ही काय मुजोरी चालु आहे वर्तक नगर प्रभाग समिती अंतर्गत ? उपवन येथील गावंड बाग कडील रस्त्यावरील बाहेरून आलेले फेरीवाले आता गावकऱ्यांना मुजोरी दाखवत आहेत ? @TMCaTweetAway@TMCsmartcity@ThaneCityPolice तुम्ही आता तरी ह्यावर कारवाई करणार का ?
@ThaneCityPolice गावकरी पोलिस स्थानकात गेले असता गावकरी मंडळींविरद्ध तक्रार घेतली जात आहे. कारण असे की सबंधित फेरीवाले हे आपल्याच पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी घरकाम करत असल्या कारणाने संबंधित फेरीवाले गावकरी मंडळी यांच्या विरोधात पोलिस स्थानकात दबाव आणत आहेत.
ठाणे महानगरपालिका अश्या अनधिकृत बांधकामांना तक्रार दिल्यानंतर सुद्धा आशय का देत आहे ? वर्तक नगर प्रभाग समिती अश्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर हातोडा का पाडत नाही आता, माझ्या एक फुटबॉल टर्फ साठी आख्खी फोर्स आणि ह्यांना साधी एक नोटीस सुद्धा नाही ! @TMCaTweetAway@TMCsmartcity
आमच्या ठाण्यात कलेचा आणि महिलेचा आदर केला जातो! ही अफाट गर्दी २००-५०० रुपये देऊन मगवलेली नसुन कलेप्रती ठाणेकरांचं असलेलं प्रेम आहे. ज्या लोकांच्या डोळ्यांवर अंधाराचा परदा आलेला आहे त्यांनी ही ठाणेकरांची अफाट गर्दी पहावी. #diwalipahat#DiwaliPadwa#Diwali2023
आज विधानपरिषदेत बोलताना कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
नितीन देसाई यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराची आत्महत्या ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एनडी स्टुडिओसारखा मोठा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलं होतं. यासंदर्भात बँकेकडून झालेल्या आर्थिक शोषणामुळे त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर दिसत आहेत. काहीतरी करून दाखवू इच्छिणाऱ्या त्यांच्यासारख्या पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना गृहविभागाने संरक्षण देणं अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी सभागृहात मांडली.
#NitinDesaiSuicide
https://t.co/cyoi1uHf10
वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामाची तत्परता इथे दिसुन येत आहे ! पावसाळा आला तरी रस्त्यालगतच्या झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी झालेली नाही. लोकांच्या जीवाशी किती दिवस अजुन खेळणार @TMCaTweetAway@TMCsmartcity ? स्थळ : बेथनी हॉस्पिटल समोर.
दिनांक ०८/०६/२०२३ रोजी आयुक्तांना दिलेल्या पत्रावर स्वच्छता उप निरीक्षक हेमंत चौधरी यांना दिलेल्या निवेदनात व त्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत नियोजल्या प्रमाणे आज प्रभागात गटार सफाई च्या कामाला सुरुवात झाली. त्वरित कारवाई सुरू केल्याबद्दल@TMCaTweetAway चे आभार.
When I am done with shopping in Ikea and found some creative things around ! I am like I should buy this also, even if it’s not in my requirement list 😂😂😂
जेव्हा सगळे विचारतात " एवढं लोकांसाठी कामे करतोस, जीवाचा पार धोका निर्माण होईपर्यंत लढतो ! काय भेटणार आहे तुला हे सर्व करून ? " तेव्हा फक्त स्मित हास्य चेहेऱ्यावर देऊन हेच सांगावसं वाटतं की "फळाची अपेक्षा करून कामे केली असती, तर २४ व्या वयात असताना भल्या भल्यांना घाम फोडता आला नसता ! "
जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही !
प्रत्येक मातेस मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..... 🦋