MMRDA भरती परीक्षा : योगायोग की गंभीर प्रश्नचिन्ह?
MPSC ने ड्रग्स इन्स्पेक्टर पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने कारवाई केली.
मग MMRDA भरती परीक्षेबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर ��ंशय निर्माण झाला असताना किमान चौकशी करण्याचे औदार्य MMRDA दाखवणार आहे का?
काही उमेदवारांच्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांतील गुण आणि MMRDA परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.
उदाहरणार्थ—
▪️ Tushar Funde — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 200/200
▪️ Aniket Dhere — BMC SE: 8.5/100 → MMRDA: 198.38/200
▪️ Gaurav Yekekar — Nagpur JE: 48/200 → MMRDA: 198/200 (Rank 7)
▪️ Akash Rakhade — PMC JE: 82/200 → MMRDA: 198/200 (Rank 11)
▪️ Yogesh Kumar Kathe — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 192/200
हे आकडे गैरप्रकार सिद्ध करत नाहीत, पण एवढी मोठी तफावत निश्चि��च चौकशीची मागणी करते.
म्हणून MMRDA ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी—
➡️ CCTV Footage
➡️ Server Logs
➡️ Login-Logout Records
➡️ IP/Device Mapping
➡️ Response Patterns
➡️ परीक्षा केंद्रनिहाय आणि उमेदवारनिहाय डेटा
यांची स्वतंत्र आणि तांत्रिक चौकशी करावी.
जर सर्व काही नियमानुसार झाले असेल तर चौकशीतून ते स्पष्ट होईल आणि विद्यार्थ्यांच्या मनातील संशय दूर होईल.
आणि जर गैरप्रकार झाला असेल, तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
MPSC ने एका परीक्षेप्रकरणी कारवाई केली; MMRDA आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार की पारदर्शक चौकशी करून सत्य समो��� आणणार?
हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा हा प्रश्न आहे.
संशय निर्माण झाला आहे, तर चौकशी झालीच पाहिजे!
#MMRDA #MMRDARecruitment #ExamTransparency #RecruitmentExam #MPSC #StudentsJustice
मा. मुख्यमंत्री मह��दय, एक कळकळीची विनंती…🙏
हे चित्र आजच्या स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेतील कडू वास्तव अधोरेखित करते. जवळपास प्रत्येक परीक्षेत गैरप्रकारांच्या तक्रारी समोर येत आहेत. गोरगरीब व कष्टकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरून पुरावे सादर करतात; मात्र तरीही संबंधित विभागांकडून अपेक्षित ती ठोस कारवाई होताना दिसत नाही.
याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत नाही, तर त्यांच्या पालकांन��ही प्रचंड मानसिक त्रास आणि असहायतेचा सामना करावा लागत आहे.
केंद्र सरकारने पेपरफुटी व परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात कायदा केला असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसेल, तर महाराष्ट्रात याबाबत आपण स्वतः पुढाकार घेऊन कठोर, पारदर्शक आणि तातडीची व्यवस्था निर्माण करावी, ही कळकळीची विनंती.
कारण अधिकारीवर्ग हा कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कांचा रक्षक असला पाहिजे; गैरप्रकार ��रणाऱ्यांचा नव्हे.
एका विद्यार्थ्याचा विश्वासघात म्हणजे संप���र्ण व्यवस्थेवरील विश्वासाला तडा.
कष्टकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
#MMRDA_Scam #PMC_JE_Scam
#MPSC #Recruitment #PaperLeak #CompetitiveExams #Students #Maharashtra
@VijayKumbhar62 पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या परीक्षेत परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू असतानाच फोटो बाहेर आले, पुरावे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आले. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे
परीक्षा झाली… पण प्रक्रिया पारदर्शक होती का?
डमी उमेदवार, संशयास्पद निकाल, परीक्षागृहातील फोटो आणि बनावट भरतीचे आरोप…इतक्या तक्रारींनंतरही स्पष्ट उत्तर का मिळत नाही?
तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास का ढासळतोय, हे समजून घेण्यासाठी चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ पाहा.
