Hi, my name is @shelake_ishwar, and I’m a $MEME (@Memecoin) farmer at @Memeland.
On my honor, I promise that I will do my best to do my duty to my own bag, and to farm #MEMEPOINTS at all times.
It ain’t much, but it’s honest work. 🧑🌾
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन #कंत्राटी_कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
सध्याच्या राज्य सरकार ला बहुदा पुन्हा सत्तेत यायचे नसावे. सरकार ने त्यांचे उरलेले अकरा महिने कंत्राटी भरती प्रमाणेच घालवावे कारण पुढील काळात पुन्हा काय तुम्हाला युवा वर्ग कामावर रुजू करून घेणार नाही.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
काल राज्याचे मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले, सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी आम्ही दोन हजार कोटी रुपये दिलेत. मुख्यमंत्री महोदय ही बघा सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीची अवस्था. आणखी किती फसवणूक मराठा समाजाची करणार ?
माझे सरकारला चार प्रश्न आहेत. त्याची उत्तर सरकारने द्यावी
प्रश्न १) 'सारथी'द्वारे पदवीसाठी ३० लाख, तर पीएचडी साठी ४० लाखांच्या मर्यादित शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ओबीसी व समाजकल्याण विभागाद्वारे परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम शुल्क (रकमेची मर्यादा नाही), याशिवाय विमान प्रवास भाडे, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा, स्टेशनरी शुल्क, अर्जाचे शुल्क देण्यात येते.अशीच सुविधा देण्यात हरकत काय?
प्रश्न २) ७५ जागांसाठी फक्त ८२ अर्ज संस्थेला प्राप्त झाले आहेत. आपल्या जाचक अटींमुळे विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, तरी सारथीने मुदतवाढ का दिली नाही ?
प्रश्न ३) ओबीसी आणि समाजकल्याणसाठी पदवीला ५५ ते ६० टक्क्यांची अट, मग सारथीला ७५ टक्क्यांची अट का?
प्रश्न ४) जाहीरतीवर कोट्यावधी खर्च मग सारथीच्या योजनावरती का नाही?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@TanajiSawant4MH@Dev_Fadnavis सर आरोग्य सेवक पद पात्रता आत्ता बारावी सायन्स अशी केली आहे पुर्वी 10 पास होती .12वी सायन्स ला विरोध नही पण ही जाहिरात जुनी आहे तेव्हा आम्ही पात्र होतो .पण पेपर फुटला त्यात आमचा काय दोष.सरकारने आम्हाला एक संधी द्यावी
मा.@mpsc_office च्या इतिहासातील सर्वाधिक आंदोलने,रखडलेल्या परीक्षा व निकाल,उमेदवारांवर अन्यायकारक जाचक निर्णय लादणारे, online mains द्वारे संविधानिक जबाबदारी झटकणारे अध्यक्ष महोदय 19sepला निवृत्त होत आहेत
मा.@mieknathshinde सर नवीन अध्यक्ष निवडताना सर्वसमावेशक विचार व्हावा🙏
राज्यात सुरु असलेल्या #सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर #पेपरफुटी च्या घटना समोर येत आहेत. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादात #पेपरफुटी वर कडक कायदा आणण्याची #युवा वर्गाची आग्रही मागणी दिसून आलेली आहे. #उत्तराखंड सरकारने आणलेला #कायदा नक्कीच प्रभावशाली आहे. त्याच धर्तीवर आपल्या राज्यात देखील कडक कायदा आणावा यासाठी #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@RRPSpeaks लाखो मुलांचा विचार करून न्याय मागणी Cm साहेब कडे लाऊन धरली त्याबद्दल खूप खूप आभार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वतीने! एक कट ऑफ लावण्यात काहीही अडचण नाही,राज्यसेवा ३२ पदासाठी एक लागतो, मग संयुक्त पूर्व ला च वेगळा न्याय का बस नाही लावायचा तर नाही लावायचा हम बोले सो कायदा एवढाच कारण.
तलाठी भरतीमध्ये होणाऱ्या पेपरफुटीवर, भ्रष्टाचारावर आणि फिस वाढी साठी आम आदमी पार्टी व स्पर्धा परीक्षा समन्वय समिती भीक मांगो आंदोलन....!
@AamAadmiParty@Mpsc_Andolan
सरकार आणि प्रशासन जागे व्हा....
सरळसेवा mpsc मार्फत घ्या.
@RRPSpeaks@RRPSpeaks धन्यवाद साहेब...!
स्पर्धापरीक्षा मुलांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल धन्यवाद.
इतर तरुण लोकप्रतिनिधीनी विद्यार्थ्यांनाच्या प्रश्नांबाबत जागरूक व्हायला हवे.
गट ब आणि क यांचा एक कटऑफ बाबत मा. मुख्यमंत्री साहेब याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
#स्पर्धा_परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची एकच आग्रही मागणी आहे ती म्हणजे #एक_परीक्षा_एक_कटऑफ . आज या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची भावना त्यांच्यापर्यंत पोहचवली. त्यांनी देखील या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत हा विषय निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
@mieknathshinde