PWD CEA मागणीपत्र जाऊन सुद्धा जाहिरात नाही मग civil enggची दिवाळी गोड कशी होणार?
हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य जाहिरातीच्या प्रतीक्षेत. शासनाने आता तरी जागं व्हावं जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी!
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका! @mpsc_office@Shivendraraje11@CMOMaharashtra
MMRDA चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करा
PMC भरतीत अनियमितता आढळल्यास फेरपरीक्षा घ्या
MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करत आहे.
MMRDA भरती घोटाळा चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDA आणि मुंबई मेट्रो-१शी संबंधित त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेमुळे चौकशीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना समितीतून तात्काळ हटवून प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SITमार्फत चौकशी करावी. परीक्षा डेटा, सर्व्हर लॉग्स, CCTV फुटेज आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. या प्रकरणी काँग्रेसने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट मागितली असून, स्वतंत्र निवेदन सादर केले जाणार आहे.
PMC भरतीतील तक्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. गंभीर गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
1. MMRDA भरतीची कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करावी.
2. जॉनी जोसेफ यांना चौकशी समितीतून तात्काळ हटवावे.
3. MMRDA भरतीतील डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
4. PMC भरतीतील तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी.
5. अनियमितता सिद्ध झाल्यास PMCची फेरपरीक्षा घ्यावी.
6. दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड काँग्रेस स्वीकारणार नाही. दोषींवर कारवाई आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.
@INCHarshsapkal@satejp@PMCPune@VijayWadettiwar@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET @degree_holders @Mpsc_Andolan@INCRojgar
🚨 MMRDA भरती परीक्षा प्रकरणी उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद 🚨
MMRDA भरती परीक्षा २०२६ संदर्भात हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर उद्या पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या तक्रारी, उपलब्ध कागदपत्रे आणि या संपूर्ण भरती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील दिशा आणि महत्त्वाच्या मागण्या उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येतील.
📍 टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई
🗓️ बुधवार, २६ ऑगस्ट २०२६
⏰ दुपारी २.०० वाजता
हा कोणत्याही व्यक्तीविरोधातील विषय नाही. हा प्रश्न आहे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा आणि न्यायाचा. सर्व विद्यार्थी, पालक आणि रोजगाराच्या प्रश्नाशी संबंधित नागरिकांनी उद्याच्या पत्रकार परिषदेची माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर करावी.
उद्याची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एक महत्त्वाचे पाऊल!
@INCMaharashtra@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET @degree_holders @Mpsc_Andolan@mpsc_office@PunyachiMPSC@UPSCinMarathi
#MMRDA #MMRDABharti #रोजगारन्याय #विद्यार्थ्यांचान्याय #भरतीपरीक्षा #StudentsJustice
One candidate went from 60 and 80 in recent exams to 200 out of 200 in MMRDA JE Civil. 😳
Another reportedly jumped from single digits to 196. And 13 of 16 toppers came from one Nagpur centre.
Abhijit Dipke: What magic was happening there? If jobs are being managed by setting, stop this exam drama and auction government jobs like IPL.
Aspirants: We protest for advertisement, centre, result and joining. If students fight for every basic step, when will they study?
पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणायचं आणि त्याच पुण्यात पेपरफुटी, परीक्षा घोटाळे आणि भरतीतील अनियमितता सुरू ठेवायची, हा चंद्रकांत पाटील यांच्या विभागाचा कारभार आहे.
@ChDadaPatil
WRD JE CEA परीक्षा #MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच झाली पाहिजे, WRD विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@girishdmahajan@RVikhePatil#WRD_JE
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
MMRDA मार्फत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांसह इतर काही पदांच्या भरती प्रक्रियेत निगेटिव्ह मार्किंग पद्धत असतानाही काही विद्यार्थ्यांना १९२ ते १९६ गुण मिळाले आहेत. यावरून या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही शिंदे साहेब यांच्याकडं यावेळी केली. त्यावर तत्काळ चौकशी करण्याचे आदेश त्यांनी MMRDA च्या आयुक्तांना दिले.
@mieknathshinde
MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करा: धनंजय शिंदे
मुंबई, दि. १७ ऑगस्ट २६
भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता MMRDA च्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. या परिक्षेचा १४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेला निकाल आणि गुणवत्ता यादीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मेरिट लिस्टच्या प्राथमिक अभ्यासातून गुणांतील काही लक्षणीय तफावती, अत्यंत उच्च गुण व रँक तसेच इतर अभियांत्रिकी परीक्षांतील संबंधित उमेदवारांच्या कामगिरीशी तुलना करता गंभीर प्रश्न समोर आले आहेत. MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केली आहे.
टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे पुढे म्हणाले की, MMRDA ने २३५ जागांसाठी घेतलेल्या परिक्षेत ज्या विद्यार्थांना २०० पैकी १९० पेक्षा जास्त मार्क्स मिळालेत त्याच्या अभ्यास केला असता असे निदर्शनास आले आहे की, मेरिट लिस्टमधील १, २, व ३ क्रमांकाचे विद्यार्थी एकाच केंद्रावरील आहेत, ४, ५ व ६ क्रमांकाचे विद्यार्थी एकाच केंद्रावरील आहेत. तसेच ७,८ व ९, १०, ११ आणि १४ व १५ क्रमांकाचे विद्यार्थी हे एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. अभियांत्रिकीच्या ज्या वेगवेगळ्या विभागातील परीक्षामध्ये याच मेरिट लिस्टमधील विद्यार्थांना १०० पैकी ७.५, १० व १५ असे गुण मिळाले आहेत. MMRDA च्या परिक्षेत १९७, १९८ मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी BMC च्या अभियांत्रिकी परिक्षेत मात्र १०, १५ मार्क्स मिळवले आहेत. जी चार मुले टॉपर आली आहेत त्यांचे वडील नगर विकास विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत, हे सर्व पाहता एमएमआरडीएच्या परिक्षेत मोठा घोटाळा झालेला दिसत आहे. याची सखोल चौकशी करून परिक्षा रद्द करावी. सर्व परिक्षा ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांना मिळवून देण्यासाठी एमएमआरडीएला जाब विचारू असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा MMRDA चे अध्यक्ष एकनाथ शिंदे, MMRDA चे महानगर आयुक्त, संजय मुखर्जी यांनी परिक्षेतील घोटाळ्यावर खुलासा करावा. तसेच संजय मुखर्जी यांची तीन वर्षाची मुदत संपली असतानाही ते एमएमआरडीएच्या महानगर आयुक्त पदावर अद्याप कायम कसे आहेत, याचाही खुलासा करावा असे धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.
@RahulGandhi@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@Dhananjay4INC@INCMaharashtra@INCIndia@MahaChiefSec@MMRDAOfficial@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMMOCL_Official@MahaDgipr@PIBMumbai@PIB_India
'पेपरफुटी आणि सावळागोंधळ' ही राज्यातील प्रत्येक भरती परीक्षेची ओळख बनली आहे. आज हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतही हाच प्रकार घडला. लॉगिन न होणे, की-बोर्ड बंद असणे आणि टायपिंग सॉफ्टवेअर न चालणे या तांत्रिक त्रुटींसह पेपरफुटीमुळे राज्यात विविध ठिकाणी संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांसोबत आहोत. ही सदोष परीक्षा तातडीने रद्द करून फेरपरीक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis
#पेपरफुटी
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
एका पेपरफुटीला गुन्हे शाखा, दुसऱ्या पेपरफुटीला संरक्षण?
औषध निरीक्षक (DI) भरतीच्या कथित पेपरफुटी प्रकरणात पुरावे समोर आल्यानंतर MPSC ने स्वतः गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. मग पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणात दुहेरी निकष का? विद्यार्थ्यांनी पुरावे सादर करूनही पुणे महानगरपालिका गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करत नाही. उलट, विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुरू असलेल्या पोलिस तपासाबाबत “महानगरपालिका स्वतः तपास करत आहे” असे पत्र शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस तपासावर परिणाम झाल्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर MPSC ला गुन्हे शाखेच्या निष्पक्ष तपासावर विश्वास असेल, तर पुणे महानगरपालिकेला नेमका काय आक्षेप आहे?
पारदर्शकता हवी असेल तर एकच निकष हवा.विद्यार्थ्यांना न्याय हवाय त्यामुळे स्वतंत्र गुन्हे शाखेचा तपास झालाच पाहिजे. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि पुणे महानगरपालिकेने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड आम्हाला अजिबात मान्य नाही!
@INCHarshsapkal@mpsc_office@PMCPune@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#JusticeForStudents #PaperLeak #PMC #Recruitment #Maharashtra
राज्याचे मुख्यमंत्री आणि लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेल्या घोषणेप्रमाणे ५० ते ६० हजार पदभरती जाहिराती २०२६ मध्येच प्रसिद्ध कराव्या लागतील.....!
@Dev_Fadnavis
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय (TPA) मधील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) पदाची नवीन जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावी हजारो विद्यार्थी जाहिरातीच्या प्रतीक्षेत. #TPA@MAHA_UDD@madhurimisal@mieknathshinde@CMOMaharashtra