Mpsc Rajya seva 2019_Appointment 413
We respect Hon'ble Supreme court verdict dated 5th May 21
We accept Govt resolution dated 15 July 21
मा.ना.अजितदादा आपण आमचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आपले शतशः आभार...
प्रसारमाध्यमांचेही विशेष आभार
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
राज्यसेवा 2019 मधील प्रलंबित नियुक्त्यांवर शासनाने लवकर निर्णय घ्यावा, यासाठी @abhishekbokey यांनी शासनाकडे पाठपुरवठा केला. त्याबद्दल @abhishekbokey आणि @SomnathAnkushL1 यांचे आभार.
रखडलेल्या नियुक्त्यांबाबत @AjitPawarSpeaks अंतिम निर्णय कधी घेणार? का फक्त चर्चाच करणार? विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरही सरकार अंतिम निर्णय घेत नाही. कोणताही कायदेशीर मुद्दा शिल्लक राहिला नाही. तर नियुक्त्या का रखडल्या आहेत?
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
भंगार विकून मुलाला शिकवले. मुलाने संधीचे सोने केले आणि थेट नायब तहसिलदार झाला. पण दुर्दैव असे की तब्बल 1 वर्ष झाले तरी नियुक्ती नाही मिळाली. आता मनरेगा तून (MNREGS) तरी रोजगार द्या अशी मागणी करावी लागते आहे.
#MPSC_JOINING_2019@CMOMaharashtra@AshokChavanINC@RajThackeray
भंगार विकून मुलाला शिकवले. मुलाने संधीचे सोने केले आणि थेट नायब तहसिलदार झाला. पण दुर्दैव असे की तब्बल 1 वर्ष झाले तरी नियुक्ती नाही मिळाली. आता मनरेगा तून (MNREGS) तरी रोजगार द्या अशी मागणी करावी लागते आहे.
#MPSC_JOINING_2019#MPSC#मराठी#महाराष्ट्र#राज्यसेवा#Shame
जीवतोड मेहनत घेऊन, स्वतःला सिद्ध करूनही आज ह्या अधिकाऱ्यावर मनरेगा मध्ये काम करण्याची वेळ आणल्याबद्दल सरकारचे अभिनंदन !
ह्या मुलाची चूक काय ?
त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावून घेण्याचा तुम्हाला अधिकार काय ?
शिवरायांच्या नावाने राज्य चालवतात ना ?
मग अन्याय का ?
@RRPSpeaks UPSC पास होऊन चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटून आपल्याला आनंद होतो आणि तुमचीच सत्ता असलेल्या राज्यात MPSC पास मुलांकडे बघायला आपल्याला वेळ नाही !
आपण स्वतः एक युवक असून आपल्याला आपल्याच राज्यातील युवकांचे प्रश्न का नाही लक्ष्यात येत?
कृपया लक्ष द्या 🙏
#MPSC_JOINING_2019
@RRPSpeaks MPSC राज्यसेवा 2019 मधून निवड झालेले आम्ही उमेदवारही लोकाभिमुख कामे करण्यास उत्सुक आहोत. पण अंतिम निकाल लागूनही मागील एक वर्षापासून आमचं हे स्वप्न स्वप्नच बनून राहिलय. आता नियुक्त्या द्या साहेब. आपणच सरकार आहात .आता नुसत्या विनंत्या नको. कृपया नियुक्त्या देण्यास शासनास भाग पाडणे
राज्य सरकारने नियुक्त्यांचा अभ्यास करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ अजून मागितला आहे. 413 शिफारस पात्र उमेदवारांवर होणारा अन्याय कधी संपेल? सर्व शिफारसपात्र उमेदवारांना त्यांच्या पदांवर नियुक्त्या लवकर मिळाल्याच पाहिजेत. तरुणांना न्याय कधी मिळेल?
@CMOMaharashtra
या फोटोतील प्रत्येकाकडे उपजिल्हाधिकारी/तहसिलदार/BDO आणि इतर पोस्ट आहेत. MPSC 2019चा फायनल रिझल्ट जाहीर होऊन आज (19जून) एक वर्ष होतंय. गेल्यावर्षी याच दिवशी ही मुलं गुलालाने माखली होती. त्यांच्या आईवडिलांचा आनंद गगणात मावत नव्हता. पण अशा 413 उमेदवारांना नियुक्तीच दिली नाहीये.#MPSC