या सरकार ला फक्त इलेक्शन मुळे भरती घेयची आहे असं वाटतं आहे. यात किती मुलांचे नुकसान होत आहे हे त्यांना कुठे समजणार. सोलापूर मध्ये पाय घसरून एका मुलीचा पाय तुटला आता तिचे जे आयुष्याचे नुकसान झालं आहे ते कोण भरून देईल. सगळा बेरोजगार युवकांच्या आयुष्याचा खेळ लावला आहे. सर्व जण बोलत होते थोड्या दिवस भरती पुढे ढकला पण यांना वाटलं असेल पुढे निवडणूक आहे नको असाच रेटून घेऊ म्हणून. अजून हि वेळ गेली नाहीये भरती थांबवा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@MumbaiPolice@CMOMaharashtra@RRPSpeaks@NANA_PATOLE@Ravikanttupkar1@MahaDGIPR@AUThackeray @Dhananjay_AAP
पीएसआय - २०२० जाहिरातीतील राखीव ठेवलेल्या EWS कोट्यातील ६५ उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ फेब्रुवारी, २०२० रोजी PSI च्या ६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. पुढे ५ मे, २०२१ रोजी तत्कालीन आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण (SEBC) रद्द झाल्याने आयोगाने SEBC साठी राखीव असणारी पदे खुल्या प्रवर्गात समाविष्ठ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली. परीक्षार्थीनी त्यापूर्वीच अर्ज सादर केले असल्याने SEBC परीक्षार्थींना नव्याने खुला किंवा EWS यापैकी एक प्रवर्ग निवडण्याची संधी दिली गेली ज्यानुसार परीक्षार्थींनी प्रवर्ग निवडला व परीक्षा दिली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ६५० पदांसाठी निवड यादी जाहीर करणे अपेक्षित असताना EWS प्रवर्गातील ६५ पदे राखीव ठेऊन ५८३ पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना निवेदन देऊन EWS कोट्यातील ६५ पदांची निवड यादी तात्काळ प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती देण्यात यावी अशी आग्रही विनंती त्यांना केली. मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती रखडलेल्या ३७०० +_मराठा तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण करून न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केलेले आहे, त्यामुळे खुल्या प्रवर्गातील ६५ मुलांवरील अन्यायही सरकार नक्की दूर करेल असा विश्वास आहे.
शासनाला केवळ जाहिराती देण्यात स्वारस्य आहे, बाकी प्रत्यक्षात काय होतंय काय नाही याच्याशी काही घेणे देणे नाही. आज कोट्यवधी रुपये खर्चून वृत्तपत्रात शासनाने जाहिरात दिलीय, त्यात शासन #SEBC_to_EWS च्या #रखडलेल्या_नियुक्त्या दिल्या असल्याचं सांगत आहे.
प्रत्यक्षात मात्र, #पोलिस_उपनिरिक्षक-२०२० चे ६५ मराठा उमेदवार गेल्या ११ दिवसांपासुन #SEBC_to_EWS केस लवकरात लवकर मिटवून निकाल जाहीर करा या मागणीकरता बेमुदत उपोषण करत आहेत, परंतु शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही.
१. कर सहायक-२०१९ :-१२ पदे
२. वनसेवा-२०१९ :- ७ पदे
३. अभियांत्रिकी सेवा-२०१९ :- ९४ पदे
४. अभियांत्रिकी सेवा-२०२०:- २१७ पदे
५. कनिष्ठ अभियंता-२०१९ (जलसंपदा विभाग) :- ५२ पदे
६. दंतशल्यचिकित्सक (पुणे महानगरपालिका) :-१ पद
७. PSI-२०२०:- ६५ पदे
८. महावितरण विद्युत सहायक-२०१९ :- २८२ पदे
अशा जवळपास ७३० हून अधिक पदांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, परंतु शासनने अद्यापही दखल घेतलेली नाही.
वास्तविक न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून नियुक्त्या देता येऊ शकतात, परंतु सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. तांत्रिक आणि न्यायालयीन बाबींचा फटका या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत असून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
प्रत्येक वेळेस शेकडो कि.मी.चा प्रवास करून आझाद मैदानावर येऊन उन्हापावसात आंदोलन करणे या विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांप्रती सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, ही नम्र विनंती.
@mieknathshinde
♦️ सर्व प्रथम धन्यवाद @RRPSpeaks दादा आपण हा मुद्दा मुख्यमंत्री @CMOMaharashtra
यांच्या पर्यंत मांडला..🙏
👉 खालील निर्णय सरकार च्या वतीने लवकरात लवकर लागू करावा हीच अपेक्षा..
