MPSC च्या ऑनलाइन परीक्षा, CBT पद्धत आणि नॉर्मलायझेशन विरोधातील विद्यार्थ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची दखल आता प्रमुख माध्यमांनीही घेण्यास सुरुवात केली आहे.
आज मुंबई तकने काँग्रेस पक्षाच्या आंदोलनावर सविस्तर विशेष कार्यक्रम प्रसारित केला आहे. लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या या पत्रकारितेबद्दल मुंबई तकचे मनःपूर्वक आभार.
हा लढा कोणत्याही व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून महाराष्ट्रातील लाखो होतकरू विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांचा आहे. आमच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत:
• MPSC च्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीने घ्याव्यात.
• CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धती तात्काळ रद्द करावी.
• परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि समान संधी सुनिश्चित करावी.
• परीक्षा पद्धतीतील कोणताही मूलभूत बदल करण्यापूर्वी विद्यार्थी, तज्ज्ञ, प्राध्यापक आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा करावी.
राज्यभर लातूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि इतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. हा संघर्ष केवळ एका परीक्षेचा नाही, तर महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेवरील विश्वास टिकवण्याचा आहे.
मुंबई तकचा हा विशेष कार्यक्रम अवश्य पाहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@mpsc_office@DalviAaba@AbhijitKaran25@mumbaitak@CongressRojgar
https://t.co/rCblxCgExb
यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या #MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली. तसंच नॉर्मलायझेशनचा मुद्दाही उपस्थित करुन विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ही पद्धत हटवण्याची मागणी केली. सरकारने #MPSC च्या माध्यमातून हा निर्णय बदलला नाही तर विद्यार्थ्यांचं अधिक मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी दिला.
#पावसाळी_अधिवेशन_२०२६
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न
MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलन ठिकाणी मोठा फौज फाटा आणि मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline
@mybmc ,@RRPSpeaks@mieknathshinde bmc ची अभियंता संवर्गाची JE ची परीक्षा होऊन 6 महिने उलटले परंतु bmc ने परीक्षेचे निकाल काय लावले नाहीत कोर्टाने कुठलाही स्टे लावलेला नसताना bmc रिझल्ट का लावत नाही bmc नुसती चालढकल करून वेळकाढू पना करत आहे कृपया लवकरात लवकर result लाऊन दिलासा
@Dev_Fadnavis जी जर सदर बाब संबधित मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त यांनी योग्य वेळी गांभीर्याने घेतली असती तर कुठलीही अडचण आली नसती पण सांगायचे कोणाला?@mieknathshinde जी आपण नेहमी सांगताय की सरकार सामान्य गरीब माणसांच आहे? ९ महीने उलटून गेल्यावर सुध्दा @mybmc ला जाग येत नसेल आणी विषयाचं गांभीर्य न समजणार्या संबंधित मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी समस्त परीक्षार्थी कडून केली जात आहे @AjitPawarSpeaks जी ही सर्व मुलं महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी,कामगार व शेतकऱ्यांची आहेत. आपण ग्रामीण भागातील आहात त्यामुळं या सर्व गोष्टींची कल्पना आपल्याला आहे. पोरांना मुंबई गाठायची म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. पोरं नैराश्याने ग्रासलेले आहेत, देव न करो पण जर कोणत्या परीक्षार्थीन चुकीचे पाऊल उचलले तर त्याची जबाबदारी @mybmc चीच असेल याची कृपया नोंद घ्यावी. @DGPMaharashtra आपणास ही या निमित्ताने अवगत करीत आहोत. कृपया यात कोणीही राजकारण आणू नये. सदर प्रकरणात मा. मुंबई उच्च न्यायालयाने @mybmc ला योग्य तो निर्णय घेण्याची मुभा दिली असताना सुद्धा हा वेळकाढूपणा परीक्षार्थीनच्या चिंतेचा विषय झाला आहे .
धन्यवाद!
प्रति,
मा. भूषण गगरणी
आयुक्त,
बृहन्मुंबई महानगरपालिका,
मुंबई.
विषय : क्र. नअ / १३२१३ / आसेप्र दि.२५.११.२०२४ अन्वये घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व यांत्रिकी) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत.
महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत दिनांक ०२ मार्च व ०८ मार्च २०२५ रोजी कनिष्ठ अभियंता (Civil व Mechanical) पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला आता पाच महिने उलटून गेले आहेत, तरीदेखील अद्याप या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर आणि परीक्षार्थींच्या भविष्यासाठी अडचणीत टाकणारी आहे.
उमेदवारांनी ही परीक्षा देण्यासाठी नियोजनपूर्वक मेहनत केली असून प्रत्येक उमेदवाराने ₹१००० इतके परीक्षा शुल्क देखील भरले आहे. तरीदेखील ना निकाल जाहीर झालेला आहे, ना गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
परीक्षार्थींकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकाल रखडण्याचे कारण काही न्यायालयीन प्रकरणे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कुठल्याही अधिकृत न्यायालयीन स्थगिती आदेशाचा आधार सध्या तरी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत निकाल जाहीर करण्यात होत असलेला विलंब हा विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावास कारणीभूत ठरत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वोच्च नागरी संस्थांपैकी एक असून, येथे नोकरी मिळवण्याचे स्वप्न घेणारे असंख्य गरीब, ग्रामीण व मेहनती परीक्षार्थी आजही या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या आशा आणि भविष्याचा विचार करून खालील बाबी तातडीने पार पाडाव्यात अशी आपणास विनंती आहे:
1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य व यांत्रिकी) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करण्यात यावा.
