मराठी माणसाला अपेक्षित असलेला संयुक्त महाराष्ट्र अजूनही अस्तित्वात आलेला नाही. संयुक्त महाराष्ट्राची भळभळती जखम अजूनही तशीच आहे. इथला #मराठी माणूस आजही स्वराज्यात येण्यासाठी धडपडतोय. #बेळगावसहसंयुक्तमहाराष्ट्र https://t.co/AITH62Xjh9
आपले मत माय मराठीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी, मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी. समितीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. जय महाराष्ट्र #बेळगावमहाराष्ट्राचे🚩
आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुका होत आहेत. पंत प्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे. हा 2024साठी शुभ शकुन आहे.
दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली.
स्वतःला शिवसेना म्हवणून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे..मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील. जय महाराष्ट्र!
@mieknathshinde@AUThackeray@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@mesbelgaum
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.
तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.
मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.
ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे.
ही संधी दवडू नका.
आपला
राज ठाकरे
आमचे साहेब म्हणजे तारणहार! मराठीचा जन्मच मुळी त्यांच्या नवसाने झाला! बापड्यांनो, मग मराठी भाषिकांच्या कानडी पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी एकदाही साहेब का पुढं येत नाही? #खोकेसे#निषेध#म 🏴
कर्नाटक सरकारने गळचेपी केली तरी आजही बेळगावातील लोकांनी लोकशाही मार्गाने लढा जिवंत ठेवला आहे. सीमा भागातील चौथी-पाचवी पीढी लढतेय, तीही तितक्याच ताकदीने. त्यांच्या ताकदीला आपण सामर्थ्य देऊयात. बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपली ही लढाई सुरू राहील.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही बेळगाव, कारवार, निपाणी आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहेत. आजही येथील बांधवांना दीपोत्सवच्या या प्रकाशमय पर्वादरम्यान काळा दिवस साजरा करावा लागत आहे हे आपले दुर्दैव.
मुंबईला खासकरून मराठी माणसाला कमी लेखून आणि त्यांचा मर्मावर पाय ठेवून यांनी चांगलं नाही केलं...यांच्या अश्या मराठी द्रोह्याने आणि राजकारण्यांच्या गहाळपणाने उद्या मुंबई चा जर बेळगांव झाला तर महाराष्ट्र यांना कधीच माफ नाही करणार...वेळीच सुधरा सर्वांनी 🙏 😖
शिवसेना पक्षप्रमुख, सीमावासीयांचे अढळ प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐 @OfficeofUT#शिवसेना
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. सीमालढ्यासाठी आपण प्रसंगी जेलमध्ये गेला आहात. आपल्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्न लवकर सुटेल अशी आम्हा सीमावासीयांना आशा आहे. जय महाराष्ट्र. 🚩 @mieknathshinde
१ जून १९८६ च्या कन्नड सक्ती विरुद्ध झालेल्या आंदोलनात माय मराठीसाठी आपल्या प्राणांची सर्वोच्च आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन💐💐
🚩🚩 व्यर्थ ना हो बलिदान🚩🚩