Official Tweeter Handle To Strengthen All Engineering Students(MH).
✊From the Students for the students✊
💥 लढेंगे भी, जितेंगे भी.💥
💥 संविधान सर्वश्रेष्ठ 💥
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE
#MMRDA#MPSC#PMC
पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचा शास���ाच्या परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केवळ समित्या नेमून चालणार नाही. निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी CBIमार्फत किंवा मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, ही विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे.
केंद्राचा पेपरफुटीविरोधी कायदा महाराष्ट्रात केव्हा लागू होणार? याचे शासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलण���रे मंत्री, आमदार व खासदार या गंभीर प्रकरणात किती ठोस पाठपुरावा करतात, हे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पाहत आहेत.
आश्वासनांपेक्षा आता विद्यार्थ्यांना कृती, पारदर्शकता आणि न्याय हवा आहे!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
@BJP4Maharashtra @Shivsenaofc @INCMaharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @VBAforIndia
सर्वात पहिले अध्यक्ष आणि सचिव यांनी ऋषिकेश गांगुर्डे यांची माफी मागितली पाहिजे.
ज्यावेळी अध्यक्ष महोदय यांच्यावर आरोप केले जातात त्यावेळी ते वैयक्तिक वाटतात परंतु " तो नापास झाला म्हणून त्याला re exam पाहिजे" हे आरोप वैयक्तिक नव्हते का ?
@bhimanwar
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री विवेक भीमनवार यांचे औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात वक्तव्य...
मुंबई/दि. 2 सप्टेंबर 2026
प्रसिद्धीपत्रक
(औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात)
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करण�� मला आवश्यक वाटते.
2. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी शपथ घेतली आणि 3 मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलि���ांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
3. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझे संपूर्ण ल��्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर केंद्रित राहिले आहे. आयोगावर सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत.
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
5. सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच त्यांच्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृ�� नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयां��े वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे.
विवेक भीमनवार
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@bhimanwar
आदरणीय अध्यक्ष महोदय,
👉 आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे पत्र साहजिकच सर्वांनी वाचले आहे आणि आपणही ते वाचले असणार, अशी अपेक्षा आहे.
सदर आरोप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपल्यावर करण्यात आलेले नसून, परिवहन विभागाचे प्रमुख म्हणून आपल्या भूमिकेशी संबंधित असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या आरोपांना केवळ “वैयक्तिक आरोप” म्हणून संबोधून त्यापासून अलिप्त राहणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.
👉 आपण या आरोपांवर सविस्तर, मु��्देनिहाय आणि वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. तसेच, त्या आरोपांचे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून न देता, आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून स्पष्टपणे जनतेसमोर मांडावे, जेणेकरून आरोप ज्या वैयक्तिक भूमिकेशी संबंधित आहेत त्यावर आपली वैयक्तिक बाजूही स्पष्ट
होईल.
👉 "सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारीतील घटना नेमकी काय?
प्रसिद्धीपत्रकात ��्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,
“औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे.”
मात्र यामध्ये काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित राहतात:
जानेवारी 2026 मध्ये नेमकी कोणती घटना घडली?
ती घटना नेमकी कोणत्या तारखेला घडली?
ती कोणाच्या निदर्शनास प्रथम आली?
आयोगाला याची माहिती कधी मिळाली?
जर जानेवारीमध्येच ही घटना निदर्शनास आली होती, तर त्यावेळी नेमकी कोणती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली?
या घटनेची माहिती पोलिसांना कधी देण्यात आली?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रश्नपत्रिका फुटल्याचे कोणते ठोस पुरावे जानेवारीमध्येच उपलब्ध झाले होते?
कारण उपलब्ध माहितीनुसार परीक्षेच्या दोन दिवस आधी, म्हणजे 20 मार्च 2026 रोजी प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप/दावा समोर आला, असे दिसून येते.
मग जानेवारीतील “घटना” ��णि 20 मार्च रोजी समोर आलेल्या कथित प्रश्नपत्रिका फुटीमध्ये नेमका काय संबंध आहे?
हा कालक्रम स्पष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे.
जानेवारीमध्येच घटना निदर्शनास आली होती, तर 20 मार्चपर्यंत नेमके काय घडले? आणि जर 20 मार्चलाच प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रथम समोर आले असेल, तर प्रसिद्धीपत्रकात जानेवारीतील कोणत्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे?
