पलूस सांगली येथील डॉ.अमोल पवार सर यांच्या
मुलीचा उद्या वाढदिवस आहे, त्यांनी तिला विचारलं, तुला काय Gift पाहिजे, तर ती म्हणाली मला दिल्लीच्या protest मध्ये सहभागी व्हायचे आहे, म्हणून डॉ. पवार, त्यांच्या पत्नी डॉ साधना पवार आणि कन्या दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी झाले.
समईप्रमाणे अखंड तेवत राहून घरभर आनंदाचा प्रकाश पसरवणाऱ्या आणि झाडाप्रमाणे स्वतःला उन्हाचे चटके सहन करावे लागले तरी इतरांना सावली देणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! आयुष्यातील या प्रेमाच्या सागराला कायम भरती रहावी ���णि त्यासाठी आईला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं, ही पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!
@sunanda_pawar
#HappyBirthday
“कॅप्टन” हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर स��वा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत “कॅप्टन” हे पद जोडण्याचा अधिकार असतो.
सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्�� कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन BNS कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार माझा जबाब घेण्यास सुरवातही झाली होती, परंतु त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा FIR दाखल करुन घेण्यास नकार देत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्ज घेतला.
पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मागणी करुनही पोलिसांकडून FIR दाखल करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यामुळं सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचं स्पष्ट दिसत असून हे असंच सुरु राहिलं तर अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका निर्माण होत आहे, परंतु आम्ही मात्र हा विषय तडीस नेल्यावाचून थांबणार नाही. उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार आहे.
#JUSTICE_FOR_AJIT_DADA
सत्तेच्या बळावर भाजपचे काही लोक गुंडगिरी करत असून यातूनच काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना भाजपच्या गुंडांकडून पुण्यात मारहाण करण्यात आली. दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावर मोर्चे काढणं किंवा भर रस्त्यात विरोधी पक्षाच्या कार्यक��्त्यांवर हात उचलणं ही नवी संस्कृती भाजप राज्यात आणत असून याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध आणि धिक्कार करतो. सरकारने राजधर्म पाळून हनुमंत पवार यांना मारहाण करणाऱ्या गुंडांच्या तातडीने मुसक्या आवळाव्यात.
@Dev_Fadnavis