माजी केंद्रीय कृषिमंत्री, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला निरामय दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.
@PawarSpeaks
आज राजूर, ता. अकोले येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आज आमचा एक सहकारी गेल्याचे अतिदुःख आम्हाला झाले आहे. याप्रसंगी पिचड कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ पिचड कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
विधिमंडळातील आमचे जुने सहकारी, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. या कठीणप्रसंगी मी त्यांच्या परिवाराप्रती सहवेदना व्यक्त करतो व पिचड कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नंदुरबारमधील वरपली या गावात १७ आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला. खा.शरद पवार व मधुकर पिचड १४ की.मी चालून त्या गावात पोहचले व पाहणी केली.
या घटनेनंतर देशातील पहिले आदिवासी बजेट महाराष्ट्राच्या विधानसभेत मधुकर पिचड यांनी मांडले.
या बजेटचे देशाने कौतुक केले.
#मधुकर_पिचड
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज भेट घेत त्यांचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
@Dev_Fadnavis
कृषी व उद्योगाची सांगड घालत राज्याच्या समतोल विकासाचे ध्येय निश्चित केले आणि आधुनिक व पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करण्यात मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात सलग आठव्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब व इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्रातील या ऐतहासिक विजयाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
आंबेगाव-शिरूर विधानसभेच्या जनतेस हा अष्टविजय सुपूर्द!
निवडणूकीच्या या प्रचारात माझ्यामागे खंबीरपणे उभे राहणारी आंबेगाव-शिरूरची मायबाप जनता, सर्व सहकारी, महायुतीमधील सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार!
आंबेगाव-शिरूरच्या जनतेसोबत माझे गेल्या 35 वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत! हे नातं येत्या काळात आणखी वृद्धिंगत करण्यासाठी मी कटीबद्ध असणार आहे. हा मतदारसंघ नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाच्या हितासाठीच 35 वर्षे मी झटत आलोय, यापुढील माझा प्रवास हा आंबेगाव-शिरूरच्या हिताचाच असणार, अशी ग्वाही आपणा सर्वांना देतो!
📍 फुटानवाडी, पिंपळवाडी, भोरशेत, माळवाडी
आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील फुटानवाडी, पिंपळवाडी, भोरशेत, माळवाडी या गावांना भेट दिली. यावेळी या गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला व शिरूर तालुक्यातील या गावांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्यापासून लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.(1/2)