शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !
कोरोना काळात ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केलेली सेवा कोणी नाकारू शकत नाही. ठाणेकरांच्या मदतीसाठी जेव्हा कोणीही नव्हते, तेव्हा मनसैनिक स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर काम करत होते. आमच्या काही लोकांचा त्यात मृत्यूही झाला. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मतदान करा
दादरकरांच्या आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीचा प्रभाग क्र. १९२ चा उमेदवार म्हणून माझ्या विभागातील श्री. स्वामी समर्थ मठ, डी. एल. वैद्य मार्ग, दादर (प) इथून, आज सायं. ४ वाजल्यापासून माझ्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करत आहे. आपण मला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने याल अशी अपेक्षा!!!
आपला नम्र
यशवंत किल्लेदार
#MNSAdhikrut #YashwantKilledar #AaplaYashwant #ShivsenaUBT #Ward192
भक्ती आणि शक्तीचा संगम! निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी 'शिवसेना भवन' या पवित्र वास्तूच्या चरणी नतमस्तक झालो. ही केवळ वास्तू नाही, तर लाखोंचे श्रद्धास्थान आहे."
#ShivsenaBhavan#Election2026#YashwantKilledar
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेसाठी दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा पूर्ण झाली आहे. ह्याबाबत ची माहिती मनसे नेता श्री राजूदादा पाटील @rajupatilmanase ह्यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस ह्यांनी KDMC साठी घोषणा केलेल्या ६५०० कोटींपैकी ६५ कोटी रुपये सुद्धा आले नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
@AmhiDombivlikar@mnsKalyanShahar@_KALYANDOMBIVLI
📍 मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पत्रकार संवाद, २७ डिसेंबर २०२५
शिवसेना–मनसे युतीसंदर्भात सुरू असलेल्या घडामोडींवर मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
🔹 ठाकरे बंधूंच्या युतीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात असून विरोधकांनी याबाबत कोणतीही अनावश्यक चिंता करू नये, असे त्यांनी सांगितले.
🔹 युतीच्या प्रक्रियेत एखाद-दोन जागांची अदलाबदल होण्याची शक्यता असून त्यावर सध्या चर्चा सुरू आहे.
🔹 तब्येत ठीक नसल्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
युतीच्या वाटाघाटींविषयी बोलताना नांदगावकर म्हणाले की,
“युती करताना काही जागा सोडाव्या लागतात, तर काही जागा पदरात पाडून घ्याव्या लागतात. युतीबाबत पक्ष अजून पूर्णपणे अनुभवी नसला, तरी पक्षातील अनुभवी नेते योग्य चर्चा व मार्गदर्शन करत आहेत.”
👉 आगामी काळात युती संदर्भातील सर्व निर्णय पक्षहित आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून घेतले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#मनसे #शिवसेना #ubt #ठाकरेबंधू #Maharashtra #Thackeray
मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, श्री. दिनकर पाटील यांचं पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबन करण्यात आलं आहे. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
#MNSAdhikrut
@keshavupadhye केशवराव.... राजकारण म्हणजे इतकं सरळ अंकगणित नसतं हे मी आपल्याला सांगायला नको. राजकारणात १+१ ह्याचं उत्तर दरवेळी २ चं येईल असं नाही. अनेकदा ते ११ येतं.
ज्यावेळी दोन पक्ष, संघटना एकत्र येतात त्यावेळी अनेक संदर्भ बदलतात.
आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली.
कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.' हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.
आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील.
त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.
युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे.
त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील.
मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.
आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात.
माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल.
सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !
राज ठाकरे ।
ही एवढी भारी पोस्ट डिलीट का केली मिटकरींनी …???
का एवढ्या कमेंटमध्ये लोकांनी शिव्या दिल्या त्यांना …
मिटकरींच्या टुकार क्रिएटिव्हिटीची
कुणालाच कदर नाही …!!!
कसलं गाणं लावलेलं …!!! अररररं… खतरनाक…
निष्ठूर ट्विटहार्ट्स…
शेवटी पोस्ट डिलीट झाली … !!! असो … 😅
शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन आज दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी पनवेल, जि. रायगड येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली आणि रायगड जिल्ह्यातील भूमी प्रश्नांवर स्पष्ट, ठाम आणि जाज्वल्य भूमिका मांडली.
राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे बाहेरील लोक रायगडातील जमिनी बळकावत आहेत, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मराठी तरुणांनी एकत्र यावे आणि भूमी रक्षणासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
“नवी मुंबई विमानतळामध्ये १०० टक्के मराठी भूमिपूत्र कामाला लागले पाहिजे, इथल्या जमिनीवर उभे राहणाऱ्या उद्योगात मराठी माणूस भागीदार म्हणून असला पाहिजे.”
#राजसाहेबठाकरे #मनसे #शेकाप #Panvel #Raigad #भूमिसंरक्षण #मराठीओळख #78वा_वर्धापनदिन #RajThackeray #लाल_सलाम #MNS #ShetkariKamgarPaksha #शेकाप