याचे स्पष्ट, तारखांसह आणि अधिकृत नोंदींच्या आधारे स्पष्��ीकरण आयोगाकडून अपेक्षित आहे. तसेच जानेवारी मध्ये झालेल्या इतर परीक्षेत देखील पेपरफुटी झालेली आहे का ?
विद्यार्थ्यांना आता भावनिक आवाहन नको आहे त्यांना कालक्रम, पुरावे आणि वस्तुनिष्ठ उत्तरे हवी आहेत.
👉 "अंतर्गत चौकशीबाबत" : पेपर हा आयोगाच्या अंतर्गत फुटला हे सर्वांना माहितीच आहे मग चौकशी अंतर्गत का? हे प्रकरण स्वतंत्र तपास यंत्रणा जसे की CBI ,CID किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश या���च्याकडे वर्ग करण्यास काय अडचण आहे ?
👉 प्रश्न फक्त औषध निरीक्षक या पदापुरता नसून त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात आता हजारो प्रश्न आहेत इथे विद्यार्थ्यांचे अभ्यासात देखील लक्ष लागत नाही त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपणास देणे आता अत्यंत्य गरजेचे आहे
@bhimanwar @mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री विवेक भीमनवार यांचे औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात वक्तव्य...
मुंबई/दि. 2 सप्टेंबर 2026
प्रसिद्धीपत्रक
(औषध निरीक्षक परीक्षेसंदर्भात)
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात माझ्याविरोधात काही वैयक्तिक आरोप करण्यात येत असून, माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करण�� मला आवश्यक वाटते.
2. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी 2026 मध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी शपथ घेतली आणि 3 मार्च 2026 रोजी पदाचा प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलि���ांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्याकरिता आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, एकूणच परीक्षा प्रक्रियेत आवश्यक समग्र सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
3. अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझे संपूर्ण ल��्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर केंद्रित राहिले आहे. आयोगावर सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत.
4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची उच्च परंपरा, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे तसेच लाखो उमेदवारांना न्याय्य आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
5. सार्वजनिक परीक्षांबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा तसेच त्यांच्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपाचे मूल्यांकन हे वस्तुस्थिती, अधिकृ�� नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. सार्वजनिक भरतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भवितव्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा विषयां��े वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादामध्ये रूपांतर होऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे.
विवेक भीमनवार
अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
@bhimanwar
📰 आजच्या ‘लोकसत्ता’मध्ये लेख प्रकाशित - "तरीही शेतकरी तहानलेलाच का?"
काल जलसंधारणमंत्री मा. संजय राठोड यांनी ‘लोकसत्ता’मध्ये मांडलेल्या ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला जलसंधारणाची संजीवनी’ या लेखाला हे माझे उत्तर..... सरकारकडून हजारो कोटींचा खर्च, लाखो कामे आणि हजारो गावे ‘जलसमृद्ध’ झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र खरी कसोटी आकडेवारीची नाही - शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष पाणी पोहोच���े आहे का, याची आहे.
लेखातून काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत :
▪️ जलसंधारण व सिंचन विभागातील रिक्त पदे कधी भरणार?
▪️ वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प कधी पूर्ण होणार?
▪️ वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत प्रत्यक्ष सिंचनक्षमता किती वाढली?
▪️ जलयुक्त शिवारच्या कामांचे स्वतंत्र गुणवत्ता परीक्षण झाले आहे का?
▪️ ‘जलसमृद्ध’ घोषित गावांमध्ये प्रत्यक्ष भूजलपातळी आणि सिंचनक्षेत्र किती वाढले?
शेतकरी सरकारी अहवालातील ‘काम पूर्ण’ हा शब्द पाहत नाही; तो आपल्या विहिरीतील पाण्याची पातळी पाहतो. जलसमृद्ध महाराष्ट्राची खरी ओळख कोट्यवधींच्या खर्चात कि��वा कागदावरील कामांच्या संख्येत नाही, तर शेतकऱ्याच्या शेतात उपलब्ध झालेल्या शाश्वत पाण्यात आहे.
आकडे कागदावर बदलता येतात; पण शेतकऱ्याच्या शेतातील कोरडी माती खोटे बोलत नाही.
धन्यवाद मा. गिरीश कुबेर जी आणि लोकसत्ता टीम.
