#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ मध्ये महाघोटाळ्याची शक्यता?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “कनिष्ठ अभियंता” पदाची परीक्षा खाजगी केंद्राच्या ऐवजी फक्त IBPS या सरकारमान्य संस्थेच्या स्वतःच्या परीक्षा केंद्रावर होणे गरजेचे आहे. या विषयावर आम्ही ६ महिन्यांपूर्वी महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन योग्य खबरदारी घेण्याची विनंती केली होती.
खाजगी परीक्षा केंद्रे घोटाळ्याचे अड्डे बनल्याचे गेल्या अनेक परीक्षा घोटाळ्यांवरून सिद्ध झाले आहे. तलाठी घोटाळ्याच्या विरोधात आम्ही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसोबत मा. मुम्बई उच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे.
खाजगी केंद्रावर परीक्षेचे नियोजन झाल्यामुळे लाखो तरुणांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना असून आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी यात स्वतः लक्ष घालून तरुणांना “न्याय” द्यायला हवा.
मुंबई महानगर पालिकेने याबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर हजारो तरुण तरुणींना घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल!
@AUThackeray@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#BMC_JE #BMC_SE
#TCS_ION_Digital #IO
BMC कनिष्ठ अभियंता सर्व पदांची परीक्षा TCS च्या अधिकृत ION डिजीटल केंद्रावरच झाल्या पाहिजेत. ज्या सेंटर वर पेपरफुटी ची घटना घडली आहे ते सुद्धा सेंटर आता दिले गेले आहेत. तुम्हाला बोगस पणा करायचा असेल तर तसे सांगा डायरेक्ट पदे भरा विद्यार्थी काही म्हणार नाही पण अस करून त्यांना त्रास तर देऊ नका. रात्रंदिवस प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि तुम्ही असा बोगस पणा करत असाल तर विद्यार्थी शांत बसणार नाही हे लक्षात घ्या. @Dev_Fadnavis साहेब हेच का आपला राज्य आणि पारदर्शकता?
@mybmc@CMOMaharashtra @degree_holders @Dhananjay_AAP @AUThackeray
@Dev_Fadnavis ji @mieknathshinde ji @AjitPawarSpeaks ji अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा अजून एक घोटाळा ----?????@mybmc तात्काळ खाजगी केंद्र बदला अजून वेळ आहे. सायबर कॅफे मध्ये परीक्षा केंद्र?????
"@mybmc To safeguard the integrity of the recruitment process & prevent further consequences, we urge you to:
Cancel the existing examination timetable for JE/SE recruitment
Reschedule the exams at TCS ION centers.
Conduct a thorough inquiry.
#Transparency
संदर्भ : आप महाराष्ट्र/०२०२२०२५/००१
प्रति,
मा. भूषण गगराणी,
आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका
विषय : मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेणेबाबत.
महोदय,
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाबा आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा.
धन्यवाद,
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM #EngineeringExcellence #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #AAP
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) मधील २८२ मराठा उमेदवारांना अखेर न्याय मिळाला.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) चा निकाल लागण्यापूर्वी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे SEBC (मराठा आरक्षण) आरक्षण रद्द झाले, SEBC कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना SEBC to EWS असा प्रवर्ग बदलण्याचा पर्याय देण्यात आला होता. उमेदवारांनी प्रवर्ग अपडेटही केले पण निवड यादी जाहीर करताना बदललेले पर्याय ग्राह्य धरले गेले नाहीत. यासंदर्भात २८ डिसेंबर, २०२३ रोजी पात्र उमेदवारांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन संबंधित मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्त्या देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी केली होती.
याच विषयासंदर्भात मी २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन, २८ मार्च, २०२३ रोजी निवेदन देऊन आणि २५ जुलै, २०२३ रोजी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन पाठपुरावा केला होता. २८ डिसेंबर रोजीच्या भेटीवेळी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द शिष्टमंडळाला दिला होता. या विषयासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) मधील २८२ मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करुन नियुक्ती देण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांचे मनःपूर्वक आभार. सर्व पात्र मराठा उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन.
महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते.
महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
वीज कंपनीतील सर्व रिक्त जागा भराव्यात व महाराष्ट्र राज्यात निवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा.
@AAPMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@iambadasdanve@VijayWadettiwar
#No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
#Increase_AE_JE_Vacancy
#Dhananjay_Shinde
#राज्यसेवा2024जागावाढ