आज माझा जवळचा मित्र, PSI ची तयारी करणारा अमर रामचंद्र मोहिते याने आत्महत्या करून जीवन संपविले.मित्रांनो MPSC मध्ये येऊन ताणतणाव,नैराश्य येणारच त्याला सामोरे जाऊनच आपल्याला जिंकायचे आहे.MPSC मधील आत्महत्या चिंतेचा विषय असून आपण वेळीच सावरले पाहिजे.
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
सतत होणारा अन्याय... आणि त्याविरूद्ध आवाज काढूनही पदरी निराशाच येते तेव्हा; जीवन नको से होते. २१८५ SEBC मधून निवड झालेली अनेक मराठा मुल आज नैराश्यात आहेत. न्याय नाहि मिळाला तर ते असे टोकाचे पाऊले उचलू लागली आहेत. @CMOMaharashtra माय बाप सरकारने लवकर न्याय द्यावा. @AjitPawarSpeaks
ही तर सरकार प्रेरित हत्या !
#MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं
६ महिन्यानंतर मुलाखतीच्या यादीत नाव आलंय..
स्वप्नील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा बळी ठरल्याचं खुद्द सरकारनं कबूल केलं..
या खुनी सरकारवरच कलम 302 चा गुन्हा दाखल करावा..
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आज असते तर टॉमी आणि तत्सम पत्रकारांना ओल्या बांबूने झोडपले असते.
पत्रकारिता सोडून नेत्यांची हुजरेगिरी करण्यात हे धन्यता मानतात
MPSC/आरोग्य भरती/MHADA सारखा प्रचंड गोंधळ राज्यात सुरू असतांना ह्यांच भलतंच सुरू असतं.
महापुरुषांची नावे, पुरोगामी, प्रगतिशील, विकास वगैरे फक्त सामान्यांना मूर्ख बनविण्यासाठी वापरले जाणारे जुमले आहेत.
स्वतः आणि स्वतःच्या पुढील पिढीचे भवितव्य एवढेच यांच्या priorities आहेत.
ब्रेकिंग न्यूज
MPSC चा syllabus बदलला.
पूर्व, मुख्य व मुलाखत हे तीन टप्पे पास झाल्यानंतर joining साठी 'आंदोलन' हा नवीन विषय समाविष्ट. 'आंदोलन' विषयाची परीक्षा सामान्य प्रशासन विभाग घेईल. निकालानंतर ते 1.5 ते 2 वर्ष चालू शकते
धन्यवाद @CMOMaharashtra@bharanemamaNCP@OfficeofUT
एकतर परीक्षा घ्यायला जमत नाही
घेतली तर पेपर फोडता
गुणवंतांना नियुक्त्या द्यायला जमत नाही
राज्यातील सामान्यांच्या मुलाबाळांनी फक्त आत्महत्या करायच्या का ?
काय म्हणून तुम्ही तीन पक्ष एकत्र आलेत?
तुमच्यावर विश्वास ठेवावा तरी कसा?
स्वार्थ सोडा आणि राज्य चालवा आता तरी!
#MPSC
पुरोगामीत्वाच्या, महाविकासाच्या नावाखाली स्वतःची आणि आपल्या पोरबाळांची सोय करणाऱ्या ढोंगी लोकांपेक्षा फॅसिस्ट म्हटल्या जाणारे परवडले.
किमान एवढे ढोंगी, भंपक आणि खोटारडे नसतात.
@AjitPawarSpeaks sir,hope u remember u promised to appoint 6 members of mpsc till 31st July nd to make mpsc 13 member body like KPSC. Now 31st Dec is coming why is ur govt failing to fill even 6 members to mpsc.Why ain't u sticking to ur words spoken in Leg Assembly @RRPSpeaks
राजकारणात यायला किमान संविधानाचा अभ्यास कंपल्सरी करायला हवा.
इथे गट अ ते गट ड च्या पदांसाठी राज्यघटना वाचावी लागते. आमच्या लोकप्रतिनिधींना एवढं सुद्धा बेसिक कळू नये का ?
आरोग्य खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यानं पेपर फुटीची महान परंपरा पुढे सुरू ठेवलीय… मंत्र्यांना रात्रीत पेपर रद्द करावा लागला …
विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय मानसिक छळ झालाय…
गावावरून हजारो रुपये खर्च करून पुणे मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई मिळणार का ?
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत
आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
राज्यातली सरकारी नोकरभरती प्रक्रिया धड होत नाहीय. संध्याकाळी, मध्यरात्री परीक्षा रद्द कराव्या लागत आहेत. तरीही सरकार ढीम्म आहे. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या प्रश्नावर आज बोलायचं टाळलं, तर उद्याचं भविष्य चुरगाळल्यासारखं आहे. #भरतीचा_घोळ_अधिवेशनात_चर्चा#परिक्षांचाधंदाथांबवा