🚨 #MMRDA भरती निकालाबाबत गंभीर प्रश्न!
नुकत्याच जाहीर झालेल्या Assistant Engineer Grade-2 / Junior Engineer (Civil) निकालातील Normalization वर गंभीर शंका निर्माण होत आहेत. निकालाच्या यादीत पहिल्या 3 उमेदवारांना 200/200 normalized marks मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या Raw Scores अनुक्रमे 196, 194 आणि 194 आहेत.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही Normalization प्रक्रिया नेमकी कशी करण्यात आली? तिचे सूत्र, shift-wise statistics आणि संपूर्ण गणना सार्वजनिक का केली जात नाही? याहून गंभीर म्हणजे या निकालात काही बड्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची/मुलांची निवड झाल्याच्या तक्रारी आणि आरोप सोशल मीडियावर होत आहेत. हे आरोप खरे आहेत की खोटे, हे स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीशिवाय स्पष्ट होऊ शकत नाही.
👉 काँग्रेस पक्षाची मागणी:
• MMRDA निकालाची तात���ीने स्वतंत्र चौकशी समिती नेमावी.
• Normalization चे संपूर्ण सूत्र व shift-wise data सार्वजनिक करावा.
• प्रत्येक निवडलेल्या उमेदवाराची पात्रता, गुण आणि निवड प्रक्रिया पारदर्शक करावी.
• कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना अनुचित लाभ मिळाला असल्याचे आढळल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
• चौकशी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती प्रक्रियेबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
200/200 गुण मिळणे स्वतःमध्ये गैरप्रकाराचा पुरावा नाही; पण अशा निकालामध्ये पारदर्शकता आणि स्वतंत्र तपासणी अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
@RahulGandhi
@INCHarshsapkal
@MMRDAOfficial @mieknathshinde
@CongressRojgar
#chhatronkigoonj
#MMRDA #MMRDARecruitment #JE #AssistantEngineer #CivilEngineering #Normalization #RecruitmentScam #Transparency
PMC ने आंदोलनावेळी खोटी आश्वासने दिली. NEET आणि JPSC साठी आंदोलनाचा आवाज देशाने ऐकला; आता PMC JE चा आवाजही ऐकवू.
आता ना आश्वासनांवर विश्वास, ना माघार. आमचा हक्क आम्ही मिळवूनच थांबू. PMC प्रशासनाने तयार राहावे—PMC JE आंदोलन पुन्हा होणार!
#PMCJE@PMCPune@navalMH@prajytnair
PMC भरती परीक्षेतील गैरव्यवहाराची SIT मार्फत सखोल चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी आणि पुणे महानगरपालिकेने पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह पुनर्परीक्षा तातडीने घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही. पारदर्शक भरती हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, उपकार नाही!
@INCHarshsapkal@PMCPune@Dev_Fadnavis@degree_holders
@CongressRojgar
#PMC #Congress #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
@shambhurajdesai साहेब आपण अधिवेशन काळात दिलेले आश्वासन आज सत्यात उतरताना दिसत परंतु कंत्राटी स्वरूपात..! नेमके कोणाच्या आदेशावरून @mhadaofficial विभाग अश्या पदभरती जाहिरात काढत आहेत? तत्काळ सरळसेवा पदभरती जाहिरात काढण्यात यावी ही विनंती @CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अभियांत्रिकी सेवेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या पदाचे सेवाप्रवेशाचे विनियमन करण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली.
जलसंपदा ��िभागांतर्गत 'कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित)'
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी प���णे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्या��्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी ���ंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE #TransparentRecruitment @prajytnair
@navalMH @PMCPune
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निकालामध्ये कथित डुप्लिकेट नोंदी, दस्तऐवजाच्या अख���डतेबाबत निर्माण झालेल्या शंका, नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक न केल्यामुळे हजारो अभियंता उमेदवारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच आज मी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून स्वतंत्र Digital Forensic Audit, संपूर्ण माहिती स��र्वजनिक करणे आणि सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणावरही आरोप करणे हा उद्देश नाही; मात्र भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असली पाहिजे.
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने सत्य समोर येणे आणि जनविश्वास कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.
@navalMH @INCHarshsapkal
#PMCRecruitment #JERecruitment
#Transparency #StudentsFirst #Pune #EngineeringStudents #DhananjayShinde