एकदा रेजिस्ट्रेशन केल्यावर ते रेजिस्ट्रेशन त्या आर्थिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा करिता लागू करावे, यामुळे परीक्षा साठी आकारल्या जाणाऱ्या शुल्क मधून विध्यार्थी वर्गाला दिलासा मिळेल.. या प्रश्न बाबतीत सरकार कडून काहीतरी सकारात्मक निर्णय येईल हीच अपेक्षा ठेऊयात.. 🙏🙏
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks
लिपिक टंकलेखक साठी आयोगाने APPOINTING AUTHORITY नुसार कटऑफ लावणार अस जाहीर केलं आहे.
पण या मध्ये खूप त्रुटी आहेत.
म्हणून दुय्यम मंडल साठी एक आणि बृहन्मुंबई साठी एक असे दोनच कटऑफ आयोगाने लावावेत या साठी GAD ने तसे शासन निर्णय मध्ये बदल करावे.
#लिपिककटऑफ@CMOMaharashtra
#PSI 2020_provisional list
#PSI 2021_PT Date Declare
मा.@mpsc_office@Drsuvarnas PSI 2020 सदर प्रक्रियेला 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सदर परिक्षेचा निकाल मा. न्यायनिर्णयाचे आधिन राहून निकाल घोषित करण्यास हरकत नसावी. तरी त्वरित Provisional निकाल लावावा ही विनंती🙏
#PSI २०२० मध्ये लेखी १६०, फिजिकल १००, मुलाखत टॉप करणाऱ्या पोराला गावाकडे हे खोटं बोलतय म्हणुन चेष्टा करत आहेत. कोरोना, आरक्षण, न्यायालये अशी खोटं कारणं सांगून वेळ मारून नेतोय असं घरच्यांना पण वाटायला लागलंय. राज्याची सुरक्षा करायला निघालेला हा गडी स्वतः मात्र असुरक्षित झालाय...
सहा सहा महिने निकाल रखडवणाऱ्या आयोगाने दोन तासात लीक झालेले हॉल तिकीट आणि फुटलेल्या पेपरचे खंडन केले. एवढी गतिमानता परीक्षा आणि निकालात कधीच नसते. एवढे सगळे होऊनही आज प्रत्येकाच्या मनात पेपर फुटला आहे / नाही याची शंका आहेच. त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळण्याची शक्यता नाहीच
#MPSC
@mpsc_office महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र लीक झाले आहेत.एका telegram group वरती हा डाटा उपलब्ध आहे तसेच त्या ग्रुप ने 2023 प्रश्नपत्रिका जवळ असल्याचा दावा केला असून आयोगाने तात्काळ कारवाई करावी.
#COMBINE2023
#MPSC करणाऱ्या पोरांवर टीका करणाऱ्यांनी इकडे पण लक्ष द्या. २०२० च्या जानेवारीत आलेल्या #PSI परीक्षेचा अंतिम निकाल अजुन नाही. अर्ज भरताना तिशीचा असणारा पोरगा आज पस्तिशीचा झालाय. कोर्ट कचेऱ्या पिच्छा सोडायला तयार नाही. २०२४ ची निवडणूक आली पण अजुन परीक्षेचा निकाल नाही.
कागदांचा खेळ
PSI 2020 general merit list न्यायलयाच्या आधीन राहून आपला result लावायला काहीच हरकत नाही जे होईल ते आम्ही सोसायला तयार आहे .जशी अग्री चा result लावण्यासाठी नोटिफिकेटीन काढलं तस काढून आपला result लावायला काही हरकत नाही...2020,2021,2022,2023 कुटपर्यंत वाट पाहायची...... Psi 2020
@AdvYashomatiINC@supriya_sule
MPSC आयोजित COMBINE 2022 पूर्व परीक्षा निकाल 6 महिने झाले अजून जाहीर नाही ?
आयोगाने अभिप्राय घेत आहोत अस कारण दिलेलं आहे. पण अभिप्राय घेण्यासाठी किती वेळ घ्यावा?
याची कालमर्यादा निश्चित नाही का?
वय वाढत चालाय ?#COMBINE2022 निकाल लवकर द्या.
२०२० ची PSI गुणवत्ता यादी न्यायालयात अडकली असेल तर सरकाचा विधी आणि न्याय विभाग काय करतोय? चार वर्षापासून ही भरती प्रक्रिया सुरु असून पोरांच्या भविष्याशी खेळायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. मुलाखतींना झालेल्या उशिरामुळे स्वप्नील लोणकरची आत्महत्या व्यवस्था विसरली काय?
@Dev_Fadnavis