आदिवासी विभागाची परीक्षा होऊन चार महिने झाले आहेत.
काही पदांचे निकाल अजून लागले नाहीत.
2023 च्या जाहिरातीची 2025 ला परीक्षा घेतली
निदान निकाल तरी वेळेवर लावा.
@mahatribes@drashokuike_mla
@Jaykumar_Gore आरोग्यसेवक 50 % भरती मध्ये हंगामी फवारणी अनुभव अट शिथिल करण्याची परमिशन मा. विभागीय आयुक्तांनी द्यावी असे पत्र ग्रामविकास विभागाने 15.10.24 रोजी काढले असून सुद्धा संभाजी नगर चे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे ग्रामविकास विभागाचे पत्राला केराची टोपली दाखवत आहेत.
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
मा अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
लेखा कोषागारे विभागाची राज्यस्तरीय एकच जाहिरात काढावी.
6 वेगवेगळ्या विभागाची जाहिरात आणि वेगवेगळे परीक्षा शुल्क घेणं कितपत योग्य आहे.
@AjitPawarSpeaks
मित्रांनो योग्य ठिकाणी ताकद लावली तर 100% PSI जागा वाढू शकतात.
गृहमंत्री महोदय पोलीस फोर्स मजबूत करण्याच्या तयारीत असून ते बेरोजगारांना नोकऱ्या आणि नागरिकांना सर्वोच्य सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड करणार नाहीत.
@Dev_Fadnavis
📌महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब सेवा पूर्व परीक्षा 2024:-
जर @Dev_Fadnavis साहेबांनी मनावर घेतले तर PSI आणि @AjitPawarSpeaks दादांनी मनावर घेतले तर STI च्या विक्रमी जागांची वाढ गट ब 2024 च्या जाहिरातीत होऊ शकते.
#Combine_जागावाढ_2024
आदरणीय देवेंद्र जी,
राज्यसेवा परीक्षा आणि PSI, STI ASO, SR, कर सहायक, लिपीक या पदांच्या जागा 2024 साठीच वाढवाव्यात ही नम्र विनंती.
PSI आणि STI पदांच्या 100% रिक्त जागांचे अतिरीक्त ज्यादाचे मागणीपत्रक 2024 साठीच द्यावे ही कळकळीची नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
तलाठी भरती
राज्यभरात 2471 तलाठ्यांची पदे रिक्त असून सध्या एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे.
तलाठी पदे काही अनुकंपा पदांचा अपवाद वगळता 100% सरळसेवा भरतीमधून भरली जातात.
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनापत्र!
नमस्कार मित्रांनो,
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनपत्राच्या मागणीसाठी आपण अनेक महिन्यांपासून संघर्ष करत होतो. या मागणीसाठी आपण गेल्या आठवड्यात मुंबईच्या आझाद मैदानात बेरोजगारांचा महामोर्चा आयोजीत केला होता.
आपण हा विषय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी मुंबईतील महामोर्च्यास सक्रिय पाठिंबा दिला, ते स्वतःमोर्चात सहभागी झाले आणि आपण सर्वांना मार्गदर्शन करुन आपला विषय मार्गी लावण्याचे सर्व उमेदवारांना आश्वासन दिले होते.
त्या दिवसापासून, आजपर्यंत ग्रामविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सततचा पाठपुरावा केल्यामुळे आत्ता थोड्या वेळापूर्वी, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी ग्राम विकास विभागाने यासंदर्भात “सूचनापत्र” काढले आहे. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन!
आज सूचनापत्र निघाल्यामुळे जवळ जवळ २६०० उमेदवारांना हक्काची सरकारी नोकरी मिळेल. सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक चौकटीत लढल्यास नक्की यश मिळते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
२६०० उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे मा. अंबादास दानवे साहेबांचे खूप खूप आभार 🙏.
लडे है…. जिते है 🇮🇳
@iambadasdanve@AUThackeray
@SanjyLakhePatil
@MahavikasAghad3
#DhananjayShinde