राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
EWS मधील SEBC उमेदवार, दुसऱ्यांदा लावलेला EWS सुधारीत निकाल आणि अशा बऱ्याच संदिग्ध बाबींचा विचार करता उमेदवारांकडून वरील विषय सुटल्याशिवाय मुख्य परीक्षा आयोजीत करू नका किंवा सर्वांना न्याय मिळणारा तोडगा निघत नसेल तर ही परीक्षा रद्द करुन पूर्व परीक्षा पुन्हा आयोजीत करण्याची मागणी वाचण्यात आली.
मित्रांनो ही परीक्षा रद्द करुन नव्याने घेणे हा उपाय होऊ शकत नाही. कारण ही शेवटची ऑब्जेक्टिव परीक्षा असून डिस्क्रिप्टिव पद्धतीची 2025 ची जाहिरात प्रसिद्ध होऊन परवा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. जर ही परीक्षा रद्द झाली तर नव्या पॅटर्न नुसार नवी परीक्षा द्यावी लागेल एवढे लक्षात असू द्या.
उद्या जर ही भरती रद्द करण्याची वेळ आली तर संपूर्ण 2024 ची जाहिरात रद्द होईल ज्यात राज्यसेवा, अभियांत्रिकी, वन, कृषी सर्वांच्या बाबत तीच बाब लागू राहील. शिवाय नवीन येणाऱ्या जाहिरातीचे स्वरूप आपण सर्व जाणत आहातच. एकूणच तांत्रिक बाबी पाहता कमीत कमी नुकसान होईल असा विचार होणे गरजेचे आहे.
यावर या परीक्षेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण न होता तोडगा काढणेच न्यायोचित आहे.
सुज्ञास अधिक सांगणे न लागणे!!
#MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा फॉर्म भरताना स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत आहेत विद्यार्थ्यांनी आयोगाला कळवून देखील अडचणी दूर झाल्या नाहीत आणि अर्जाची शेवटची तारीख १७ एप्रिल आहे. कृपया लवकरत लवकर तांत्रिक अडचणी दूर कराव्या.@mpsc_office
सार्वजनिक बांधकाम विभागातील 2024 साठी पाठवलेल्या काही जागा 2025 मध्ये भरण्याचा निर्णय झाल्याची बातमी कळत आहे.
जागा पळवापळवी आणि वळवावळवी याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणत्याही नियमावलीचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
@Dev_Fadnavis
विधानसभा सदस्य जयंत पाटील साहेबांनी अभियांत्रिकी सहित महसूल, गृह, ग्रामविकास विभागाच्या जागांमध्ये वाढ झाली पाहिजे साठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पत्राद्वारे मागणी केली.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan@Jayant_R_Patil
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती. 🙏
@gau_r_a_v_08 सरकार गरिबांच्या लेकरांना नियुक्ती द्या.आदरणीय महोदय,670 जलसंधारण अधिकारी 4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.महोदय,लवकर नियुक्ती देऊन दिलासा द्यावा🙏
@SanjayDRathods मा.महोदय आपण आम्हास दिलेल्या ८ दिवसीय वचनाचा आज दिवस ८ वा . तरी देखील आमच्या पदरी अजून नियुक्ती च सुख नाही आपणास कळकळीची विनंती कृपया आम्हा ६७० जलसंधारण अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपण म्हंटल्याप्रमाणे 8 दिवस पैकी 6 दिवस निघून गेले तरी देखील अजून काहीच नियुक्ती बदल काहीच UPDATE मिळालेली नाही
आपणास कळकळीची विनंती कृपया भावी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन त्यांना सेवेत घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा ही विनंती .🙏🏻
📍 जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता १५३५ पदे रिक्त आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४५६ पदे रिक्त आहेत. आदरणीय @girishdmahajan साहेब कृपया जलसंपदा विभागांत १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621
जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . सर्व पात्र उमेदवारांना अंतिम नियुक्ती आदेश येत्या आठ दिवसात देण्यात येतील. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ,मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करून तरुणांना नोकरी देण्याचे दायित्व निभावित आहे. महाराष्ट्र राज्य, मृद व जलसंधारणाच्या कामात नेहमीच अग्रेसर राहील अशी या तरुण अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MahaDGIPR