#RecruitmentExam #PMC #ExamScam #YouthQuestions #ExamTransparency #LegalAwareness #VijayKumbhar
PMC recruitment, recruitment exam, exam scam, recruitment fraud, dummy candidate, suspicious results, exam transparency, youth questions, government recruitment, Pune Municipal Corporation, competitive exams, legal awareness, Vijay Kumbhar
MMRDA चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करा
PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या
MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी ��ंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करत आहे.
MMRDA भरती घोटाळा चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDA आणि मुंबई मेट्रो-१शी संबंधित त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेमुळे चौकशीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना समितीतून तात्काळ हटवून प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SITमार्फत चौकशी करावी. परीक्षा डेटा, सर्व्हर लॉग्स, CCTV फुटेज आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. या प्रकरणी काँग्रेसने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट मागितली असून, स्वतंत्र निवेदन सादर केले जाणार आहे.
PMC भरतीतील त��्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. गंभीर गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
1. MMRDA भरतीची कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करावी.
2. जॉनी जोसेफ यांना चौकशी समितीतून तात्काळ हटवावे.
3. MMRDA भरतीतील डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
4. PMC भरतीतील तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी.
5. अनियमितता सिद्ध झाल्यास PMCची फेरपरीक्षा घ्यावी.
6. दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्या��ना न्याय द्यावा.
सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड काँग्रेस स्वीकारणार नाही. दोषींवर कारवाई आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.
@INCHarshsapkal @satejp @PMCPune @VijayWadettiwar @DrSanMukherjee @MMRDAOfficial @MMRDA_TWEET @degree_holders @Mpsc_Andolan @INCRojgar
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
MPSC अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपळकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना संरक्षण देऊ नये !
MPSC ने विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षा तज्ज्ञांशी चर्चा न करता ऑनलाइन परीक्षा (CBT)चा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात आणि Drug Inspector परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या म���र्गदर्शनाखाली आम्ही सलग ९ दिवस साखळी उपोषण केले. तिसऱ्या दिवशी दादांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
काँग्रेस नेते मा. विजय वडेट्टीवार आणि मा. सतेज पाटील यांनी पाव��ाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. अखेर Drug Inspector परीक्षा रद्द झाली.
आता अध्यक्ष डॉ. विवेक भीमनवार आणि सचिव मा. महेंद्र हरपळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
पेपरफुटी व गैरप्रकार करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. दोषी कितीही मोठ्या पदावर असो, त्याला राजकीय संरक्षण मिळता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ��ांनीही त्यांना संरक्षण न देता निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करावी.
आमचा स्पष्ट इशारा:
येत्या १ आठवड्यात अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा दिला नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने MPSCच्या बेलापूर मुख्यालयाला घेराव घालण्यात येईल आणि दोघांचा राजीनामा होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.
विद्यार्थ्यांना धमक्या नकोत, न्याय हवा, MPSCची विश्वासार्हता वाचवण्यास��ठी संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @bhimanwar @mpsc_office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @Mpsc_Andolan @degree_holders @INCMaharashtra
#MPSC #Congress #ExamScam #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@RRPSpeaks 🚨 TWO PROTESTS. NO JUSTICE.
Despite two protests over the PMC Junior Engineer (Civil) exam, our concerns remain unanswered. Mobile phones were banned, yet photos of the LIVE question paper allegedly surfaced from inside the exam centre. We now look to @RRPSpeaks for justice.
@RahulGandhi 🚨 TWO PROTESTS. NO JUSTICE.
Despite two protests over the PMC Junior Engineer (Civil) exam, our concerns remain unanswered. Mobile phones were banned, yet photos of the LIVE question paper allegedly surfaced from inside the exam centre. We now look to @RahulGandhi for justice.
आयोगाचा पेपर लीक होणे ही MPSC इतिहासातील दुर्दैवी घटना व गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा पोहचविणारी घट��ा आहे. माग���ल 20 वर्षात अशी घटना कधीच घडली नाही. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती अध्यक्ष व सचिव म्हणून निवडावी अन्यथा सरकार व MPSC ला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ऑनलाईन परीक्षेचा घाट घालण्यासाठी तर हा पेपर फोडला नसेल ना? याचाही विचार व्हायला हवा.
