आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
मा. @mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील अध्यक्ष तरी किमान कार्यक्षमता असलेला निर्णय क्षमता असलेला द्या....नुसते बुजगावणे या स्वायत्त संस्थेवर बसवू नका आणून .
टीप: बरंच काही लिहायचं बाकी ठेवलं आहे ते नंतर कधीतरी...
📍 विधान भवन, #मुंबई |
#नाशिक महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत विधानभवनातील माझ्या दालनात बैठक घेऊन हे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले.
नाशिक शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉल्व्हमनवर नियंत्रण ठेवावे, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करावे, पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी विशेष नंबर जाहीर करावा तसेच शहरातील खड्डे बुजवण्यासाठी तातडीने मोहीम हाती घ्यावी असेही निर्देश दिले. दादासाहेब फाळके स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. पेलीगन पार्कच्या दुरुस्ती आणि नूतनीकरण कामासाठी लागणारा अतिरिक्त निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून काही अंशी देऊ असे याप्रसंगी स्पष्ट केले. नाशिकमधील अतिक्रमणे हटवण्यासाठी लवकरात लवकर एजन्सी नेमून कारवाई करावी, पार्किंगसाठी जागा तयार कराव्यात तसेच पार्किंग आणि टोइंगचे धोरण निश्चित करावे, पाणीपट्टी घरपट्टी वसुलीसाठी अभय योजना आणावी, बांधलेल्या गाळ्यांची लवकरात लवकर विक्री करावी, नाशिक मनपा मधील रिक्त पदांची बिंदूनमावली लवकरात लवकर निश्चित करून कुंभमेळ्यापूर्वी ही पदे भरावीत असेही निर्देश याप्रसंगी दिले.
तसेच मुंबई, ठाणे प्रमाणे नाशिकमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी एसआरए प्राधिकरणाची स्थापना, तसेच अंबड एमआयडीसी मधील एमआयडीसी लगत गावकऱ्यांनी बांधलेली गोदामे नियमित करण्यासाठी भिवंडी प्रमाणे धोरण निश्चित केले जाईल असेही यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदार सीमा हिरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच नाशिक महानगरपालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Nashik #EknathShinde #Maharashtra
📍कंबाईन पॅटर्न बद्दलच्या हालचाली सुरू असल्याची प्राथमिक माहिती ऐकायला मिळत आहे.
📍अभ्यासक्रम पूर्वीच्या प्रमाणेच असावा यासाठी बऱ्याच विध्यार्थ्यांचे फोन कॉल आलेले आहेत.
📍याबाबतीत पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यासाठी प्रयन्त करेन🙏
#combine#psi#sti#aso@mpsc_office
परीक्षा परिषदकडे वारंवार मागणी केली , शिक्षकभरती परीक्षा एकाच सत्रात एका दिवशी घेण्यात यावी विनाकारण परीक्षार्थीचा जीव दावणीला लावू नका..!
राज्यातील सर्व परीक्षार्थीची मागणी होती तरीही त्यांनी सकाळी 8 AM पासून परीक्षा घेतली त्यात मुलांच्या सोयीचे सेंटर दिले नाही.
1/2
📍 आज महाराष्ट्राच्या नेतृत्वाची महाराष्ट्रालाच लाज वाटत आहे😡
📍आदरणीय मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदय तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व माननीय अजित दादा आपण तर चक्क बीडचे पालकमंत्री आहात...... हे तुमच्या तिघांच्या आशीर्वादाने तर घडत नाही ना? हा प्रश्न आता जनतेला पडला आहे.
📍आज एक महाराष्ट्रातील नागरिक म्हणून तुम्ही राज्याचे प्रमुख आहात हे म्हणायची आणि लोकांना सांगायची लाज वाटते.
📍वेशीला अब्रू टांगल्यासारखे संपूर्ण राज्याचे गुन्हेगारीकरण करून वाटोळे केले आहे.
📍ज्या विकासासाठी सत्तेत जाऊन बसले तो विकास तर तेल लावतच गेलेला दिसतोय.
📍तुम्ही फक्त राज्य लुटण्यासाठी सत्तेवर आहात कि काय? कारण तुमचा आणि जनतेचा दुरदूरचा संबंध दिसत नाही.
📍एक गोष्ट लक्षात ठेवा ही गुन्हेगारी जर थांबवली नाही तर एक दिवस हीच गुन्हेगारी तुमच्या घरापर्यंत सुद्धा येणार, त्यावेळी मात्र अख्खी बीड ची जनता आनंदोत्सव साजरा करत बसणार, कारण लक्षात ठेवा हिटलर सुद्धा एवढा मोठा हुकूमशहा असून पाय लावून पळत लपून बसला होता.
📍बाकी मी ऐकले आहे, "निर्लज्जम सदा सुखायम"🙏
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@PawarSpeaks@Jayant_R_Patil@supriya_sule@INCHarshsapkal@RahulGandhi@RahulAsks@BEEDPOLICE@AmitShah
#beed
शिक्षकभरती TAIT 3 परीक्षा परिषद आयोजन 24 मे ते 5 जून दरम्यान होणार असून त्याच काळात UPSC,MPSC मुख्य,MPSC पूर्व,MPSC संयुक्त परीक्षा ,डीएड, बीएड, MED,YCMU परीक्षा अन्य विद्यापीठ परीक्षा एकाच वेळी येत असून त्या सर्व परीक्षा देणारे विद्यार्थी एकच आहेत!
@dadajibhuse@mieknathshinde
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
@AdvAshokBNCP_SP सर कृपया राज्यसेवेतील जुन्या हॉल तिकीटवर बायोमेट्रिक होऊन परीक्षा दिलेले गंभीर प्रकरण पवार साहेबांना कळवावे.. आणि पूर्व परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी जेणेकरून सर्व तांत्रिक अडचणी दूर होतील व सर्वांना level playing field मिळेल..🙏🙏