सामान्य प्रशासन विभाग ( #GAD) ने ज्याप्रकारे पदांची सुसूत्रता ( कॅडर बकेटिंग) सारखं ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केला अगदी त्याच प्रकारे " परीक्षांची सुसूत्रता" ( Exam Bucketing) सारखा शासन निर्णय #GAD प्रमुख व्हि राधा मॅडम आणि समितीने घ्यावा ही नम्र विनंती कारण गट क आणि गट ब ( अराजपत्रित) ची परीक्षा ही #Objective पद्धतीने होते परंतु गट अ आणि गट ब राजपत्रित ची परीक्षा ही #Discriptive पद्धतीने होते आणि यामुळे उमेदवारांच्या अभ्यासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे जो उमेदवार गट क आणि गट ब साठी वेगळा अभ्यास करतो त्याला गट अ साठी अभ्यासाची/ क्लास ची स्वतंत्र व्यवस्था पहावी लागते.त्यामुळे कृपया याचा गांभीर्याने आणि उमेदवारांच्या मागणीचा करून लवकरात लवकर #Objective बाबतचा निर्णय घेण्यात यावा.
📍#VVIMP " स्पर्धा परीक्षा" क्षेत्रात विद्यार्थी काय आंदोलन करायला किंवा कोर्टाच्या केसेस लढायला आलेले नाहीत" याचा देखील विचार राधा मॅडम आणि समिती ने करावा ही नम्र विनंती.
#Objective
#Objective_Pattern
#Objective_2027
तांत्रिक संवर्गातील ( कृषी/ #FSO/ अभियांत्रिकी) उमेदवारांना #Objective पॅटर्न लागू होण्यापूर्वी किती वेळ दिला गेला?
ज्यांना वाटत "वेळ दिला पाहिजे" त्यांच्याकडे याबाबतचे उत्तर अजिबात नसणार आहे.
#Objective#objective2027
माननीय मुख्यमंत्री साहेब,
🔴जलसंधारण (WCD) आणि जलसंपदा (WRD) विभागात हजारो रिक्त पदांमुळे कामाचा पुरता बोजवारा उडालाय!
विभागात काम करायला पुरेसे मनुष्यबळच शिल्लक नाही. अशा अपुऱ्या मनुष्यबळात तुम्ही शासकीय कामे कशी करणार?
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक आमदार-मंत्र्यांचे उंबरठे झिजवले, पण फक्त आश्वासनांचा पाऊस!
'दुष्काळात १३वा महिना' तर झालाच आहे, आता १४वा महिना तरी करू नका! तातडीने मेगाभरती जाहीर करावी. 🙏
✅️अपेक्षा विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची...
कोणत्याही पोलिस तपासाशिवाय छायाचित्र फक्त एकाच व्यक्तीकडे आहेत हे कशाच्या आधारावर पुणे मनपाने निश्चित केले आहे?
आणि नियुक्ती द्यायची एवढी घाई कशासाठी सुरू आहे @prajytnair सर.
@PMCPune
विद्यार्थ्यांनी पुणे मनपा चा सुरू असलेल्या सत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर मनपाला विविध प्रश्न विचारले तसेच मनपा समोर अनेक आंदोलने देखील केली अद्याप मनपा द्वारे याबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही उलट पुणे मनपाने खालील फोटो मध्ये आहे ते ट्विट केले आणि सुरू असलेल्या सत्रातून फोटो बाहेर गेला हे अप्रत्यक्षरित्या कबूल देखील केले आहे आणि त्यानंतर ट्विट डिलिट देखील केले @PMCPune
ने ट्विट मध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे काही प्रश्न गांभीर्याने उपस्थित होतात जसे की,
जॅमर किंवा इंटरनेट बंद असणे हा प्रश्नफुटीचा फायदा रोखणारा पुरावा ठरत नाही.
त्यामुळे PMC ने स्पष्ट करावे—
🔹 प्रत्यक्षात किती प्रश्न बाहेर गेले?
🔹 कोणत्या Session वर त्याचा परिणाम झाला?
