'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@LaturDm@INCMaharashtra
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Commerce Specific असलेल्या गट ‘अ’, गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील Audit, Accounting, Taxation आणि Finance संबंधित पदांसाठी इतर शाखांतील उमेदवारांनाही पात्र करण्यात येत असल्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी याला अन्यायकारक निर्णय म्हटले आहे.
Accounting, Auditing, Taxation, Finance, Costing आणि Financial Management यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकडेच असते. https://t.co/zkxRhjLMrS., https://t.co/nJ4vBZA2xM., CA, CMA, CS यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून हजारो विद्यार्थी अनेक वर्षे या क्षेत्रातील शासकीय सेवेसाठी तयारी करत असतात. दरवर्षी जवळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना इतर शाखांतील उमेदवारांना समान पात्रता देणे म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांनी शासनाकडे ‘लेखा व लेखापरीक्षण’ हा स्वतंत्र संवर्ग तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच Commerce Specific पदांसाठी पूर्वीप्रमाणेच ‘वाणिज्य शाखेतील पदवी’ हीच शैक्षणिक पात्रता कायम ठेवावी, स्वतंत्र Cut-Off लागू करावा आणि गट ‘क’ मधील Audit, Accounting, Taxation, Finance संबंधित पदांसाठी स्वतंत्र संवर्ग निर्माण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनीच का अन्याय सहन करायचा?” असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी शासनाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
@CMOMaharashtra@MahaChiefSec
#CommerceStudents
#PrabuddhBharat
प्रति
मा अध्यक्ष @bhimanwar, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा निकाल केव्हा लावणार?
14 जानेवारी ला परीक्षा होऊन 107 दिवस होत आहेत.
कुठलाही अडथळा नसताना निकाल लावायला काय अडचण आहे आयोगाला?
@mpsc_office
MMRDA च्या 'उप लेखापाल' भरतीमध्ये ६०% गुण आणि ३ वर्षांचा अनुभव अनिवार्य केल्यामुळे अनेक गुणवंत पण गरीब विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर फेकले जात आहेत. कॉमर्स पदवीधारकांना संधी नाकारणे अन्यायकारक आहे. कृपया या अटी शिथिल कराव्या ही विनंती @DrSanMukherjee@mieknathshinde@MMRDAOfficial