बापटला तुम्ही तर्काच्या आधारावर खोडून काढू शकत नाही. संविधानिक, कायदेशीर आणि नागरिकांच्या हिताची भूमिका मांडल्याने त्यांच्यावर ही वेळ आली. ऐतिहासिक आणि तत्कालीन संदर्भ देताना हा माणूस मागे हटत नाही. धर्म आणि परंपरेच्या नावे सुरू असलेला धुडगूस थांबला पाहिजे.
#एकबापट#लाखबापट
पुणे येथील गणेशोत्सव मंडळांनी विद्यानंद बापटांना विरोध करताना असं म्हटलंय की या बापटांना त्यांच्या गल्लीतही कुणीही कुत्रंसुद्धा विचारत नाही. हा काय युक्तिवाद झाला? म्हणजे विद्यानंद बापट किंवा कोणत्याही एका सजग आणि जागृत नागरिकाने स्वतःच्या हक्कांच्या बाजूने आणि स्वतःच्या घटनात्मक अधिकारांच्या बाजूने बोलण्याकरता रोज चार-चार-पाच-पाच लाखांच्या मोर्ची आणि मिरवणुका, डीजे वाजवत काढायला पाहिजेत का? तेव्हा सरकार त्याची दखल घेणार का? याला काय अर्थ आहे? हे काही युक्तिवाद झाले का?
पगार शासनाचा.. पण माज हिंदी चा?? का??
मागे महाराष्ट्र शब्द.. तरी हिंदीतच उत्तर का??
जनतेच्या पैशातून पगार घेता…मग जनतेच्या राज्याच्या भाषेला दुय्यम का?
महाराष्ट्रात सरकारी पदावर काम करताना मराठी भाषेला प्राधान्य देणे ही केवळ औपचारिकता नाही?
@Dev_Fadnavis#मराठी#महाराष्ट्र 🚩
मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य 🚩
महाराष्ट्राच्या १०७ हुतात्म्यांची जाहीर माफी मागणार!
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्र्यांकडून
१ वर्षाची स्थगिती.
"हुतात्म्यांनो, क्षमा असावी...
तुमच्या बलिदानानंतरही आम्हाला महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सन्मानासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्र्याच्या वतीने आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली क्षमा मागत आहोत"
रविवार, ३० ऑगस्ट २०२६
🕚 सकाळी ११.०० वा.
📍 हुतात्मा स्मारक, मुंबई
मराठी भाषा • मराठी माणूस • महाराष्ट्राचा स्वाभिमान
अमराठी लोकांच्या मतांसाठी हापापलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यांची ही लायकी … 👇🏻
दक्षिणेकडच्या नेत्यांकडून किमान स्वतःच्या भाषेचा आदर आणि प्रेम कसं करावं एवढचं मुख्यमंत्र्यांनी शिकावं …
बाकी विकास चारही बाजूला ओसंडून वाहतोय …
#मराठी#मराठीभाषा#परप्रांतीयांचीभाजपा
खारघरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हाती SIR मोहिमेचे फॉर्म असल्याचं नागरिकांनीच रंगेहात पकडल्याने निवडणूक आयोगाच्या कथित पारदर्शक SIR मोहिमेचा पर्दाफाश झाला. यामुळं SIR ही मोहीम कशी फसवी आणि नावापुरती राबवली जाते हे स्पष्ट झालं. या मोहिमेच्या माध्यमातून भाजप आपल्या पुढील विजयाचा पाया घालण्याचा कसा प्रयत्न करत आहे, हे आम्ही वारंवार सांगत आलो असून त्याला आजच्या या घटनेने एकप्रकारे पुष्टीच मिळाली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडेही विचारणा केली परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडं हात दाखवून त्यांनी आपली सुटका करून घेतली.
आता निवडणूक आयोग या भाजप कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतं, याकडे आमचं लक्ष आहे. पण या मोहिमेच्या माध्यमातून जे काही चाललं ते संविधानाच्या विरोधात असून यावर सामान्य लोकांनीही आवाज उठवला पाहिजे.
#SIR #ElectionCommission #निवडणूक_आयोग #खारघर
🆘🚨सोशल मीडियावरील हालचालींवरून लालबाग-परळ परिसरात सांप्रदायिक तणाव भडकवण्याचा, मराठी माणसांना आणि तरुणांना चिथावणी देऊन त्यांच्या ऊर्जेचा वापर मोदी राजवट वाचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
शांत राहा. संपूर्ण गणपती, नवरात्र आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात परळ-लालबागमधील भाजप-आरएसएस टोळीच्या चिथावणीला बळी पडू नका.