🔹 जाहिरातीत नमूद केलेले answer-pattern/similarity analysis केले का?
🔹 किती उमेदवारांचे response-pattern संशयास्पद आढळले?
🔹 Session-wise आणि Centre-wise performance चे forensic analysis केले का?
🔹 Top scorers च्या question-wise accuracy मध्ये काही असामान्य pattern आढळला का?
फक्त “केंद्रात इंटरनेट नव्हते” एवढ्यावर प्रश्नफुटीचा संशय दूर होत नाही.
निष्पक्ष चौकशीसाठी question-wise accuracy + response similarity + session-wise performance + centre-wise data + CCTV/technical logs यांचे स्वतंत्र forensic analysis झाले पाहिजे.
दोषी कोण असेल ते तपासातून समोर येऊ द्या; तसेच दोषींवर पुणे मनपाने प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा होईपर्यंत प्रकरण बंद करता कामा नये.
#PMC #PMCExam #PMCJE #ExamScam #PaperLeak #Recruitment #Transparency #JusticeForStudents
@navalMH@prajytnair
परीक्षा झाली… पण प्रक्रिया पारदर्शक होती का?
डमी उमेदवार, संशयास्पद निकाल, परीक्षागृहातील फोटो आणि बनावट भरतीचे आरोप…इतक्या तक्रारींनंतरही स्पष्ट उत्तर का मिळत नाही?
तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास का ढासळतोय, हे समजून घेण्यासाठी चॅनेलवरील पूर्ण व्हिडिओ पाहा.
#RecruitmentExam #PMC #ExamScam #YouthQuestions #ExamTransparency #LegalAwareness #VijayKumbhar
PMC recruitment, recruitment exam, exam scam, recruitment fraud, dummy candidate, suspicious results, exam transparency, youth questions, government recruitment, Pune Municipal Corporation, competitive exams, legal awareness, Vijay Kumbhar
MMRDA चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करा
PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या
MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करत आहे.
MMRDA भरती घोटाळा चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDA आणि मुंबई मेट्रो-१शी संबंधित त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेमुळे चौकशीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना समितीतून तात्काळ हटवून प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SITमार्फत चौकशी करावी. परीक्षा डेटा, सर्व्हर लॉग्स, CCTV फुटेज आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. या प्रकरणी काँग्रेसने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट मागितली असून, स्वतंत्र निवेदन सादर केले जाणार आहे.
PMC भरतीतील तक्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. गंभीर गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
1. MMRDA भरतीची कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करावी.
2. जॉनी जोसेफ यांना चौकशी समितीतून तात्काळ हटवावे.
3. MMRDA भरतीतील डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
4. PMC भरतीतील तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी.
5. अनियमितता सिद्ध झाल्यास PMCची फेरपरीक्षा घ्यावी.
6. दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड काँग्रेस स्वीकारणार नाही. दोषींवर कारवाई आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.
@INCHarshsapkal@satejp@PMCPune@VijayWadettiwar@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET @degree_holders @Mpsc_Andolan@INCRojgar
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंजुरी देऊन AEE, AE, JE व CEA संवर्गातील रिक्त पदांची भरती MPSC मार्फत त्वरित सुरू करावी, हजारो अभियंता विद्यार्थ्यांच्या रोजगाराची ही मागणी आहे.
अन्यथा शेकडो विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुण्यात सिंचन भवन येथे आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करावे लागेल!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@SanjayDRathods@RVikhePatil@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक 2025 च्या परीक्षेचा पेपर सुरु होण्यापूर्वीच एका उमेदवारास प्रश्नसंच मिळाल्याचे नमूद करून सदर जाहिरातीनुसार घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले आहे.
अशा प्रकारे प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आयोगाच्या गोपनीयतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भरतीप्रक्रिया रद्द करणे हा एक भाग झाला परंतु नेमकी प्रश्नपत्रिका कशी फुटली, फुटलेली प्रश्नपत्रिका एकाच विद्यार्थ्यापर्यंत मर्यादित राहिली की अनेकांना त्याचा लाभ झाला याची चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल हा जाहीर केला पाहिजे. तसेच आयोगातील कोणत्या यंत्रणाद्वारे ही प्रश्नपत्रिका फुटली याची सखोल चौकशी करून पेपरफुटी कायद्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. या विषयात लवकरच मी मा. मुख्यमंत्री यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे.
