@Dhananjay4INC Asistant Draftsman पदासाठी निवड झाली असून, सर्व प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. तरी नियुक्ती मिळत नसेल तर तरुणांनी काय करावे... आधीच 3 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. कृपया निवड झालेल्या उमेदवारांना शासनाने लवकरात लवकर नियुक्ती द्यावी हीच विनंती...
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, महा��ाष्ट्र राज्य
मा. उदय सामंत - मंत्री, उद्योग विभाग तथा अध्यक्ष, MIDC
मा. पी. वेलरासू, IAS - मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC
विषय : MIDC सरळसेवा पदभरती 2023 – सहाय्यक आरेखक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सन 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सरळसेवा पदभरतीतील सहाय्यक आरेखक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक���ती आदेश देण्यात आलेले नाहीत. भरती प्रक्रियेतील सर्व प्रमुख टप्पे पूर्ण झालेले असूनही हा विलंब सुरू आहे.
भरती प्रक्रियेचा तपशील :
जाहिरात – 13/08/2023 | परीक्षा – 06/08/2025 | गुणवत्ता यादी – 08/10/2025 | निवड यादी – 10/02/2026 | कागदपत्र पडताळणी – 06/05/2026
अर्थात, उमेदवारांनी परीक्षा, गुणवत्ता यादी, अंतिम निवड यादी आणि कागदपत्र पडताळणी असे सर्व टप्पे पूर्ण केले आहेत. तरीही नियुक्ती आदेश प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. भरती���ी जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. या प्रदीर्घ विलंबामुळे निवड झालेल्या युवकांना मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्या करिअरचे व भविष्यातील नियोजनाचे नुकसान होत आहे.
शासन युवकांना रोजगार देण्याच्या घोषणा करीत असताना, शासनाच्या स्वतःच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांनाच नियुक्तीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा क���ावी लागणे ही गंभीर विसंगती आहे.
म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्��यंरोजगार विभागाच्या वतीने पुढील मागण्या करीत आहे :
1. सहाय्यक आरेखक पदासाठी निवड झालेल्या सर्व पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित करावेत.
2. नियुक्तीस विलंब करणारी कोणतीही प्रशासकीय/तांत्रिक अडचण असल्यास तिचे कारण लेखी स्वरूपात स्पष्ट करावे.
3. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निश्चित अंतिम कालमर्यादा जाहीर करावी.
4. या विलंबाची तातडीने प्रशासकीय समीक्षा करून जबाब��ारी निश्चित करावी.
निवड झालेल्या युवकांना आश्वासने नकोत; त्यांना नियुक्ती आदेश हवेत. या प्रकरणात तातडीने निर्णय न झाल्यास, निवड झालेल्या उमेदवारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल, याची कृपया नोंद घ्यावी.
आपण तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक व कालबद्ध निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal @INCMaharashtra @Dev_Fadnavis @samant_uday @midc_india
@Dhananjay4INC खूपच slow process चालू आहे MIDC भरती ची यामुळे मुलांचा मानसिक ताण वाढत चाललाय. 2023 ची भरती आहे आणि 2026 संपत आलंय. आता तरी भरती प्रक्रिया विभागाने जलद गतीने पूर्ण करून घ्यावी हीच विनंती...
३ वर्षे, ३ CEO, ३ GM (HR) बदलले; पण MIDC वर्ग १ भरतीतील उमेदवारांच्या हाती अजूनही शून्य!
जुलै २०२३ ची जाहिरात. २०२६ संपत आलं तर�� भरती प्रक्रिया अपूर्ण. वर्ग २ मधील ५९०+ उमेदवारांना वेळेवर नियुक्ती मिळते, मग वर्ग १ उमेदवारांवर हा विलंब का? मुख्यमंत्र्यांचे “पारदर्शक व जलद भरती”चे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
तरुणांच्या भवितव्याशी अशी अनिश्चितता का? सरकारने तातडीने वेळबद्ध प्रक्रिया जाहीर करून नियुक्त्या पूर्ण कराव्यात.
