संबंधित विभागांशी समन्वय साधून योग्य निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@dadajibhuse@INCHarshsapkal@INCMaharashtra@CMOMaharashtra
मंत्रालयातून मॅसेज आला,पुढील 24 तासात जोरदार पाऊस पडणार असून घराच्या बाहेर पडू नका म्हणतो...!
अन् IBPS माध्यमातून उद्यापासून TAIT 3 परीक्षा सुरू होणार असून ते म्हणते कोणत्याची प्रकारच्या परिस्थित उद्या सकाळी 8 AM वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहा..!
@dadajibhuse साहेब
♦️स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांच्यावर गुन्हा दाखल.
तलाठी भरती रद्द करण्यासाठी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रीतसर पोलीस परवानगी काढून मोर्चा आयोजित केला होता. पण रोड ब्लॉक केल्याचे कारण देत पोलिसानी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष- राहुल कवठेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात नेऊन, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शेवटी विखे पाटलांचा शब्द खरा ठरला, गुन्हे दाखल झालेच.
कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्ही सत्य बाहेर काढूच. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती दाखल करण्यात येणाऱ्या गुन्हाचा तीव्र निषेध करते. याच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू. तलाठी भरती रद्द साठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही भरती रेटून नेऊ देणार नाही. 👊✊✌️
@Dev_Fadnavis@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @VijayWadettiwar@KunalNitinRaut@girishkuber@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi@saamTVnews
मराठी माध्यमाचे अभियोग्यताधारक गुणवत्ताधारक असताना इंग्रजीच्या नावाखाली जागा रिक्त कश्या राहतील आणि प्रर्यायाने मराठीची महाराष्ट्रातून हाकल्पट्टी करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. ऐन भरतीच्या वेळीच ZP शाळांचा पुळका का🤔 कारण शिक्षक मिळू नयेत आणि शाळा बंद पडव्यात. @dvkesarkar
मांढरे सर, तुम्ही सुज्ञ आहात मग शिक्षकभरतीचे नोटिफिकेशन आले तेव्हा मराठी आणि इंग्रजी माध्यम असा उल्लेख नसताना zp ला आदेश देता की इंग्रजी माध्यमाच्या जास्तीत जास्त जागा अपलोड करा, तसं केलंही जातं मगहे नियमाचं उल्लंघणं नाहि तर पालन आहे का❓️ @dvkesarkar@CMOMaharashtra@MahaDGIPR
नगर परिषद जागा वाढ झाली पाहिजे.
100% पदभरती GR चे CM साहेबांच्या खात्याकडूनच उल्लंघन होतंय.
मोजक्याच पदांसाठी जाहिरात काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय.
नगर विकास अधिकारी कडून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली..6-7 वर्षानंतर येणारी जाहिरात,,60% पदे रिक्त ,, राज्यातील वाढती बेरोजगारी बघुन ही हि जागा वाढ का नाही..??
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
*Same @mieknathshinde पहिल्या दिवसापासून मराठी माध्यमातील अभियोग्यताधारकांकडे पण बहुमत आहे फक्त आता आमचा निकाल सुद्धा मेरिट नेच लावाल अशी आशा आहे... आणि हो आम्ही आमची गुणवत्ता गुवाहाटी via सूरत जाऊन सिद्ध केली अस नाही बरं का...👍🏻👍🏻🔥🔥*
@dvkesarkar@VijayWadettiwar@NANA_PATOLE