चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयुर कांबळे ह्यांच्यावतीने छत्री वाटप करण्यात येणार आहे. ह्या उपक्रमांतर्गत आज छत्रीचे अनावरण केले. ह्यावेळी शिवसेना सचिव सुधीर साळवी जी, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे जी उपस्थित होते.
आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या सशस्त्र दलांना सलाम!
तसंच, सीमावर्ती राज्यं, जिल्हे, गावं आणि तिथल्या नागरिकांना त्यांच्या धैर्य, शौर्य आणि सामर्थ्यासाठी मानाचा मुजरा!
गेल्या काही दिवसांत त्यांनी जे अनुभवलंय, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
ह्यासोबतच युद्धसदृश परिस्थितीतही आपल्या नागरी सेवा अबाधित राहाव्यात ह्यासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रशासनिक सेवांनाही सलाम.
जय हिंद!
The Pahalgam terror attack is another dastardly attack on a State that is wanting to heal, and on innocents who were shot dead by terrorists…
Terrorists who deserve to be chased and destroyed wherever they are/ come from.
While we pray for peace, offer condolences to those who lost their lives, hope for quick recovery of the injured and hope that there will be a strong response against terrorists, questions must be asked on the security lapses and how this happened.
Real answers will be justice and more so, a strong answer to the attackers, to bring them to justice.
#PahalgamTerroristAttack
मुंबईकरांवर ओढवलेली पाण्याची नामुष्की आणि अकार्यक्षम प्रशासनाविरोधात विभाग कार्यालयांवर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा आम्ही महापालिकेला दिला होता.
त्यानुसार मुंबईकरांच्या पाण्याच्या हक्कासाठी आवाज उठवताना आज दादर येथे जी- उत्तर आणि सी विभाग कार्यालय येथे आंदोलन सुरु करण्यापूर्वीच विभागप्रमुख संतोष शिंदे आणि शिवसैनिकांना अटक करण्यात आली.
सामान्यांच्या हक्कासाठी लढणे आणि प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आवाज उठवणे देखील, ह्या कपटी सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे.
ह्या दडपशाहीचा जाहीर निषेध!
@shinde221
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या मोर्चाच्या हाकेनंतर आज शेवटी मुंबईच्या आयुक्तांनी टॅंकर असोसिएशनला हमी दिली आणि संप मागे घेतला गेला, पण तरीही काही प्रश्न उरतातच!
वारंवार टॅंकर असोसिएशन कडून दिल्या गेलेल्या इशाऱ्यांनंतरही व गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या संपानंतरही आजवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं नियंत्रण असलेली मुंबई महानगरपालिका गप्प का होती?
महावीर जयंती, हनुमान जयंती आणि आंबेडकर जयंतीसारख्या सणांच्या दिवशी मुंबईकरांना मुद्दाम त्रास देण्यासाठीच ह्या संपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं का?
संप समाप्तीची घोषणा मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून होण्याऐवजी भाजपा आमदाराच्या मंचावरुन होणं तर जास्त शंका निर्माण करणारं नाहीये का? जणू काही क्रेडिट घेण्यासाठी मुद्दाम संप २ दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आणि मग श्रेय घेण्यासाठी नाटक केलं?
मुंबईकरांनी भाजपाचा हा डाव आणि मुंबईबद्दल असलेला आकस वेळीच ओळखावा.
मुंबईकरांचं भलं करण्याऐवजी मुंबईकरांना वेठीस धरुन स्वतःचं राजकारण खेळण्याची ह्यांची वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे.
The water tanker association strike has hit Mumbai hard.
Many residential buildings and commercial establishments are without adequate water.
The government MUST intervene and ensure that the association demands are met and water supply resumes.
The association had given advance notice to @mybmc and state government about the strike, and they didn't bother even responding to it.
I urge the @CMOMaharashtra to meet with them, hear them out and put their concerns to the Govt of India with regards to the practicalities of implementing the new guidelines in a city like Mumbai.
दूषित पाणी, कमी दाबाने येणारं पाणी, अघोषित पाणी कपात अश्या पाण्याच्या अनेक समस्यांनी मुंबईकर गेले काही महिने हैराण आहेत.
त्यातच पाणी टॅंकर्सचा संप सुरु झाल्याने मुंबईत अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात महावीर जयंती, आजची हनुमान जयंती, येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे मोठे राष्ट्रीय सण सुरु असताना मुंबईकरांना ह्या समस्येला सामोरं जावं लागतंय.
पण वारंवार लक्ष वेधूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? असा प्रश्न पडतोय!
पण मुंबईकर म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही! पुढच्या ४८ तासात जर हा प्रश्न सुटला नाही, तर शिवसैनिक आणि मुंबईकर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाणार आणि 'वॉर्ड ऑफिसर' ना जाब विचारणार!
एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या तारखेबद्दल, तिथल्या नागरिकांच्या समस्येबद्दल आणि होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत उपाययोजना सुचवणारे व महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधणारे पत्र MMRDA अध्यक्षांना लिहिले.
