@mpsc_office मा .महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने, आयोगामार्फत होणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षांबाबत परीक्षेचा पॅटर्न, syllabus तसेच कोणकोणत्या पदांसाठी सरळसेवा भरती आयोगमार्फत घेतली जाईल याची माहिती जाहीर करायला हवी .
रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?
"मी चुकतोय" हे कळणं, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणं...
"दाग अच्छे है", च्या धर्तीवर राग चांगला असतो, असं म्हणणे योग्य ठरेल.
उदा.
आपल्याला कचर्याचा राग येतो, म्हणुनच तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो, म्हणुनच आपण रोज कामावर जातो.
लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुनच तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो...
राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात...
मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलुन टाकली.
नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.
आंबेडकरांनीही तेच केलं, शिवाजी महाराजांनीही केलं, यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला,आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं...
ते जर करु शकतात, ते आपणही करु शकतो की...
फालतु-वायफळ गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.
जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही सल्ले...
१) स्वीकार करा.
समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खुप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल,म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्वीकार करा, आणि दुसररं एखादं काम शोधा, त्यात रमामाण व्हा, त्याचा आनंद घ्या...
समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन, कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजुच्यांशी भांडुन काय साध्य होणार आहे?
त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणं लावा, आणि आनंद घ्या...
२) स्वतःला दररोज सुधारा..
कोणी तुमची चुक नसताना तुमचा अपमान केला, फसवलं किंवा भांडले, तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचं नसतं, त्या विसरायच्या असतात, पण त्यातुन कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर लक्षात ठेवायचा.
३) शांत बसा. विसरा.
कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अश्यावेळी काही जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावं लागतं. म्हणुन अशा वेळी मौन पाळणं सोयीस्कर ठरतं.
आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुलं, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो, तरी त्या युद्धात आपलीच लोकं हरलेली असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेली असतात. अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा? म्हणुन काही ठिकाणी गप्प राहणं,तिथुन निघुन जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं...
४) आभार मानुन आनंदी व्हा.
ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवुन त्याचे आभार माना. राग पळुन जाईल...
५) हसा...
कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहुन हसा, विनोद बनवा, खळखळुन हसा, मजा घ्या, दुःखाची तीव्रता नाहीशी होईल...
येणार्या प्रत्येक दिवशी तुमची उर्जा ही तुमची शक्ति बनावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा...
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०८०१.
प्रति,
मा. भूषण गगराणी,
आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका.
विषय - १८४६ लिपिक पदाच्या जाहिरातीतील अन्यायकारक अटी दूर करण्याबाबत.
माननीय महोदय,
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून १०८ हुतात्म्यांनी आपले रक्त सांडल्यामुळे मुंबईसह "संयुक्त महाराष्ट्र" झाल्याचा दैदिप्यमान इतिहास आपल्या राज्याला आहे. मुंबई हि फक्त राज्याची राजधानी नाही तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या अस्मितेचे प्रतीक आहे.
आपल्या फोनवर झालेल्या चर्चेनुसार बृहन्मुंबई महानगर पालिकेने प्रकाशित केलेल्या १८४६ लिपिक पदाच्या जाहिरातीतील पुढील जाचक अटींमुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण तरुणी अपात्र ठरत आहेत.
१. उमेदवार १० व पदवीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला पाहिजे
२. फक्त मुंबई व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्त उमेदवारच "प्रकल्पग्रस्त" संवर्गात पात्र आहेत.
३. इंग्रजी व मराठी टायपिंगच्या दोनही परीक्षा पास असावा ही अट.
केंद्रीय पातळीवर UPSC च्या माध्यमातून होणाऱ्या सर्व परीक्षा अथवा राज्य पातळीवर MPSC च्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षांसाठी १० वी / पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावी हि अट अजिबात नाही. तसेच राज्य सरकारच्या विविध खात्यांतील "लिपिक" पदाच्या भरतीसाठी कोणतीही एक टायपिंग ची परीक्षा पास असावी अशी पात्रता आहे. मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी असताना फक्त मुंबई व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना त्या संवर्गातून पात्र ठरवण्याची अट राज्याच्या इतर ३४ जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त तरुण तरुणींना समान संधी न देणारी आहे. वरील अटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून राज्यातील ४ ते ५ लाख विद्यार्थ्यांवर "अन्याय" झाल्याची भावना आहे. जाहिरातीतील वरील "अटी" दूरुस्त करून सामान संधी मिळावी हि राज्यातील तरुणांची मागणी आहे.
या संदर्भात आपल्यासोबत विद्यार्थी व आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळास भेटून चर्चा करण्यासाठी कृपया वेळ व तारीख कळवावी हि विनंती.
धन्यवाद,
@mybmc@mieknathshinde@AUThackeray@iambadasdanve@SandeepPathak04 #BMC #DhananjayShinde
BMC लिपीक भरती 2023
पहिल्याच प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण होण्याची तुघलकी अट टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येईल.
12 वी फेल IPS होऊ शकतो पण लिपीक नाही ही कुठली अट? कशासाठी? कोणासाठी?
@CMOMaharashtra@mybmc
@mpsc_office मा.आयोग एमपीएससी गट क 2023 या निकालावर पण चर्चा करावी. 17 डिसेंबर मुख्य परीक्षा होवून 8 महिने आणि पूर्ण प्रकियेला जवळ जवळ 2 वर्ष होत आहे. अजून फायनल निकाल नाही. 21000 मुले निकाल प्रतिक्षेत. निकाल आला तर प्रत्येकाला आपली आपली दिशा ठरवता येते किती दिवस अभ्यास करणार.
सरकारने मोठा गाजावाजा करत 75000 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली पण आज 1 वर्ष झाले एकाही विभागाने प्रक्रिया पूर्ण केली नाही
तलाठी भरती- अपूर्ण
नगरपरिषद भरती अपूर्ण
जलसंपदा भरती - अपूर्ण
आदिवासी विभाग भरती- अपूर्ण
शिक्षक भरती - अपूर्ण
@CMOMaharashtra,@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@Dabbu_1010 आज धार्मिक मुद्द्यावर बोलणं खूप संवेदनशील बनलं आहे.लोकं त्याच्याकडे सुज्ञपणे पाहतील याची शाश्वती नाही.काही रुढी परंपरा मध्ये काळाप्रमाणे बदल व्हायला हवा हे मानतच नाहीत. उलट त्यालाच धर्मभ्रष्ट म्हणतील.त्याच्यामध्ये सुद्धा जातीयता, धार्मिकता आणून त्या व्यक्तीला वाळीत टाकतील.
मा. अजित दादा,
लेखा व कोषागारे विभाग जाहिरात गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत , शेवटची भरती ६ वर्षांपूर्वी झाली होती. कृपया आपण यात स्वतः लक्ष घालून उपलब्ध रिक्त पदांची तात्काळ भरती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
@AjitPawarSpeaks
मा. देवेंद्र जी,
जलसंपदा विभागाच्या भरती प्रक्रीयेला ८ महिने उलटून गेले तरीही अजून अंतिम निवडसुची प्रदर्शित करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात इतर काही विभागांचे निकाल लागून नियुक्त्या पण देण्यात आल्या आहेत. आचारसंहिते दरम्यान नियुक्त्या देता आल्या नाही परंतु आचारसंहिता समाप्ती नंतर आणि कागदपत्रे पडताळणी नंतर आज महिना उलटुन गेला आहे.
आपण यात लक्ष घालून तत्काळ अंतिम निवडसूची जाहीर करून लवकरात नियुक्ती देण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@Mpsc_Andolan@punyachiMPSC