@INCHarshsapkal @VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @samant_uday @midc_india
#MIDC #MIDCRecruitment #RojgarNyay #MaharashtraJobs #YouthForJobs #StudentsVoice #dhananjayshinde #RojgarAdhikar
@Dhananjay4INC MIDC सर्व पोस्ट चे selected उमेदवारांना joining मिळालेली आहे. फक्त Assistant Draftsman या एकाच पोस्ट ची joining दिलेली नाहीये. निवड झालेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. Already 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय भरती प्रक्रिया चालु आहे अजून किती प्रतीक्षा करावी...
MIDC सरळसेवा पदभरती 2023 मधील Assistant Draftsman पदांच्या नियुक्ती आदेशांना आणखी किती विलंब?
MIDC सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत गट-ब व गट-क संवर्गातील जवळपास सर्व पदांचे नियुक्ती आदेश दोन आठवड्यांपूर्वी निर्गमित झाले आहेत. मात्र Assistant Draftsman पदांवरील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश अद्यापही प्रलंबित आहेत.
मागील तीन वर्षांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. निवड होऊनही केवळ नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या अनावश्यक विलंबामुळे मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आण��ी प्रतीक्षा करायला लावणे अन्यायकारक आहे.
MIDC प्रशासनाने कोणताही विलंब न करता Assistant Draftsman पदांचे नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित करावेत आणि पात्र व निवड झालेल्या उमेदवारांना न्याय द्यावा.
निवड झाली आहे, आता नियुक्तीचा अधिकार मिळालाच पाहिजे.
@INCMaharashtra @midc_india @samant_uday @degree_holders
@CongressRojgar
#MIDC #MIDCRecruitment2023 #AssistantDraftsman #RojgarNyay #Jobs #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@Dhananjay4INC MIDC सगळ्या पोस्ट चे joining order आलेत फक्त सहाय्यक आरेखक आणि क्षेत्र व्यवस्थापक या दोन पोस्ट चे joining order अद्याप आलेले नाहीत. आधीच 3 वर्षे झाले भरती चालू आहे. अजून किती वाट बघायची विद्यार्थ्यांनी.....
MIDC सरळसेवा भरती 2023 अंतर्गत गट-ब व गट-क मधील जवळपास सर्व पदांचे नियुक्ती आदेश दोन आठवड्यांपूर्वी निर्गमित झाले आहेत.
मात्र क्षेत्र व्यवस्थापक (Area Manager) आणि सहाय्यक आरेखक (Assistant Draftsman) या दोन पदांचे नियुक्ती आदेश अद्यापही प्रलंबित आहेत. ही भरती प्रक्रिया गेली तीन वर्षे सुरू आहे. अंतिम निवड होऊनही केवळ नियुक्ती आदेशांच्या विलंबामुळे उमेदवारांना मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करायला लावणे अन्यायकारक आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन क्षेत्र व्यवस्थापक आणि सहाय्यक आरेखक पदांचे नियुक्ती आदेश त्वरित निर्गमि��� करावेत आणि निवड झालेल्या उमेदवारांना न्याय द्यावा.
निवड झाली आहे, आता नियुक्तीही झाली पाहिजे!
@samant_uday @INCHarshsapkal @MiDC_Official @degree_holders @Mpsc_Andolan
#MIDC #MIDCRecruitment2023 #AppointmentOrders #JobsForYouth #Maharashtra
माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी, समग्र शिक्षा मे कार्यरत हजारों व्यावसायिक शिक्षकों को शोषण से मुक्त कर जल्द हमारे लिए उचित पॉलिसी व जॉब सिक्योरिटी का प्रावधान करवाने की कृपा करें | साथ ही हमारी सैलरी न्यूनतम 35000 रूपये करने की कृपा करें |
#Remove_VTP_Save_VT@dpradhanbjp