सुधारित पेन्शन GPS व युनिफाईड पेन्शन योजना #UPS लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाव्दारे काढण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या निषेध नोंदण्याकरीता गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी , गडचिरोली तर्फे सदर शासन निर्णयाची होळी करण्यात आली...
#NoUPS_NoGPS_OnlyOPS
"आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर त्यावर
सरकारी चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका.."
- मा. उद्धव ठाकरे साहेब..
साहेबांनी दिलेला हा संदेश खरोखरच महत्वाचा आहे, काही सरकारी चमचे GPS UPS च समर्थन करताय पण महाराष्ट्रातील 7.5 लाख NPS धारक जुनी पेन्शन OPS वर ठाम आहे.
#NoUPS_NoGPS_OnlyOPS
DCPS आली - वाह वा वाह वा..
मग NPS आणली - वाह वा..वाह वा..
मग UPS आणली-वाह वा वाह वा..
मग GPS आणली - वाह वा वाह वा..
प्रत्येकवेळी सरकारची अशी वाह वाही करणारी ताटाखालची मांजरे प्रत्येक काळात होती व आहेत,पण संघर्ष शिलेदार अजूनही जुनी पेन्शन OPS वर ठाम आहेत. #NoUPS_NoGPS_OnlyOPS
ज्या पेन्शन योजनेत आमदार खासदार नाहीत, समजून घ्यायचे ती योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही.
DCPS व NPS मध्ये आमदार खासदार नव्हते,दोन्ही योजना बोगस निघाल्या..
आता UPS व GPS आलीय,त्यामध्ये पण ते नाहीत, आता समजून घ्या मग.🏴
#NoUPS_NoGPS_OnlyOPS@TV9Marathi@abpmajhatv@lokmat
📍शिर्डी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे शिर्डी येथे आयोजित पेन्शन राज्य महाअधिवेशनास उपस्थित राहून संबोधित केले.
नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना म. ना. से. नियम १९८२ व १९८४ अंतर्गत जुनी पेन्शन पूर्ववत व्हावी या प्रमुख मागणीसाठी मागील १० वर्षे ही संघटना लढा देत आहे. भाजपा सरकार नेहमीच कर्मचारीविरोधी राहिली आहे. काँग्रेस सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली, असा अपप्रचार करणाऱ्यांना आठवण करून देतो की, अटल बिहारी वाजपेयी सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली होती. देशात काँग्रेसचे शासन असणाऱ्या कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यात जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे पहिल्या कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु केली. याचप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये ही योजना सुरु करू, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.
यावेळी समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे, खा. श्री. संजय राऊत, आ. श्री. अभिजित वंजारी, आ. श्री. सुभाष देसाई, आ. श्री. मिलिंद नार्वेकर, आ. श्री. सुधाकर अडबले, श्री. सुमित शेळके आणि जुनी पेन्शन संघटनेचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि लाखो सभासद कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.