@PMCPune आणि @MMRDAOfficial पदभरतीमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. निकालावरून त्या गोष्टी स्पष्ट देखील होतात.
घोटाळा झाला की, “पुरावे द्या” असे सांगितले जाते; आणि पुरावे समोर आणले की चौकशी समित्या नेमल्या जातात. मात्र गरज आहे ती निष्पक्ष, वेळबद्ध चौकशीची आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाईची.
पैशांच्या जोरावर परीक्षा व्यवस्थेत गैरप्रकार करून सरकारी नोकरी मिळवता येते, असा संदेश तरुणांमध्ये जाता कामा नये.
अन्यथा परीक्षा होत राहतील, घोटाळे होत राहतील, पैसेवाल्यांची मुले सरकारी नोकरीत जातील आणि मेहनत करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या वाट्याला फक्त प्रतीक्षा आणि अन्याय येत राहील.
सरकारी भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि भ्रष्टाचारमुक्त झालीच पाहिजे!
#MMRDA_SCAM #PMCRecruitment #RecruitmentScam #ExamScam #Transparency
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा राज्यातील एक घटनात्मक आयोग असून, लाखो विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिकांचा आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. आयोगाने आजवर अनेक प्रामाणिक व सक्षम अधिकारी-कर्मचारी राज्याच्या सेवेत दिले आहेत.
मात्र, औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आयोगाच्या पारदर्शकता, विश्वासार्हता आणि प्रतिमेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, आयोगाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती म्हणून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी तत्काळ विनाविलंब राजीनामा द्यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.
विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कठोर कारवाई हीच काळाची गरज आहे.
#MPSC #MPSCExam #DrugInspectorExam #PaperLeak #Transparency #Accountability
@Dhananjay4INC MMRDA भरती परीक्षा 2026 सदरील चौकशी फक्त AE-2/ JE Civil विषयाशी मर्यादित आहे तरी इतर 15 विभागांच्या परीक्षांबाबत कोणत्याही विभागांतील उमेदवारांवर अन्याय होऊ नये याबाबत विनंती.
तसेच त्यांचे निकाल आणि पुढील प्रक्रिया सुरळीत करावी.
🚨 MMRDA भरती परीक्षा प्रकरणी उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद 🚨
MMRDA भरती परीक्षा २०२६ संदर्भात हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर उद्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या तक्रारी, उपलब्ध कागदपत्रे आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील दिशा आणि महत्त्वाच्या मागण्या उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येतील.
📍 टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई
🗓️ बुधवार, २६ ऑगस्ट २०२६
⏰ दुपारी २.०० वाजता
हा कोणत्याही व्यक्तीविरोधातील विषय नाही. हा प्रश्न आहे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि न्यायाचा. सर्व विद्यार्थी, पालक आणि रोजगाराच्या प्रश्नाशी संबंधित नागरिकांनी उद्याच्या पत्रकार परिषदेची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर करावी.
उद्याची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एक महत्त्वाचे पाऊल!
@INCMaharashtra@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET @degree_holders @Mpsc_Andolan@mpsc_office@PunyachiMPSC@UPSCinMarathi
#MMRDA #MMRDABharti #रोजगारन्याय #विद्यार्थ्यांचान्याय #भरतीपरीक्षा #StudentsJustice
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर पदभरतीसाठी MPSC आयोगाकडे पाठवण्यात यावीत, ही विनंती.
हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणतीही अनावश्यक दिरंगाई न करता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.
@RVikhePatil@girishdmahajan@MahaDGIPR@Dev_Fadnavis@Devendra_Office
#WRD_CIVIL_AEE_AE_JE_CEA #जलसंपदा_विभाग #MPSC #EngineeringJobs #MegaRecruitment