मोदी-शहा राजवटीला आपली प्रतिमा आणि सरकार वाचवण्यासाठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणाऱ्या एखाद्या मोठ्या घटनेची गरज आहे.
नेतन्याहूने इस्रायलमध्ये जे केले, तसेच काहीतरी भारतात करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करा आणि लक्षात ठेवा. “जश्रीरा” ही हिंदुत्ववादी दहशतवाद्यांची युद्धघोषणा आहे.
आमच्या मुंबईतील कामगार चळवळीच्या आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संपूर्ण इतिहासात ही घोषणा कधीही ऐकू आली नव्हती.
“जश्रीरा”छाप हिंदुत्ववादी दहशतवादी राजकारणाला बळी पडू नका! कृपया!!!!!! 🙏
🚨Social Media activities indicate a trend to incite communal flare up in Lalbaug-Parel, to incite the Marathi Manoos and boys and use their energies to save Modi Regime.
Stay calm. Don’t entertain BJP-RSS gang in Parel-Lalbaug during the entire Ganpati, Navaratri, Diwali festival season.
Modi-Shah Regime needs a massive diversion to save their face and Government.
They maybe trying to do in India what Netanyahu did in Israel.
Follow the ideals of Chattrapati Shivaji Maharaj and remember, JSR is a Hindutva Terrorists’ war cry.
It was never heard in the entire history of Mumbai’s labour struggle, India’s Freedom Struggle in Amchi Mumbai.
Don’t fall for JSR brand of Hindutva terrorist politics ! Please !!!!!! 🙏
मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ…
व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय.
कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे!
हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का?
आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत?
महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपविण्याचा विडाच शहा सेनेने उचलला आहे.
मुंबई-महाराष्ट्रातून थैल्या भरून-भरून दिल्लीत बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांच्छन लागेल असं वागायचं. शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय, हे महाराष्ट्र पाहतोय. #korakendra #borivali
सिंधुदुर्गातील "आंगणेवाडी जत्रा" प्रसिद्ध आहे.
या आंगणेवाडी गावात "भराडी देवी"चं भलं मोठं पॉश मंदिर आहे. पांढरा मार्बल वापरल्यामुळे ते आता जैन मंदिरासारखं दिसू लागलंय.
हे देऊळ आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर असल्याची पाटीसुद्धा देवळाबाहेर लावण्यात आली आहे.
या देवळाचा कळस सोन्याचा आहे. इतका पैसा लोकांनी दान केलाय. पण या गावात पाचवीच्या पुढे शाळा नाही. पुढील शिक्षणासाठी गावातील मुलांना गावाबाहेर जावं लागतं.
देवळापासून १०० मीटरच्या अंतरावर पाचवी पर्यंतच झेडपीची शाळा आहे. या व्यतिरिक्त दुसरी काही शिक्षणाची सोय नाही.
जत्रेला खूप गर्दी होते (८-१० लाख भाविक येतात) म्हणून मालवण नगर परिषदेने शाळेच्या बाजूला मोठी कायमस्वरूपी मुतारी बांधली आहे. ही मुतारी शाळेपेक्षाही जास्त मोठी आहे. जत्रा ३ दिवस चालते आणि फक्त याच ३ दिवसात या मुतारीचा पूर्ण वापर होतो. इतर वेळी, म्हणजेच वर्षाच्या ३६५ पैकी ३६२ दिवस ती अशीच पडून असते.
भाजप एक घाणेरडा गलिच्छ बिमारू पक्ष आहे ज्याला महाराष्ट्राचा गोबरपट्टा करायचा आहे. हे DJ वाजवणं स्टेज वर हुल्लडबाजी आणि पोरी बायका नाचवणे हि गोबरपट्ट्यातली संस्कृती ह्यांना महाराष्ट्रात आणायची आहे. मोठी गोष्ट म्हणजे हि मुलं ज्यांना नोकऱ्या नाहीत हाताला काम नाही अश्याना ह्यांनी स्वतःच्या तैनाती फौजा बनवलेलं आहे. मराठी माणसाला कमालीची दक्षता घेण्याची गरज आहे.