@girishkuber @INCHarshsapkal @INCMaharashtra @mieknathshinde @SanjayDRathods @Shivsenaofc @INCRojgar
#जलसंधारण #शेतकरी #सिंचन #Maharashtra #LokSatta #DhananjayShinde
नांदेड येथे stenographer विद्यार्थ्याचे मागील 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही. सरकारने लवकरात लवकर सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेऊन सर्व Stenographer विद्यार्थ��यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आज जे नांदेड मध्ये सुरू आहे उद्या पूर्ण महाराष्ट्रात हे चित्र दिसू शकते.
@CMOMaharashtra
A delegation of Maharashtra Youth Congress met students protesting PMC Junior Engineer exam paper leak in Pune.
Their hard work cannot be sacrificed to a broken examination system.
Cancel the compromised exam, investigate the leak and punish those responsible, no cover-up, no excuses.
बोगस भरतीचे परिणाम...
पेपरफुटी व निकाला�� गोंधळ घालून पात्रता नसलेले लोक तात्पुरत्या फायद्यासाठी पदावर बसवले जातात पण त्याचे दुष्परिणाम असे होतात. CHO लाच BP तपासता येत नसेल तर आरोग्य व्यवस्था "ढुंगण-आसन" करीत आहे असे म्हटले तर काय वावग ठरेल??
#आरोग्य_भरती @CMOMaharashtra
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात! ⚖️✊
MPSC,एमएमआरडी आणि पुणे महानगर पालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीतील गैरप्रकाराविरोधात आज पुण्यात विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांची भेट घेतली.
विविध अहवाल, भरती प्रक्रियेतील गंभीर प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलनासोबतच आता कायदेशीर लढाईचीही तयारी सुरू झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महायुती सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये.
प्रामाणिक विद्यार्थ्यां��ा न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही!
@AsimSarode @INCHarshsapkal @satejp
#PMCJE #PMCRecruitment #StudentsJustice #RojgarNyay #IBPS #Congress
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) परीक्षेचा पेपर लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, संतप्त विद्यार्थी आपल्या हक्क आणि न्यायासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपोषणाला/आंदोलनाला बसले आहेत.
या कठीण प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक ��ाँग्रेसच्या वतीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यात आला. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या महापालिकेच्या कारभाराचा आम्ही तीव्र निषेध करतो.
पुणे महानगरपालिकेच्या JE भरती परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी पुराव्यानिशी समोर आणले आहेत. २२, २३ आणि २९ ए���्रिल २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेबाबत २८ ऑगस्ट रोजीच्या PMC चौकशी अहवालात गैरप्रकाराचा फायदा तीन उमेदवारांना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे..
मात्र, प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ती बाहेर पाठवली गेली आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका सोडवली गेली असेल, तर फायदा केवळ तीनच उमेदवारांना झाला, असा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला? या गैरप्रकाराची खरी व्याप्ती तपासल्याशिवाय परीक्षा पारदर्शक असल्याचे प्रमाणपत्र देणे म्हणजे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा आहे..
यापूर्वी अशाच प्रकरणात एका उमेदवारापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आल्यानंतर MPSC ने संप���र्ण परीक्षा रद्द केली होती. मग PMC JE भरतीसाठी वेगळा न्याय का?
एकीकडे कोणतीही स्वतंत्र पोलीस चौकशी झालेली नसताना १४६ उमेदवारांच्या नियुक्त्यांची घाई केली जात आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी न्यायासाठी PMC कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी सरकार आणि प्रशासन नियुक्त्यांची घाई का करत आहे?
राज्य सरकारने PMC JE भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, नियुक्त्या थांब��ाव्यात आणि MPSC मार्फत पारदर्शक पद्धतीने नव्याने परीक्षा घेऊन हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @AUThackeray
@ShivsenaUBTComm
@RahulGandhi छात्रो की गुंज, पुणे म���ं हमारे स्टूडेंट ने भी आपके सामने बोलणे के लिये निवेदन दिया था but कुछ टेक्निकल issue के कारण महाराष्ट्र के इंजिनियरिंग students का मुद्दा आपके सामने नहीं आया but हमारी सब टीम ने वो मुद्दा आपके सामने लाने का try किया.
@RahulGandhi छात्रो की गुंज, पुणे मैं हमारे स्टूडेंट ने भी आपके सामने बोलणे के लिये निवेदन दिया था but कुछ टेक्निकल issue के कारण महाराष्ट्र के इंजिनियरिंग students का मुद्दा आपके सामने नहीं आया but हमारी सब टीम ने वो मुद्दा आपके सामने लाने का try किया.