'विठ्ठल माझा , मी विठ्ठलाचा..' बदललेल्या समीकरणात फक्त एवढं म्हण���न काम भागणार नाही.. वारकरी पंथात भगवा झेंडा नसून ती 'पताका' आहे..ती कशाचं प्रतीक आहे.. हे वारकरी संप्रदायाच्या अनुयायांनी पारायणं करून समजून घ्यायला हवं.. योग्य प्रश्न विचारायला शिका.. उत्तरं मिळतील..❤️
#तुकाराम_बीज
@mulshikar71@Shivshakti_707 अकोल्या मध्ये या वेळेस अभय पाटील sure येणार आहेत.लोकांना अनुप धोत्रे नको आहेत.त्याजागी जर भाजप वर रणधीर स��वरकर उभे राह��ले असते तर एकतर्फी निवडून आले असते.
@INCMaharashtra Bjp बद्दल ग्राउंड लेवल वर भरपूर नाराजी आहे.लोकांना फक्त अनुप धोत्रे विरोधात चांगला पाटील समाजाचा नेता हवा होता.तो अभय पाटील यांच्या रूपाने मिळाला आहे.
@INCMaharashtra अकोला येथे जातीवादावर मतदान होते. Bjp आणि VBA मध्ये direct लढत झाली असती तर bjp ची सीट चांगल्या मताधिक्याने निवडून आली असती पण आता काँग्रेस आणि BJP च्या लढतीमध्ये VBA च्या सीटला संधी आहे.
#दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
समर्थ रामदास - छत्रपती - तुकोबा, एक चिंतन
संत साहित्याचे मेरूमणी अभ्यासक व असलेले आदरणीय ह.भ. प पांगारकर महाराजांनी त्यांच्या संपादित दासबोधात सांगितलय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मधले प्रल्हादपंत , रामचंद्र निळकंठ हे रामदासाचे शिष्य होते.. छत्रपती पिता पुत्र, कधीही स्वतःहुन रामदासांकडे गेले नाहीत. त्याना रामदास मंत्र्यातर्फे माहीत पडले, अष्टप्रधान���तल्या वैदीक सरकारकुन लोकांनी त्यानी रामदासाचा परिचय घडवून आणला.. हे इथे जाहीर होत.
श्रीसमर्थप्रताप मध्ये त्यांच्या शिष्याची यादी दिलीय. रामदासाच्या शिष्य मंडळात महिला सुद्धा होत्या हे विशेष चांगली गोष्ट म्हणावी लागेल.. 18 महिला शिष्यणी होत्या. दासबोधामधले अनेक श्लोक, मूर्खाची लक्षणे हे मानवी जीवनात बऱ्याचदा मार्गदर्शक आहेत हे मान्य करायला मला अजिबात मुंग्यां आल्या नाही. जे चांगलं ते आपण मान्य केलं पाहि��े.
महाराज स्वतः 28 वर्षाचे होईपर्यंत त्याना नारायण ठोसर उर्फ श्री रामदास कोण व कुठले हे माहीत नव्हतं. हे स्वतः रामदासाचे शिष्य असलेले दिवाकर गोसावी यांच पत्र आहे.. ते पत्र मी परवा ट्वीटरला पोस्ट केलं आहे.. सेतुमाधवराव पगडी, सरदेसाई, शेजवलकर, बेंद्रे सर, डॉ.आ.ह साळुंखे, सहित सर्व इतिहासकार ते पत्र अस्सल मानतात. आणि समोरा समोर भेट तर 1672-1673 ला झाली. म्हणजे महाराज रामदासांना भेटले तेव्हा महाराज 42 व��्षाचे होते.. त्या पत्रात तस सरळ लिहलय ही पहिली भेट रामदास समर्थ आणि छत्रपती यांची..
इतिहास अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार सरांनी तर यादीच दिलीय, जवळपास 20 साधू संत फकीर लोकाना महाराजांनी भेट दिली त्यांचे आशीर्वाद घेतले..छत्रपती धर्मश्रद्धाळु, धर्मपारायण माणूस असल्याने. साधू संत कडे जाऊन दर्शन घेणे, अध्यात्मिक उपदेश घेणे हे चांगली व तितकीच साधी बाब आहे..मग या 20 लोकापैकी रामदास समर्थ केवळ एकटे कसे काय गुरू होऊ शकतात. ? बाकीचे का गुरु होऊ शकत नाही.?
आणि राहिला विषय विचाराचा , तर छत्रपती शिवचरित्र तुम्ही स्वतः वाचा, त्या जोडीला दासबोध वाचा. या दोनी व्यक्तीच्या विचारात व तत्वज्ञानाच्या बैठकीत खूप तफावत आहे..
छत्रपतीनी शुद्र अतिशुद्र लोकांना स्वराज्यात सामावून घेतले.. पण रामदासांच्या मठात शुद्र तर, सोडा अतिशुद्र लोक होती ��ाय .? रामोशी बेरड भिल्ल पारधी आदी लोकांना महाराजांनी किल्ल्याच्या शिबंदीवर ठेवलं होत.
