रेल्वे ALP परीक्षेमुळे रचना सहायक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय्य करता कामा नये.
आम्ही पण 1000/900 रुपये परीक्षा फी भरून परीक्षा देतो.अधिकृत TCS ION Digital केंद्राची मागणी अत्यंत रास्त आहे.
@suvishelke @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan@MAHA_UDD@CMOMaharashtra
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रीयेला ८ महिने उलटून गेले तरीही अजून अंतिम निवडसुची प्रदर्शित करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात इतर काही विभागांचे निकाल लागून नियुक्त्या पण देण्यात आल्या आहेत. आचारसंहिते दरम्यान नियुक्त्या देता आल्या नाही परंतु आचारसंहिता समाप्ती नंतर आणि कागदपत्रे पडताळणी नंतर आज २० ते २५ दिवस उलटुन गेले आहेत.
या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल लावून त्वरित नियुक्त्या द्याव्यात असा मंत्रिमंडळाचा आदेश असताना सुद्धा जाणून बुजून भरती प्रकिया रखडवण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना अशी शंका विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी तरी नियुक्त्या मिळणार आहेत का हा प्रश्न विद्यार्थी वर्गामध्ये आहे.
आपण यात लक्ष घालून तत्काळ अंतिम निवडसूची जाहीर करून लवकरात नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan@punyachiMPSC
#MPSC #DhananjayShinde
#Maharashtra
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेचा ७ जूनला नाशिक आणि ठाणे विभाग सोडून निकाल जाहीर करण्यात आला. त्याचे कारण पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर व कागदपत्रे पडताळणी वर नाहीत.
दि. ७ व ८ जूनच्या दरम्यान जिल्हा परिषद जळगाव, धुळे, ठाणे, अहिल्यानगर यांचे निकाल जसे जाहीर करत आहात तसेच जलसंपदा ठाणे आणि नाशिक विभागाचा निकाल जाहीर करून कागद पत्र पडताळणी करून घ्यावी..
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस आपण यात थोडे लक्ष घालून निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीस बोलावून दिलासा द्यावा व विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी ही विनंती..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Devendra_Office@AUThackeray@iambadasdanve@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
@RRPSpeaks ७ , ८ जून च्या दरम्यान ZP जळगाव, ZP धुळे, ZP ठाणे,ZP अहिल्यानगर यांचे निकाल जसे जाहीर झाले आहेत. तसेच शिक्षक भरती मध्ये परवानगी मिळवून नियुक्ती देण्यात येत आहेत, त्याच प्रमाणे नाशिक आणि ठाणे विभागाचा निकाल जाहीर करावा.
विनंती
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या निवड याद्या अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये ZP, शिक्षण व आरोग्य विभाग या भरती प्रक्रियेचे निकाल व कागदपत्रे पडताळणी केली असतानाही जलसंपदा विभागातील अधिकारी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे कारण देत असल्याचे समोर येत आहे. वास्तविक आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर व कागदपत्रे पडताळणीवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्वरित निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीस बोलवावं आणि विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी, ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadanvis@Deepakk75058621
#जलसंपदा_विभाग #सरळसेवा_भरती
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाने अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यातही पुन्हा विधानपरिषद आचारसंहिता हे कारण देवून विभागाने ठाणे, नाशिक, कोकण या विभागाच्या सदरील याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत. ज्या विभगाच्या केल्या त्यातही त्रुटी आहेत असे अनेक उमेदवारांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. कागदपत्र पडताळणी साठी याद्या प्रसिद्ध करताना ज्या उमेदवारांना बोलावले आहे त्या उमेदवारांचा प्रवर्ग त्यांच्या नावापुढे असल्यास पारदर्शकता वाढेल. परंतु सदरील याद्या प्रसिद्ध करताना विभागाने फक्त नाव आणि गुण अशा स्वरपुटा याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या आधारावर प्राधान्य दिले आहे हे स्पष्ट होत नाही आणि अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तसेच यात कोणताही घोळ होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तरी आपल्या विभागाने या प्रसिद्ध केलेल्या याद्या पुन्हा एकदा उमेदवारांच्या प्रवर्गासहित जाहीर कराव्यात. सोबतच कोणतीही अडचण नसताना नाशिक, कोकण, ठाणे या विभागाच्याही कागदपत्र पडताळणी याद्या त्वरित प्रसिद्ध करून हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@SVW790@SardesaiVarun@AAPMaharashtra@Mpsc_Andolan@punyachiMPSC @degree_holders
#DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result #wrd
@RRPSpeaks जलसंपदा विभागाला आजच निवड यादी जाहीर करायला लावा. आम्ही आजपर्यंत भरपूर (जवळपास ३ महिन्यांहून अधिक) वाट पाहीली आहे. आचारसंहितेचं तकलादू कारण नको आम्हाला. बाकी विभागांचे निकाल लागत आहेत फक्त जलसंपदा विभागालाच आचारसंहिता आड येतेय.