@CMOMaharashtra @mpsc_office @Dev_Fadnavis
@RRPSpeaks MPSC ने तक्रार आली,चौकशी केली आणि प्राथमिक ��िष्कर्ष समोर येताच भरती रद्द करून फेरपरीक्षा जाहीर केली.#PMCJE मध्ये पुरावे दिलेत,आंदोलन झाले तरी निर्णय कुठे आहे?MPSCने उमेदवारांचा वेळ वाया जाऊ दिला नाही.PMC मात्र उमेदवारांना अनिश्चिततेच्या खाईत का ढकलत आहे
@navalMH @prajytnair
#पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज��यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत ४० -४० लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे.
आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्��ी मात्र गप्प बसणार नाही.
आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस��तुस्थिती सांगावी.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर पदभरतीसाठी MPSC आयोगाकडे पाठवण्यात यावीत, ही विनंती.
हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणतीही अनावश्यक दिरंगाई न करता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.
@RVikhePatil@girishdmahajan@MahaDGIPR@Dev_Fadnavis@Devendra_Office
#WRD_CIVIL_AEE_AE_JE_CEA #जलसंपदा_विभाग #MPSC #EngineeringJobs #MegaRecruitment
हमारा MPSC का पेपर लीक हो गया, लेकिन इसे छिपाया जा रहा है।
लड़की होने के कारण हमारे ऊपर परिवार और शादी का बहुत प्रेशर रहता है। ऐसे में पेपर लीक से हमारा पूरा करियर खत्म होने का डर बना रहता है।
हम परीक्षा के लिए दिन-रात पढ़ाई करते हैं, इसलिए हम चाहते हैं कि साफ-सुथरी और पारदर्शी परीक्षा करवाई जाए।
: 'छात्रों की गूंज' कार्यक्रम में शरणी चोपड़े न��� नेता विपक्ष श्री @RahulGandhi से पेपर लीक पर बात की
📍 पुणे, महाराष्ट्र
One candidate went from 60 and 80 in recent exams to 200 out of 200 in MMRDA JE Civil. 😳
Another reportedly jumped from single digits to 196. And 13 of 16 toppers came from one Nagpur centre.
Abhijit Dipke: What magic was happening there? If jobs are being managed by setting, stop this exam drama and auction government jobs like IPL.
Aspirants: We protest for advertisement, centre, result and joining. If students fight for every basic step, when will they study?
‘रोजगार न्याय यात्रे’तून महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज! ✊
रिक्त पदांची तातडीने भरती, प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे, सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेणे आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पुण्यात ‘रोजगार न्याय यात्रा’ काढण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्री. बी. एम. संदीप आणि AICC सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी श्रीमती ��ेहाना क्रिस्टी यांनी पुणे महानगरपालिका येथे आ��दोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना ठाम पाठिंबा दिला. यात्रेत गोपाल तिवारी व अतुल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बळीराम डोळे यांच्यासह पुणे शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दिवसरात्र मेहनत करून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांन�� माफी मिळणार नाही. भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यात्रेदरम्यान सिंचन भवन येथे मुख्य अभियंता तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन युवकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि भरती प्रक्रिया पारदर्शक, गुणवत्ताधारित व भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत ��ाँग्रेसचा हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
@INCHarshsapkal @BMSandeepAICC @RayazRehana @atullondhe
@CongressRojgar
@PMCPune @CollectorPune #Dhananjay_Shinde #DhananjayShinde
पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणायचं आणि त्याच पुण्यात पेपरफुटी, परीक्षा घोटाळे आणि भरतीतील अनियमितता सुरू ठेवायची, हा चंद्रकांत पाटील यांच्या विभागाचा कारभार आहे.
@ChDadaPatil
आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्र���की शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी ��िदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रि���ा तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ ��भियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्य�� प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भ��ती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष �� गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा ���मेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.