What a win by the Indian 🇮🇳 Cricket Team! Heartiest congratulations to #TeamIndia for winning #T20WorldCup2024.
अभिनंदन टिम इंडिया!
ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून समस्त भारतीयांचे स्वप्न साकार केले. आम्हाला तुमचा सार���थ अभिमान आहे.
वेल प्लेड् टिम इंडिया!
अस्सल लोकनेता घडतो ते कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, कार्यकर्ते हे त्याचं विस्तारीत कुटुंबच जणू... गेली सहा दशके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदरणीय पवार साहेबांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. आपुलकी, विश्वास आणि परस्परांप्रती अतूट निष्ठा यामुळे हे नाते दिवसेंदिवस आणखी दृढ होत आहे. कानावर आवाज पडला तरी तो कोणाचा हे त्यांना ओळखता येतं कारण आमच्या नेत्याची नाळ या सर्वसामान्य मायबाप जनतेशी घट्ट जोडलेली आहे. आमचा नेता आमच्या पक्षाचा प्रथम कार्यकर्ता आहे.
डिसेंबर महिन्यात लागोपाठचे हे दोन दिवस मोठे आनंदाचे असतात. बाबांचा काल वाढदिवस झाला त्यानंतर आज आईचा वाढदिवस आहे.
आई बाबांपेक्षा खंबीर आहे. त्यांच्या संघ��्षात ती पाठीशी ठामपणे उभी असते. बाबा आपल्या आयुष्यात राजकारण व समाजकारणातील एक एक पदे चढत राहिले पण आईने आम्हाला नेहमीच जमीनीवर रहायला शिकवले. आम्हाला आई म्हणून तिने काहीही कमी पडू दिले नाही.आईने दिलेले हे साधेपणाचे संस्कार खुप मोलाचे आहेत.
आई, तु आम्हा सर्वांसाठी 'पॉवरहाऊस' आहेस. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना राज्यातील एक फुल दोन हाफ सरकार पक्ष आणि कुटुंबे फोडण्यात व्यस्त आहे, त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी वेळ नाही, तसेच हे सरकार पाण्याच्या प्रश्नावरुन प्रचंड असंवेदनशील आहे अशी टिका केली. हे वर्ष निवडणूकीचे वर्ष आहे. या वर्षात महाराष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान हे पाण्याचे असणार आहे. बीड, धाराशीव आदी जिल्ह्यांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई निर्��ाण झाली आहे. परंतु याकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही परंतु हे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करीत आहे असे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. या काळातही आम्ही अंगणवाडी भगिनींच्या आंदोलनात सहभागी झाल्याची आठवण करुन दिली. अंगणवाडी भगिनींच्या या आंदोलनात आम्ही सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करण्याचे काम करु शकतो परंतु जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल त्यावेळेस आमचे मुख्यमंत्री महिलांसाठीच्या ज्या फाईलीवर सही करतील ती फाईल अंगणवाडी भगिनींच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी असेल असा शब्द दिला. आमची लढाई महाराष्ट्राचील कोणत्याही व्यक्तीसोबत नाही पण दिल्लीच्या त्या ‘अदृश्य’ शक्तीच्या विरोधात आहे. पण माझ्यामागे ‘आईस’ ( इन्कमटॅक्स+ईडी+सीबीआय) नाही, त्यामुळे मी निडर असून आपला पक्ष पुढे कसा घेऊन जायचा हे आपण ठरवायचे आहे असे स्पष्ट केले. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात बदल झाला तरच खऱ्या अर्थाने विकास होईल असे साधेसरळ सुत्र असल्याचे देखील यावेळी नमूद केले. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शपथा घेऊन आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. परंतु यातील कशाचीही त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार महाराष्ट्र���तील या पक्षांना नाही. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील. मी पक्षाकडे लोकसभेच्या तिकीटाशिवाय काहीही मागितले नाही. बदली वगैरे अशा कुठल्याही भानगडीत मी नाही. मी एक मराठी मुलगी आहे व ते माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर माझ्या आजी शारदाबाई पवार निवडून ��ेल्या. साहेब सुद्धा स्वतःच्या हिंमतीवर आणि कर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले आहे. आम्हाला बक्षीस मिळतात कारण आम्ही संसदेत बसतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांची भाषणे ऐकतो, फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणाले होते "ना खाऊंगा ना खाने दूंगा” पण आता त्यांचे धोरण “मै भी खाऊंगा, और आपको भी पेट भर के खाने दुंगा" असं आहे. तुम्ही भ्रष्ट जुमला पार्टीत आहात, पन्नास खोक्यांवर आमदार विकत घेत आहात, पन्नास खोके इज नॉट ओके. भ्रष्टाचाराच्या विरोधात जसा त्यांनी आपल्यावर हल्ला केला होता तसा आता मी त्यांच्यावर करणार आहे. ही लढाई माझ्या वडिलांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे कारण मी एक स्वाभिमानी मराठी कुटुंबाची प्रतिनिधी आहे. माझ्यावर टिका करण्यासाठी भ्रष्��� जुमला पार्टी आणि शिंदे गटातील कुणीही ��ुढे येत नाही. फक्त एका गटातील लोक माझ्यावर बोलतात. पण ती त्या बिचाऱ्यांची मजबूरी आहे कारण त्यांना त्या अदृश्य शक्तीने तसे करायला भाग पाडले आहे.पण मी त्या अदृश्य शक्तीला जिंकू देणार नाही. तुम्ही आमच्यात वाद लावणार आणि त्यावर आपली पोळी शेकून घेणार ही असली कूटनीती येथे चालणार नाही. आम्ही महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आहोत. महाराष्ट्रातील सर्व विकास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प��्षाने केला आहे. यांनी दहा वर्षांत काय केले ? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याशिवाय त्यांनी काय केले ? त्यांनी भ्रष्ट म्हणून आरोप केलेल्या सर्वांना आपल्या पक्षात घेऊन पावन करुन घेतले. अंगणवाडी भगिनी, शिक्षक, डॉक्टर्स अशा घटकांवर अन्याय केला. जालन्यात लाठीचार्ज केला. महाराष्ट्राच्या वाटणीचे प्रकल्प गुजरातला पाठविले, आमदारांची पळवापळव केली. खासगीकरण केले. थोडक्यात भाजपाने केवळ आपल्या प��्षाचा विकास केला. आपल्यावर फार मोठी जवाबदारी आहे. आपली बाजू सत्याची आहे. आपली सत्ता आली तर आपले मुख्यमंत्री महाराष्ट्रात���्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या फाईलवर पहिली सही करेल हा माझा या राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना शब्द आहे. काही लोक गॅरंटी देत आहेत परंतु गॅरंटीला एक्सपायरी डेट असते. शब्दाला आयुष्यभर किंमत असते.