महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी आणि अधिकारी यांची मंत्रालयातील माझ्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्या पुढे मांडल्या. त्या सर्व मागण्या समजून घेऊन, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून मार्ग काढू तसेच शक्य तितक्या अडचणी, विभाग स्तरावर तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करीन. असे आश्वासन मी दिले आहे.
.
.
.
#maharashtra #devendrafadanvis #madhurimisal #bjp
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024_जागावाढ
राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DySP, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी तत्सम सर्व रिक्त संवर्गाच्या जागासाठी लवकरात लवकर मागणीपत्रके पाठवून चालू 2024च्या जाहिरातीमध्ये ती समाविष्ट करून MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
आदरणीय देवेंद्र जी,
राज्यसेवा परीक्षा आणि PSI, STI ASO, SR, कर सहायक, लिपीक या पदांच्या जागा 2024 साठीच वाढवाव्यात ही नम्र विनंती.
PSI आणि STI पदांच्या 100% रिक्त जागांचे अतिरीक्त ज्यादाचे मागणीपत्रक 2024 साठीच द्यावे ही कळकळीची नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
आज MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागावाढी साठी ट्विटर वरती आवाहन करण्याचे ठरवले आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक आहे तरी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे की सरकारने निर्णय करून लवकरात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सहित जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर सरकारकडे पाठवून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC
#MPSC_राज्यसेवा
#MaharashtraCM
#DevendraFadnavis
#AjitPawar
#eknathshide
@NCPspeaks@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde