यावर्षी ८० बैग सोयाबीन टाकल होत, बापाला बोललो १०० mm पाणी झाल्याशिवाय टाकु नका तरी टाकल, दुबार पेरणीत परत ३० बैग टाकायच काम पडल. चला हंगाम जमला बोललो तर पैनगंगेन होत्याच नव्हत केल आत्तापर्यत टोटल ११० बैग सोयाबीन, बाकी लागलेला खर्च वेगळा व मातीपन खरडून नेली.
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय.
खरंतर आज माझा मुंबई म��ानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे !
मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही.
#शहर_वि��ास
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून न्याय दिला पण आता शेतकऱ्यांच्या पोरांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेला बळ द्यावे, याकरिता २३ जून का कोल्हापुरात उपस्थित राहावे लागते: मा.खासदार राजू शेट्टी साहेब. @rajushetti@SRSspeaks_
#वसुली#टक्केवारी असे शब्द या सरकारच्या काळात सामान्य झाले आहे,पण जिथ लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तिथ तरी भ्रष्टाचार करू नका
या सर्व भ्रष्टाचाराचे मुळ महा-आयटी असून न्यायालयाने,विद्यार्थांसाठी Suo-Moto घेत आयटीचे आजी-माजी अधिकारी आणि मंत्री यांची चौकशी करायला हवी
एकीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दडपण व सततचे प्रलंबन व गैरप्रकारामुळे नैराश्य येऊन आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. तर दुसरीकडे धनाचा वापर करून या परीक्षांमध्ये गैरप्रकार केले जात आहेत. मनापासून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्या���वर हा अन्याय आहे.
हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. भाऊ-भाऊ किंवा बहिण-भाऊ अशा अनेकांना गुणा��ची खैरात वाटण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काहीही येत नाही त्यांना ९९ टक्के गुण देण्यात आले आहेत. हे गौडबंगाल न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही.
आरोग्यभरती,म्हाडा आणि TeT नंतर आता MIDCच्या परिक्षेतही गैरप्रकार समोर आला आहे. एकाच कुटुंबातील विद्यार्थ्यांना भरघोस मार्क, TCSने घेतलेल्या परीक्षेत शून्य गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना Aptech या काळ्या यादीत नाव असलेल्या कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत भरभरून गुण मिळाले आहेत,
सरकार कोणाचेही असो मंत्रिपदावर बसून साध्या परीक्षा सुरळीत आणि पारदर्शी घेता येत नसतील तर आपण त्या पदावर बसण्यासाठी योग्य आहोत का? लाखो तरुणांच्या ��वितव्याशी खेळ होतो, संधी देणारी व्यवस्थाच भ्रष्ट असेल तर संधी मिळवलेले उमेदवार निष्ठेने काम करतील का?
Mkcl ब्लॅकलिस्ट असल्याची बामती लोकसत्ताने दाखवली आहे मागील महिन्यातच...तसे गूगल वर पण माहिती आहे त्याची...@satejp@CMOMaharashtra साहेब परत चूक करू नका...खाजगी कंपनीचा अट्टाहास कश्यासाठी???
Mpsc आयोग तयार असताना का देत नाहीत परीक्षा तुम्ही त्यांच्याकडे??
@Mpsc_Andolan
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#आरोग्यभरती_भोंगळभरती#न्यासावीर@rajeshtope11 साहेब आरोग्य भरतीवर काही बोलणार आहात का? गुन्हा नोंद झाला काही जण पकडले तरी आपण शांत. बोला काही तरी महाराष्ट्र मधील विध्यार्थी आपण कधी बोलताय याची वाट पाहत आहेत. आपण सांगितले होते पेपर ला डिजिटल लॉक आहेत ते फक्त न्यासाच्या
आता तरी सरकार मधील नेते जाग होतील का?? महाराष्ट्राला कित्येक दिवस झालं मुख्यमंत्री नाहीत, @BSKoshyari साहेब कमीतकमी आपण तरी लक्ष द्या आता...
@satejp साहेब आतातरी आपण यावर बोलायला हवं��. 6 लाख विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, आरोग्यभरती रद्द झाली पाहिजे...
@Mpsc_Andolan
#टोपे_राजीनामा_द्या@rajeshtope11 खरच आपण या पुरस्काराचे लायक आहात. आपण शेतकऱ्यांनच्या मुलांचे जीवन, भविष्य खूप चांगले केले. त्यांच्या जीवनाचा उद्धार केला साहेब आपण. आपल्याला #न्यासावीर पुरस्कार कुठे मिळतो ते पण पाहू. आज तुम्हाला लाखो मुलांचे आशीर्वाद मिळत असेल साहेब.
@satejp