मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री साहेब,
क्लर्क 2023 च्या मुलांनी कोर्ट केस मुळे एवढ्या यातना सहन केल्या आहेत आता तुमच्या कार्यक्रमामुळे नियुक्ती साठी विलंब करू नका. तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#महाराष्ट्र
👉 राज्य शासनामार्फत एकाचवेळी सुमारे १०,००० अनुकंपाधारक उमेदवार व एमपीएससी मार्फत निवड झालेले ६,५०० लिपिकवर्गीय उमेदवार असे एकूण १६,५०० नवीन कर्मचारी राज्य शासनाच्या सेवेत होणार रुजू.
प्रथमच व्यापक भरती प्रक्रिया पूर्णत्वास.
@CMOMaharashtra@MahaDGIPR@cbawankule
मा. आयोग आपण 13 मे या दिवशी प्रसिद्ध केले की क्लर्क अंतिम निकाल जून च्या पहिल्या आठवड्यात येईल. आज आठवड्याचा शेवटचा दिवस आज निकाल जाहीर करावा. आपण दिलेला शब्द आपण पाळावा ही विनंती.
@mpsc_office@Suvarnakharat4@CMOMaharashtra@LoksattaLive
मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
उद्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
. @mpsc_office च्या कारभाराचे वाभाडे काढणारी & स्पर्धा परीक्षार्थींच्या मनातील भावना व्यक्त करणारी कविता व्हायरल झाली आहे.
आयोगानं फक्तं UPSC चा अभ्यासक्रम कॉपी करून भागणार नाही, तर UPSC प्रमाणे कारभार पण गतिमान करायला हवा.🙏
गट ब पूर्व 2024 निकाल कधी लागणार?
विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आयोग कधी विचार करणार?
मुख्य परिक्षेला आयोग किती दिवस देणार?
एक निकाल तयार करण्यासाठी 2 महिने लागत आहे का?
बदल आवश्यक..
लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. एवढी विनंती.
@AbhiPawarBJP@mpsc_office@CMOMaharashtra
महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024
निकाल जाहीर व्हायला उशीर होणार असेल तर आयोगाने तसे प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
प्रति,
डॉ. सुवर्णा खरात
सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
महाराष्ट्र राज्य,
मुंबई
विषय : दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या संयुक्त गट ब परीक्षेचा निकाल तत्काळ जाहीर करण्याबाबत.
महोदया,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा पार पडली. आज या परीक्षेला तब्बल ८६ दिवस पूर्ण होत आले असूनही निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.
निकाल वेळेवर जाहीर न झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणाव, अनिश्चितता आणि अस्वस्थता पसरली आहे. निकाल विलंबामुळे विद्यार्थ्यांचे पुढील नियोजन अडचणीत आले आहे. निकाल जाहीर झाल्यास,
•अपात्र ठरलेले विद्यार्थी वेळीच बॅकअप पर्याय निवडू शकतात,
•इतर स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करू शकतात,
•तसेच पुढील परीक्षेची ठोस तयारीही करू शकतात.
परंतु, निकाल प्रलंबित राहिल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे अमूल्य दिवस वाया जात आहेत आणि मानसिक त्रास वाढत आहे. आयोगावर विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने निकाल जाहीर करणे आवश्यक आहे.
तरी, आपण या संदर्भात तातडीने कारवाई करून संयुक्त गट ब परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा, ही नम्र विनंती.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@Drsuvarnas@INCHarshsapkal@INCMaharashtra@mpsc_office@Mpsc_Andolan @degree_holders
#CombineResult
@AJAM_18@mpsc_office प्रत्येक निकाल ३५-४० दिवस राहिले तेव्हाच लावणार हे काय बरोबर नाही @mpsc_office . काठावरील विद्यार्थी किती मानसिक तणावातून जातात याची आपणास कल्पना असावी. स्वायत्ततेचा वापर सक्षमीकरणासाठी करावा , खच्चीकरणासाठी नव्हे.
मा. @mpsc_office
4 मार्च 2025 रोजी जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आली, पण अजून पर्यंत तरी 60 दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर नाही.
काम होत नाहीयेत की करावं वाटत नाहीयेत आयोगाने सांगावे ?
#COMBINE24PRERESULT
मा. @mpsc_office विनंती आहे की लिपिक टंकलेखक 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी लवकरात लवकर जाहीर करावी. जाहिरात येऊन जवळपास 2 वर्षे पूर्ण होतील अजून प्रकिया पूर्ण झाली नाही.
उमेदवारांचे उमेदीचे वर्षे वाया चालले आहेत, कृपया या आठवड्यात यादी जाहीर करावी.
@AbhiPawarBJP@Drsuvarnas
PSI जागा आयोगाकडे येऊन परत जातात शासन झोपेत आहे का? सामान्य उमेदवारांचे प्रश्न ऐकणार तरी कोण ?
आता कोणत्याही क्षणी COMBINE 2024 पूर्व परीक्षा निकाल येईल.... मग जागा वाढ तर हवेतच राहील.....जरा लक्ष दिले शासनाने तर उमेदवार खुश होतील...#PSI2024जागावाढ@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.@mpsc_office STI ASO SR वेळी जो घोळ घातला ज्यामुळे 9-9 वेळा निकाल लावावा लागला तीच चूक पुन्हा काल कर सहायक निकालात आपण केली आहे...पसंतीक्रम घेणे आवश्यक असताना सुध्दा तसे न करता तात्पुरती निवड यादी जाहीर केली तेच उमेदवार पुन्हा लिपिक पदी येणार मग पुन्हा त्यांच्या मागे OPTING OUT साठी फिरत बसायचं का इतर उमेदवारांनी ? एकाच परीक्षेतून एका उमेदवाराला एक पद मिळेल अशी सोय करण्याची जबाबदारी आयोगाची आहे ....उमेदवारांनी यासाठी धावपळ करणे अपेक्षित नाही.
यातून पैशाचे गैरव्यवहार होतात OPTING OUT साठी पैसे मागितल्या जातात आयोगाला हेच व्हाव अस अपेक्षित असेल तर तस जाहीर करावं?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@avchite_amol@_prashantkadam@abpmajhatv
महसूल सहाय्यक पूर्व परीक्षा होऊन 2 वर्ष होत आहेत तरी सुद्धा अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. विद्यार्थी खूप वाईट परिस्थितीतून जात आहेत.
मा. आयोग आणि माय बाप सरकार यांनी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा.
@mpsc_office@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@abpmajhatv