2.सर्व उमेदवारांना गुण (Mark list) उपलब्ध करून देण्यात यावी.
3.निकाल रखडण्यामागची कारणे स्पष्ट व पारदर्शकपणे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावीत.
आपण परीक्षार्थींच्या हक्कांचा विचार करून त्वरित निर्णय घ्याल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@mybmc@INCHarshsapkal@degree_holders@Mpsc_Andolan@INCMaharashtra
'इंजिनिअर्स असोसिएशन' या अभियंत्यांच्या संघटनेच्या वतीने पुण्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. जलसंपदा,जलसंधारण विभाग आणि इतर विभागात ४६०० हून अधिक अभियंता पदाच्या भरत्या रखडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या जागा भरण्यासंबंधीचे वेळापत्रक नाही आले तर छत्रपती संभाजीनगर येथील 'वाल्मी' संस्थेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. रिक्त जागा न भरल्याने संबंधित खात्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच याखेरीज पात्र उमेदवारांवर देखील अन्याय होत आहे. तरुण अभियंत्यांमधील रोष शासनाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रकुशल मनुष्यबळ असून राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यांच्या अंगभूत कार्यक्षमतेचा यथायोग्य वापर करून घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण या आंदोलनाची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शासनाच्या अखत्यारीतील सर्व खात्यांची रिक्त पदे भरण्यासंबंधीची प्रक्रिया तातडीने सुरु करावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@degree_holders
जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिरी मॅडम यांना निवेदन देण्यात आले. जलसंपदा आणि जलसंधारण विभागामार्फत लवकरात लवकर आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा करतो. विशेष आभार बंड गार्डन पोलिस स्टेशन चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग 🙏
#WRD_JE#WCD_Recruitment
कालचा SE निकाल IBPS Format मध्ये द्या. #BMC_SE खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. असं का ? @mybmc
BMC SE निकालावरून सरकारच्या अपारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह!
7 मे रोजी BMC ने जाहीर केलेला Assistant Engineer (AE) निकाल IBPS च्या अधिकृत आणि पारदर्शक Format मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या निकालात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, श्रेणी, गुण, कट-ऑफ – सर्व काही व्यवस्थित आणि तपशीलवार स्वरूपात नमूद होते. यामुळे उमेदवारांना स्वतःचा निकाल समजून घेणे आणि निवड प्रक्रियेबाबत विश्वास ठेवणे शक्य झाले.
मात्र, 12 जून रोजी जाहीर करण्यात आलेला Sub Engineer (Mechanical, Electrical) निकाल केवळ एका साध्या Excel शीट स्वरूपात प्रसिद्ध केला गेला आहे. यात ना गुण आहेत, ना श्रेणी, ना कट-ऑफ, ना कुठलेही अधिकृत तपशील. केवळ नाव आणि रोल नंबर!
हेच का आहे ‘सुशासन’?
सरकार एकाच भरती प्रक्रियेतील दोन वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे निकष वापरत असेल, तर पारदर्शकतेचा आणि विश्वासार्हतेचा सर्वस्वी अभाव वाटतो. ही गोष्ट केवळ गोंधळाची नाही, तर संशयास्पद आणि गंभीर आहे.
@mybmc ने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की –
➡️ एकाच परीक्षेसाठी दोन वेगवेगळे निकाल Format का?
➡️ SE पदासाठी गुण, कट-ऑफ, श्रेणी का लपवण्यात आले?
➡️ जर AE निकाल IBPS Format मध्ये शक्य आहे, तर SE निकाल तसे का नाही?
हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नाही, तर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि नीतिमत्ता हरवत असल्याचे संकेत आहेत.
आमचा स्पष्ट आग्रह आहे –
➡️ @mybmc ने त्वरित या बाबत खुलासा करावा
➡️ SE (Mechanical, Electrical) निकाल देखील IBPS च्या अधिकृत Format मध्ये पुनः प्रकाशित करावा
सरकारने तरुणांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे. अन्यथा #BMC_SE भरतीतील विश्वासार्हतेवर कायमचे काळे डाग उमटतील.
#BMC_SE
#SE_Result_Issue
#IBPSFormat
#सरकार_जवाब_दो
#YouthDeservesTransparency
#StopPlayingWithCareers
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता भरतीत काही लोक गैरप्रकार करण्याच्या तयारीत आहेत.
तशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या दलालांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
@mybmc@CMOMaharashtra
@suvishelke मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा खाजगी केंद्रांवर न घेता सरकारमान्य TCS Ion या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर घेण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन त्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@mybmc@AjitPawarSpeaks
@suvishelke@mybmc फक्त exam मधे scam होऊ द्या मग सांगतो तुम्हाला आणि commissoner भूषण गागाराणी यांना आपण आपल्या मनमानी ने आम्हाला सेंटर दिले याचा परिणाम भोगावा लागेल जर पेपर leaked zala तर
@suvishelke याच पार्शवभूमीवर BMC SE JE चे Exams मध्ये सुद्धा असेच काहीं लोक active असू शकतात
म्हणून मागील ३०-४० दिवसापासन परीक्षार्थी अधिकृत TCS ION CENTRE chi मागणी करत आहे
तरी अजून काही Action @mybmc@mybmc
कडून घेताना दिसत नाही
Please विद्यार्थ्यांचं अंत पाहू नये 🙏