जलसंपदा विभागाने सरळसेवा भरतीअंतर्गत विविध ४४९७ पदांसाठी २८ डिसेंबर २०२३ रोजी परिक्षा घेतली आणि त्याची सामान्य गुणवत्ता यादी ३ मार्च २०२४ रोजी प्रसिद्धही केली. मात्र त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निकाल मार्च महिन्यात लागणं अपेक्षित असतानाही याबाबत अद्याप निकाल लावलेला नाही. @Dev_Fadnavis साहेब यात लक्ष घालून तातडीने हा निकाल लावावा आणि बेरोजगार युवांना न्याय द्यावा, ही विनंती!
#DepartmentofWaterResources #सरळसेवा_परीक्षा #result
पेसा क्षेत्रातील परीक्षा वेळापत्रक जाहीर करायला ग्रामविकास विभागाला काहीही अडचण नाही.@girishdmahajan
पुरवठा निरिक्षक निकाल जाहीर करायला आता काय पुतीन ची permission पाहिजे का ? @ChhaganCBhujbal
जलसंपदा विभाग निकाल जाहीर करायला @Dev_Fadnavis तुम्ही परवानगी देत नाही म्हणे?
#पेसा
मा. @mieknathshinde@ChhaganCBhujbal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार आहेत?
आता पुन्हा विधानपरिषद आचारसंहिता हे कारण सांगून निकाल रोखणार आहात का?
पुढील दोन दिवसांत तिन्हीही परीक्षांचे सर्व पदांचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@NANA_PATOLE
जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या सरळसेवा भरती परीक्षेची सामान्य निवड यादी जाहीर केली आहे. परंतू परीक्षा होऊन 120 दिवस उलटूनही विभागामार्फत तात्पुरती निवड यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. जलसंपदा विभाग हा वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही. कोणतीही वैधानिक संस्था ही झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते, फक्त नियुक्ती देऊ शकत नाही, असे "आदर्श आचारसंहितेच्या" मार्गदर्शक तत्वात स्पष्ट केले असतानाही आचारसंहितेचे कारण देऊन हजारो उमेदवारांना विभागाने ताटकळत ठेवले आहे.
उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस आपण यात लक्ष घालावे व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर तात्पुरती निवड यादी तथा कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना तात्काळ दिलासा द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी,
लोकसभेच्या निवडणूक जाहीर झाल्या असल्या तरीही निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राज्य शासनाचे वैधानिक विभाग निवडणुकीच्या काळात स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. "जलसंपदा विभाग" वैधानिक असल्यामुळे झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकतो. परीक्षा होऊन १०० दिवस होऊनसुद्धा अजून निकाल लागलेला नसल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. अकार्यक्षम जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीसजींना या विद्यार्थ्यांच्या निकाल लावण्यात काहीही स्वारस्य दिसत नसल्यामुळे, कृपया आपण यात लक्ष घालून "जलसंपदा विभागाच्या" अधिकाऱ्यांना परीक्षांचे निकाल लावण्याचे आदेश देऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि विनंती.
@mieknathshinde@CMOMaharashtra@AUThackeray@rautsanjay61@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@Mpsc_Andolan@AAPMaharashtra@iambadasdanve@VijayWadettiwar