ते ह्या पत्राची दखल घेऊन योग्य निर्णय घेतील आणि परिसरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल ह्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा आहे.
मुंबई टँकर असोसिएशनने आज संपाची हाक दिली असून, पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ह्या दिवसांत अनेक गृहनिर्माण सोसायट्या, उंच इमारती, चाळी, व्यावसायिक कार्यालये आणि उद्योगांना ह्याचा फटका बसणार आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाने बल्क वॉटर सप्लायर्ससाठी ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत, त्यातील अडचणी सोडवल्या जाव्या, ह्या मागणीसाठी असोसिएशन आंदोलन करत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित असून, महाराष्ट्र सरकारने तो अजूनही केंद्र सरकारकडे गांभीर्याने मांडलेला नाही.
आज दिल्लीतील सरकारी कार्यालयांत बसून बनवलेल्या काही अव्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वांमुळे मुंबईकरांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.
मी बीएमसी आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना 'ह्या पाणीबाणीवर महापालिकेकडे काय उपाययोजना आहे', हे स्पष्टपणे सांगावे.
तसेच, एसंशि सरकारने आमच्या कार्यकाळात नियोजित केलेला खारपाणी गाळण प्रकल्प (डिसॅलिनेशन प्लांट) रद्द केला नसता, तर २०२६ पर्यंत मुंबईचे पाणी संकट संपले असते.
दक्षिण मध्य मुंबईच्या समस्यांवर तोडगा — महापालिका आयुक्तांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित कामांबाबत महापालिका आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीस शिवसेना उपनेते व माजी महापौर श्री. मिलिंद वैद्य, आमदार व विभागप्रमुख श्री. महेश सावंत, विभागप्रमुख श्री. प्रमोद शिंदे, माजी महापौर सौ. श्रद्धा जाधव, तसेच माजी नगरसेवक श्री. श्रीकांत शेट्ये यांची उपस्थिती लाभली.
नागरिकांच्या अडचणींवर ठोस उपायांसाठी ठाम पावले — विकासाच्या दिशेने मजबूत वाटचाल!
#ShivsenaUBT #Mumbai #localissues #SouthCentralMumbai #BMC #AnilDesaiForDevelopment #AnilDesai
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय कामगार सेनेची @OfficeofBKS मध्यवर्ती कार्यकारिणी सभा संपन्न झाली. सभेत उपस्थितांसोबत संवाद साधला.
#ShivsenaUBT#BhartiyaKamgarSena@OfficeofUT@AUThackeray
सदर सभेस कार्याध्यक्ष श्री. अजित साळवी; उपाध्यक्ष श्री. विनोद घोसाळकर, उपनेते; उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ खोत, उपनेते; उपाध्यक्ष श्री. मनोहर भिसे; सरचिटणीस श्री. @AhirsachinAhir आमदार, उपनेते; सरचिटणीस श्री. @KuchikR, उपनेते; चिटणीस श्री. @manojjamsutkars , आमदार; खजिनदार श्री. मनोहर साळवी; संयुक्त सरचिटणीस श्री. संजय कदम; संयुक्त सरचिटणीस श्री. @DilipJadhav_; संयुक्त सरचिटणीस श्री. प्रभाकर मते पाटील तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या पूल उभारणीच्या कामात नियोजनाचा अभाव... गलथान कारभारामुळे नागरिकांचे, रुग्णांचे होणार हाल!!!
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी ह्यांना पत्राद्वारे एल्फिस्टन येथील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या पुलाच्या (RoB) तोडकामाबाबत पत्र लिहुन संभावित गैरसोयींकडे लक्ष वेधुन प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पादचारी पूल तयार होत नाही तो पर्यंत हा पूल तोडण्यात येऊ नये अशी मागणी केली.
एल्फिन्स्टन येथील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा पूल तोडण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पूल बांधण्यासाठी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला आहे, परंतु अद्याप ह्या मुद्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पूर्वेला के. ई. एम. हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल ही रुग्णालये, महर्षी दयानंद कॉलेज तसेच अनेक आस्थापने आहेत. जर एल्फिन्स्टनचा हा पूल योग्य पर्याय उपलब्ध करून न देता पाडण्यात आला तर अनेक रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी ह्यांचे अतोनात हाल होणार आहेत.
प्रभादेवी स्थानकात उतरून विद्यार्थी येत असतात. हा पूल तोडला तर प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून येणारे व स्थानकात उतरून पूर्वेकडे येणारे रुग्ण, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी वर्ग या सर्वांचे अतोनात हाल होणार आहेत कारण त्यांना या विभागात येण्यासाठी एक तर दादर स्टेशनच्या टिळक पुलाचा किंवा पुढे करी रोड पुलाचा वापर करून संपूर्ण वळसा घालून यावे लगेल.
सबब प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉप पर्यंत पादचारी पूल उभारल्यानंतरच हा पूल तोडण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
#ArvindSawant #ShivsenaUBT #दक्षिणमुंबई #आपलामाणूस
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm