MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
क्लर्क OPTING OUT साठी 8 लाखाची मागणी....@mpsc_office@bhimanwar MPSC प्रतीक्षा यादी जाहीर न करण्याच्या निर्णयाचा आर्थिक लाभ उचलणारी टोळीचा सुळसुळाट...8 लाखात क्लर्क क्या बात है.... महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पाहून आनंद होत असेल तुम्हाला ?
@pudharionline@MahaDGIPR
सर,
वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी STI 2025 ची एकही जागा नसणे अत्यंत वेदनादायक आहे.
आता पूर्व परीक्षा (Prelims) पूर्ण झालेली असल्याने, कृपया या STI पदसंख्येचा प्रस्ताव MPSC कडे तातडीने पाठवून OPEN प्रवर्गालाही न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती.
सर, आजपर्यंत जसं आपण नेहमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे, तसाच न्याय याही वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल, हीच आशा आहे.
#STIForOpen2025
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
एक उमेदवार किती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो?
आधी OBC NTB DTA SBC मध्ये असणारे उमेदवार आता EWS कटऑफ पाहून EWS मध्ये येत आहेत हे उचित आहे का? शासनाने यावर उत्तर दिले पाहिजे. अन्य जात प्रमाणपत्र धारक लोकांना EWS कस मिळत आहे याच उत्तर प्रमाणपत्र देणारे अधिकारी देऊ शकतात. @CMOMaharashtra
PSI वयोमर्यादा वाढीसाठी शेकडो पत्रे आणि विनंत्या देऊनही सरकार ढिम्म आहे. ४ दिवसात परीक्षा असताना विद्यार्थी आजही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. विद्यार्थ्यांच्या या लढाईत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल! 📢
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC #PSI_AgeRelaxation #JusticeForMPSCStudents
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
MPSC ची जाहिरात ७ महिने उशिरा आली, यात विद्यार्थ्यांची काय चूक? जाहिरातीच्या विलंबामुळे हजारो स्वप्नभंग होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पोलीस शिपाई भरतीप्रमाणे PSI पदासाठी देखील वयोमर्यादेत सवलत मिळायलाच हवी!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks#MPSC#PSI_AgeRelaxation
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
PSI वय वाढीसाठी विद्यार्थी गेल्या सात महिन्यापासून अहोरात्र काम करत आहेत.
मुळात जाहिरात येण्यासच उशीर झाला तसेच,
PSI पद सोडता खुल्या प्रवर्गाला एकही जागा या जाहिरातीमध्ये नाही (अपवाद ASO 1) यासाठी वयवाढ व्हायला हवी.
सरकारने तात्काळ दखल घेऊन शासन निर्णय निर्गमित करावा.
#वय_वाढ
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ साठी ६७४ पदांची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली, मात्र परीक्षा थेट ४ जानेवारी २०२५ रोजीच घेण्यात येत आहे. नेहमीची डिसेंबर–जानेवारीत जाहिरात आणि मार्चमध्ये परीक्षा होण्याची परंपरा यावेळी अचानक बदलण्यात आली.
१ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्यामुळे, अनेक वर्षांपासून सातत्याने मेहनत करणारे हजारो उमेदवार केवळ वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी शासनाकडे न्याय मागत आहेत, आंदोलन करत आहेत, निवेदन देत आहेत—मात्र अद्याप कोणताही दिलासादायक निर्णय झालेला नाही.
या उमेदवारांनी आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे या परीक्षेसाठी दिली आहेत. केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू नये. ही बाब केवळ परीक्षा नाही, तर हजारो तरुणांच्या भवितव्याशी निगडित आहे.
राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवून न्याय्य निर्णय घ्यावा आणि सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी द्यावी, हीच अपेक्षा.
@cmomaharashtra@Dev_Fadnavis@Mpsc_Andolan@NCPspeaks@supriya_sule
#MPSC #MPSCStudents #AgeRelaxation #JusticeForAspirants #स्पर्धा_परीक्षा #विद्यार्थी_न्याय
राज्यभरातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संयुक्त गट-ब (PSI) पदासाठी १ वर्ष वय सवलत देण्याची मागणी केली आहे. संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ ची जाहिरात ७ महिने उशिराने प्रसिद्ध झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे वंचित राहत आहेत. गेल्या ७ महिन्यांपासून विद्यार्थी शासनाकडे न्याय मागत असतानाही निर्णय होत नाही.
शासनाने २०२४ च्या परीक्षेसाठी १ वर्ष वय सवलत दिली होती तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीतही १ वर्षाची सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर अंतिम संधी शिल्लक असलेल्या उमेदवारांच्या हिताचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही १ वर्ष वय सवलत द्यावी, ही विनंती.
@CMOMaharashtra@mpsc_office
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.
१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.
२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा.
वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Maha_GoodGovern@maharevenue