Opting Out म्हणजे खरं तर पुण्याचं काम आहे परंतु यामध्ये लाखो रुपये उकळायचे धंदे सर्रास सुरू आहेत. याबाबत @mpsc_office तसेच शासनाने कठोरात कठोर निर्णय घ्यावा. शासनात काम करण्यासाठी नैतिक मूल्यांची गरज असणे गरजेचे आहे अशा अनैतिक लाचखोर लोकांच्या विरोधात मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण- कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची परीक्षा दिनांक 2 व 5 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.शासनास विनंती आहे की लवकर निकाल जाहीर करण्यात यावा. @GulabraoRPatil@MeghnaBordikar
🔶मा. @mpsc_office
अध्यक्ष महोदय व मा.सचिव
महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
चा निकाल जाहीर करायचा आहे की नाही ????
पूर्व परीक्षा होऊन जवळपास 3 महिने होत आहेत.
सामान्य राज्यसेवा,
स्थापत्य अभियांत्रिकी,
वन सेवा
विद्युत अभियांत्रिकी सेवा
चे उमेदवार गेल्या कित्येक दिवसापासून पूर्व च्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत.
👉 @mpsc_office चे नेमकं चाललंय काय ???
🔶इकडे गेल्या 4 अधिवेशनापासून
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
एकच घोषणा करत आहेत
👉#MPSC ला आम्ही सक्षम व बळकट करू
फक्त घोषणा पण अंमलबजावणी
शून्य
🔶 आयोगाचा कारभार सुधारणे तर दूरच पहिल्यापेक्षा अधिकाधिक
ढासळत आहे हे वास्तव आहे.
तात्काळ पूर्व परीक्षा निकाल जाहीर करा
👉राज्यसेवा मुख्य परीक्षेला केवळ
55 दिवस उरले आहेत याचे भान
फक्त उमेदवारांना आहे, @mpsc_office ला मात्र नाही
👉 यासोबतच मूळ जाहिरातील नसलेल्या विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्याचा मुहूर्त कधीचा आहे ?????
@mpsc_office कडे मागणीपत्रक आल्या आल्या ही सेवा सुद्धा जाहिरातीत add झाली हे सुद्धा उमेदवारांना कळवण्याचे कष्ट घेतले नाही,
याला कर्तव्यात कसूर करणे म्हणतात.
आता किमान त्यांना मुख्यची तारीख तरी द्यावी ही किमान अपेक्षा.
@CMOMaharashtra@maha_governor@mieknathshinde@NANA_PATOLE@MahaDGIPR
नाशिक महानगरपालिकेतील AE/JE/CEA पदांच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेदरम्यान अनेक उमेदवारांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी अर्ज सादरीकरणाची अंतिम तारीख किमान १५ दिवस वाढवावी.
@mieknathshinde@NashikCorp@CMOMaharashtra
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदासाठी 1 डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून 900 ते 1000 रुपये इतकी भरमसाठ परीक्षा फी घेऊनही विद्यार्थ्यांना स्वतःच्या ठिकाणापासून शेकडो किमी लांब परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत.
2 डिसेंबर रोजी राज्यभरात नगरपरिषद / नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार बजवण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर रोजी परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने 1 डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी व लवकरात लवकर परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर अंतरावर परीक्षा केंद्रे देण्यात यावीत. तसेच मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता विद्यार्थ्यांना खाजगी परीक्षा केंद्रे न देता अधिकृत TCS ioN केंद्रावर परीक्षा घेण्यात याव्यात.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@PMCPune@mieknathshinde@AjitPawarSpeaks@navalMH@ibps_official
🔶🔶 मतदान करा किंवा शेकडो किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्या
हा चुकीचा पर्याय समोर आल्यावर उमेदवारांनी काय करावे असे अपेक्षित आहे सरकारला व मनपाला???
🔶मा. @Dev_Fadnavis साहेब
@PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) 1 डिसेंबर 2025
रोजी होणाऱ्या परीक्षेसंदर्भात
👉 उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर
परीक्षा केंद्र देण्याचे आपले प्रयोजन काय आहे ????
👉आपल्याला दरवेळी आम्हाला हे सांगण्याची वेळ का येते ????
👉 परीक्षा फॉर्म भरुन् घेताना
केंद्र निवडण्याचा त्याचे preferences
देण्याचा दिखाऊपणा का करता ???
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन
उमेदवारांनी पुन्हा हजारात पैसे खर्च करून परीक्षा द्यावी हा अट्टाहास नेहमीच का ????
🔷🔷 गोरगरीब बेरोजगारांच्या जीवाशी, भावनांशी हा खेळ का केला जातोय ????
👉तात्काळ परीक्षा केंद्र बदलून देण्याची व्यवस्था करावी
🔶🔶🔶
अत्यंत महत्वाचा मुद्दा
1 डिसेंबर ला परीक्षा शेकडो किलोमीटर
दूर जाऊन द्यायची
मग हे उमेदवार दुसऱ्या दिवशी मतदान कसे करतील याचा काही विचार आहे की नाही ??????
👉 जे उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांनी election duty करायची की परीक्षा द्यायची किमान ह्याचे तरी भान ठेवायला हवे होते
🔶🔶
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@PMCPune
🔶संविधान दिनानिमित्त आठवण करून देण्याची वेळ आणली आपण
👉उमेदवारांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही.
वरील सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही
करण्याचे निर्देश @PMCPune ला द्यावेत ही हजारो उमेदवारांच्या वतीने
नम्र विनंती करतोय.
