मा. गिरीशभाऊ,
ग्राम विकास विभागातील आरोग्य सेवक ५०% पदाची नियुक्ती रखडल्यामुळे हजारो उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
या संदर्भात ग्रामविकास विभागाने लवकरात लवकर परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदेने आचारसंहितेपूर्वी नियुक्ती द्यावी असे निर्देश देणे गरजेचे आहे.
कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
संदर्भ: आप महाराष्ट्र/२०२४/२३०७००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : "कृषि सेवक" पदाचा सेवक कालावधी रद्द करून "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये शासन निर्णयांनुसार राज्यातील सततची दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी कृषि सहाय्यकांची पदे ‘कृषिसेवक’ म्हणून भरणेबाबत निर्णय घेतला होता. यांमधील तरतुदीना अनुसरूनच ‘कृषि सेवक जाहिरात २०२४’ अंतर्गत पात्र उमेदवारांना कृषिसेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून सध्या अनेक उमेदवार कृषि विभागामधे कार्यरत आहेत. सध्या कृषि सेवकांना पदावर असताना विविध प्रकारच्या प्रशासकीय व वित्तीय जबाबदाऱ्या, विस्तार व प्रशिक्षणाची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळीच्या विविध जबाबदाऱ्या, निविष्ठा व गुणनियंत्रण, फलोत्पादन/पणन, मृदसंधारण व जलसंधारण, सांख्यिकी/ संनियंत्रण व मूल्यमापन संबंधी विविध कामे तसेच गाव पातळीवरील विविध कामे, वेळोवेळी कृषि विभागाकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी असे असंख्य कार्ये वेळोवेळी पार पाडावी लागतात. आपणांस ज्ञात आहेच की आपल्याच सरकारच्या नेतृत्वात आणि कृषि विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्याने देशपातळीवरचा १५ व्या कृषि नेतृत्व समितीचा २०२४ चा ‘सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार’ पटकावला आहे.
आरोग्य विभागाप्रमाणे कृषि हाही घटक अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असुनही शेतकरी हितासाठी राबणाऱ्या कृषीसेवकांना "कृषी सहाय्यक" पदी सेवेत घेऊन न्याय मिळावा हि सर्व कृषीसेवकांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि "कृषि सेवक" पदावरील कर्मचाऱ्यांचा सेवक कालावधी रद्द करून त्यांना "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेऊन सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने अदा करण्यात यावेत या मागणीचा विचार करावा व हजारो कृषीसेवकांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde@CMOMaharashtra
मा. सचिव @mpsc_office
सध्या महाराष्ट्र शासनाने अधिवेशनात हा निर्णय घेतला आहे की सरळसेवा मधील वर्ग 3 च्या पदांची MPSC मार्फत होईल.
निर्णय उत्तम असला तरी सरळसेवा परीक्षा सरळसेवा सारख्याच घ्याव्यात त्यात कोणताही बदल करु नये.
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@mieknathshinde
मा. @mieknathshinde@ChhaganCBhujbal@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, जलसंपदा या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार आहेत?
आता पुन्हा विधानपरिषद आचारसंहिता हे कारण सांगून निकाल रोखणार आहात का?
पुढील दोन दिवसांत तिन्हीही परीक्षांचे सर्व पदांचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@NANA_PATOLE
नरेंद्र मोदीजी सत्तेत आल्यापासून बेरोजगारांची दयनीय स्थिती झाली आहे. केंद्रातील लाखो पदे मोदी सरकार भरत नसल्याने यावेळी मोदी जी पुन्हा सत्तेत नको अशी आमची भूमिका आहे.
राज ठाकरे साहेबांनी मोदींना दिलेला पाठिंबा निराशाजनक आहे, अर्थात हा त्यांचा प्रश्न असला तरी बेरोजगार म्हणून आम्हाला याची अपेक्षा नव्हती. @RajThackeray@mnsadhikrut
♦️ नगरपरिषद नोकर भरतीची #SIT चौकशी करावी.
नगरपरिषद भरती परीक्षेदरम्यान सुध्दा अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. कारण तलाठीत, जलसंधारण परीक्षेत जे परीक्षा केंद्र मॅनेज झालेत त्याच परीक्षा केंद्रावर नगरपरिषद भरतीचे पेपर झाले आहेत. नगरपरिषद भरतीच्या निवड यादीत अनेक संशयित आहेत, ज्यांना इतके गुण मिळणे शक्यच नाही. म्हणून आधी नगरपरिषद भरतीची SIT चौकशी करावी आणि नंतरच भरती प्रक्रियेबाबत निर्णय घ्यावा.
राज्याचे मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदे यांच्याकडे सदर विभागाचा कार्यभार असून, नगरपरिषद भरतीत #घोटाळा झाला असण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी SIT चौकशीबाबत तात्काळ निर्णय घेऊन तशी घोषणा करावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@DrSEShinde@AUThackeray@rautsanjay61@RRPSpeaks@supriya_sule@MAHA_UDD@Secretary_MoHUA .
@suvishelke@mpsc_office नगरपरिषद परीक्षा निकाल चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे . नगरविकास विभागाने अगोदर 45% मार्क ची आट लावून नंतर त्यांचा normalisation करून नव्याने मार्क लिस्ट जाहीर करावी.
शेतकऱ्यांच्या नावाने बोगस बँक खाती खोलून २ कोटी ६४ लाख रुपयांचा अपहार वर्ध्यात एका महिला उपजिल्हाधिकाऱ्याने केलाय
अलिबागच्या निलंबित महिला तहसीलदारांच्या घरात १ कोटी २ लाखांची रोकड, ६०० ग्रॅम सोनं, ५ फ्लॅट ,१ भूखंड सापडलाय
#MPSC मधुन अधिकारी होण्याचे बहुतांश लोकांचे प्रमुख कारण
परीक्षार्थी त्रस्त ... सरकार मस्त...
शासकीय नोकरभरती परिक्षांमध्ये वारंवार होणाऱ्या पेपरफुटीसारख्या गंभीर बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विरोधी पक्षांच्या फोडाफोडीमध्ये व्यस्त असणाऱ्या राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.
पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शासकीय नोकरभरती MPSC मार्फतच व्हावी. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.
२३ फेब्रुवारीला कृषीविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे यथाशिघ्र निकाल लावण्याचे जाहीर केले. आठवडा उलटून गेला, कृषीसेवक निकाल जाहीर करण्यात आला नाही. आचासंहितेपूर्वी नियुक्त्या मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. @PraveenGedam@dhananjay_munde@AgriDeptGoM@mieknathshinde