महाराजांचे विचार हे वारकरी भागवत धर्म आणि समतावादी शाक्त पंथाचा अनुयय करणारे होते तर.. रामदासांचे विचार वैदीक धर्माचा अनुयय करणारे.. दासबोधात ब्राह्मणच गुरू मानला पाहिजे असं लिहलय.. आणि छत्रपती जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिम पीर फकिराना मानतात ही वस्तुस्थिती आहे..
वारकरी चळवळीतल्या लोकाना विच���रा त्यांच्यात रामदासाचे श्लोक वैगरे घेतात का ?
त्यांचा आणि वारकरी चळवळीचा काही संबंध नाही..
संत निळोबाराय हे आमचे प्रातःस्मरणीय आहेत. ते तुकोबाचे शिष्य होते. निळोबाराय,
नगर जिल्ह्यातले होते. ते तिकडच्या गावचे कुलकर्णीपद सोडून वारकरी झाले.. ब्राह्मण निळोबाराय , कुणबी मिरासदार तुकोबांचे शिष्य झाले. हा वारकरी धर्माचा अगाध महिमा आहे. तसेच शिऊर- वैजापूरच्या बहिणाबाई कुलकर्णी ब्राह्मण होत्य��. ( १६२८-१७००) बहीणाबाई तुकोबांच्या अखेरच्या काळात त्या शिष्या झाल्या होत्या.. त्याना ज्या पाठक घरात दिलं ते शाक्त पंथाचे घराणे होते. ( शाक्त म्हणजे शक्तिचे = दुर्गेचे = भवानीचे उपासक ) हे ह.भ.प पांगारकर महाराजांनी तुकाराम चरीत्र मध्ये लिहल आहे.
तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासक रुपाताई बोधे कुलकर्णी यांनी बौद्धाचार्य अश्वघोषाची वज्रसुची ( १९९२) या ग्रंथात सांगतात की तुकोबानी आपल्या या शिष्ये��ा या पुरातन वज्रसुचिचा अनुवाद करायचे काम सो��वले.
बहिणाबाईचे ७००+ अभंग आहेत. त्यावर किर्तन झाली पाहिजेत.. अस मला मनोमन वाटत. होतही असतील पण जास्त व्हावी..
कलयुगी बौद्धरुपी धरी हरी |
तुकोबा शरीरी प्रवेशला |
संत बहिणाबाईचा हा अभंग अनन्यसाधरण आहे.. यातून वारकरी चळवळीची परस्पर धर्म पंथाबद्दल असलेला आदर सूचित होतो.. नाथ पंथ, महानुभाव, लिंगायत, शैव शाक्त, वैष्णव आदी पंथामधले जे जे काही चांगलं असेल ते आम्ही वारकरी स्वीकारतो अस माझ्या व्यक्तिगत परीचयाचे जाणकार महाराज मंडळी आवर्जून सांगतात..
सदानंद मोरे यांच्या तुकाराम दर्शन या मौलिक ग्रंथाचे महत्तम योगदान , तुकोबाचे पाईकाचे अभंग छत्रपतीच्या मावळ्यांसाठी होते , अस प्राच्यविद्या पंडित शरद पाटील त्यांच्या विचाराच्या विरोधी असूनही मान्य आहे. अलीकडे पाईकाच्या अभंगावर ^ ह.भ.प उल्हास पाटील महाराजानी स्वतंत्र पुस्तकंच लिहल आहे.. ते आपण सर्वांनी वाचलं पाहीजे.
- क्रमशः
[ विजय गिते-पाटील ]
लाख संकटांवर नेटाने मात करत स्वराज्याची निर्मिती करणारे, लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करुन प्रजेचे हित जपणारे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना ��यंती दिनी कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
काही स्टोरीज तुमच्या मनात घर करुन राहतात. काही स्टोरीज चालू असताना त्या कधी संपूच नये असं वाटतं. आत्मपॅम्फ्लेट अशीच एक स्टोरी.
दुभंगलेला समाज, जाती पातीतली भांडणं आणि धर्मवाद्यांचा गोंधळ हा आजच्या काळातला जेवढा मोठा प्रश्न आत्मपॅम्फ्लेटमध्ये तेवढाच सहजतेने आणि निरागसपणे दाखवलाय.
आशिष या कॅरॅक्टरसमोर 'गांधींची आत्मकथा की ��ांधीहत्या आणि मी' किंवा 'आंबेडकर की सावरकर' हे उभं राहिलेलं द्वंद्व अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलंय.
लहान पोरांनी एकदुसऱ्याला विचारलेले प्रश्न एक सटल मेसेज देऊन जातात. त्या एकेका प्रश्नाचं उत्तर शोधण्यात लोकांची ह्यात खर्च होईल एवढा त्यांचा आवाका. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांवर न थोपता प्रेक्षकांना समाज म्हणून आरशासमोर उभं करण्याचं काम आत्मपॅम्फ्लेट करतो. आणि हेच आत्मपॅम��फ्लेटचं यश.
बाकी सक्सेसफुल लव्ह स्टोरीज सुंदर असतात आणि अनसक्सेसफुल लव्ह स्टोरीज त्याहून सुंदर.
अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद @bendeashish