दरवेळी बेरोजगारांच्या संयमाचा अंत बघू नये
🙏🙏🙏🙏🙏
@NANA_PATOLE@INCHarshsapkal
पुणे महानगर पालिकेचा अजून एक “निर्णय लकवा”….???
पुणे महापालिकेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करार तत्वावरील पदांना मिळणाऱ्या मुदतवाढीच्या चर्चांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे.
रू ३०० कोटींची तरतूद असताना कायमस्वरूपी भरती न करता कॉन्ट्रॅक्टवर चालणारी ही योजना म्हणजे पात्र तरुणांवर सरळसरळ अन्याय!
कायम पदे रिक्त असताना सरकार फक्त कराराच्या आधारावर तरुणांचे भवितव्य का उजाडत आहे?
काँग्रेस पक्ष याविरुद्ध आवाज उठवत राहील.
@INCHarshsapkal@chennithala@BMSandeepAICC@satejp@PMCPune@navalMH
#YouthRights #PuneMunicipalCorporation #Congress
परीक्षा केंद्रे ५००+ किमी दूर (प्रवास कसा करणार?)
प्रवास खर्च & राहण्याची गैरसोय
अनधिकृत केंद्रे & सुविधेचा अभाव
मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न
निवडणूक ड्युटी आणि मतदानाचा हक्क
एवढ्या अडचणीत परीक्षा घेणे चुकीचे आहे. परीक्षा Postpone झालीच पाहिजे!
#PostponePMCJE@PMCPune
पुणे महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात येणारी कनिष्ठ अभियंता JE परीक्षा १ डिसेंबरला घेण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ३००-४०० कि.मी. लांब परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळं दुसऱ्या दिवशी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानासाठी विद्यार्थी पोहोचू शकणार नाहीत, शिवाय आधीच शासकीय सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्शन ड्युटी असल्याने त्यांनादेखील ही परीक्षा देता येणार नाही. याशिवाय परीक्षेत पारदर्शकता राहण्यासाठी ही परीक्षा TCS ION CENTER वरच आयोजित करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.
ही बाब लक्षात घेत शासनाने सदर परिक्षा पुढे ढकलावी आणि निवडणूक संपताच आठवड्याच्या आत ही परीक्षा TSC ION CENTER वर घेऊन व विद्यार्थ्यांचं होणारं संभाव्य नुकसान टाळावं, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर (JE) परीक्षेसाठी अर्ज करताना निवडलेली केंद्रे न देता अनेक विद्यार्थ्यांना शेकडो किलोमीटर लांबची खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ये-जा करणे अत्यंत कठीण होऊन बसणार आहे.
त्यातच २ डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना मतदानासाठी पोहोचणे अशक्यप्राय आहे. काही विद्यार्थ्यांवर इलेक्शन ड्युटी असल्याने ते परीक्षेलाही मुकण्याची शक्यता आहे. पुणे मनपा आयुक्तांना विनंती आहे कि, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक बदल करण्याची कृपया तातडीने कार्यवाही करावी.
याशिवाय, परीक्षेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता रहावी यासाठी ही परीक्षा फक्त TCS ION सेंटरवरच आयोजित करण्याची विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. या मागणीचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
#PMCCE #JEExam #StudentIssues #Pune #PMC #Maharashtra
@PMCPune
1 Dec PMC Exam
900 - 1000 Fees घेऊन सुद्धा Private Center वरती पेपर का ?
Exam Center Prefrences जे विद्यार्थ्यांनी दिले,ते सोडून 300 - 400 km लांबचे सेंटर दिले. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना iON - Digital सेंटर द्यावे. @PMCPune@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
येत्या ०१ डिसेंबर रोजी ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) पदभरतीसाठी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे.
हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
@navalMH@PMCPune@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@PatilKailasB@CMOMaharashtra@Jayant_R_Patil@AUThackeray@RRPSpeaks
येत्या १ डिसेंबर २०२५ रोजी पुणे मनपाने कनिष्ठ अभियंता (Civil)ची परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षा पुढे ढकलावी अशी मी सर्व परीक्षार्थींच्या वतीने मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो.
येत्या २ डिसेंबर रोजी घोषित केलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. अनेक परीक्षार्थींना दूरची परीक्षा केंद्रे मिळाली असल्याने परीक्षा झाल्यावर ४००-५०० किलोमीटरचा प्रवास करून मतदानासाठी परत येणे अशक्य आहे. तसेच काही परीक्षार्थींना इलेक्शन ड्युटी असल्याने परीक्षा देता येणार नाही.
त्यामुळे या नियोजित परीक्षा पुढे ढकलून TCS iON Center वर पुन्हा नियोजित करावी जेणेकरून परीक्षेत पारदर्शकता राहील.
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक हक्क आहे. कोणत्या परिस्थितीत हक्क हिरावला जाऊ नये. परीक्षार्थींच्या भविष्याबरोबर लोकशाहीचाही मान राखला जावा.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना “निर्णय लकवा” झालाय का?
आज वरणगाव नगरपरिषद (तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव) येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा पुणे महानगर पालिकेला कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी पत्र दिले आहे. लाखो परीक्षार्थी, संघटना व लोकप्रतिनिधींनी विनंती पत्र दिल्यानंतरही जर पुणे महापालिका आयुक्त योग्य निर्णय घेत नसतील, तर त्यांनी तातडीने पायउतार व्हावं!
मा. अजित दादा,
आपण पुण्याचे पालकमंत्री आहात. पार्थ पवार यांना एक न्याय आणि लाखो परीक्षार्थींना वेगळा न्याय का?
@AjitPawarSpeaks@INCHarshsapkal@chennithala@BMSandeepAICC@navalMH@PMCPune
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH@PMCPune