Maharashtra Paper Leak Service Commission च्या आणखी एका अधिकाऱ्याला #Paperleak संदर्भात काल अटक झाली.
कुंपणाने हक्काने शेत खाल्ले आहे हेच वास्तव होय.
मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis
साहेब मी पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणून देतोय हा विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून साधारणतः 2021 पासून झालेल्या प्रत्येक परीक्षेचा आहे.
👉Paper Leak Mafia / Racket / syndicate प्रामाणिकपणे शोधायचे असेल तर 2021 पासून @mpsc_office
च्या "सरसकट" परीक्षा संदर्भात कसून चौकशी व्हायलाच हवी.
हीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे व तो त्यांचा अधिकार व हक्क आहे.
🔸नेमलेला चौकशी आयोग फक्त विशिष्ट् परीक्षांचीच चौकशी व तपास करणार असेल तर
झालेल्या गंभीर घटना आगामी काळात घडतच राहणार यात तिळमात्र शंका नसावी.
प्रत्येक गोष्टीचे विद्यार्थ्यांकडेच पुरावे मागणे हे देखील अयोग्य च होय.
@Tukaram_IndIAS
आपल्याकडून सर्वांना प्रामाणिक अपेक्षा आहेत, 2021 पासूनच्या चौकशीत अनेक गंभीर गोष्टी घबाड सापडल्याप्रमाणे मिळतील "शोधा म्हणजे सापडेल"
पकडला तोच चोर व समोर आला तितकाच घोटाळा पुरता हा विषय नव्हे याची आपण गंभीरतेने नोंद घ्याल अशी
प्रामाणिक व माफक अपेक्षा करतो.
धन्यवाद 🙏
@bhimanwar@RahulGandhi@NANA_PATOLE@INCHarshsapkal@satejp@vishwajeetkadam
2021 पासूनच्या सर्व परीक्षा चौकशी का नाही ? ह्या चौकशी मध्ये राज्यसेवा 2025 राज्यसेवा 2026 ,संयुक्त गट ब 2026 पण चौकशी का नाही ,मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती या सर्व परिक्षा चौकशी झालीच पाहिजे @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
आयोगाने घेतलेल्या पेपर सोबत @TCS ने घेतलेल्या परीक्षांची पण चौकशी झाली पाहिजे. सर्वात मोठा भ्रष्टाचार तर सरळसेवा मध्ये झाला आहे.तलाठी भरतीची पुन्हा नव्याने चौकशी करावी असे कोर्टाचे आदेश असताना सुद्धा अजून @DGPMaharashtra यांनी तपास सुरू केला नाहीये. @Dev_Fadnavis याबाबद विचार करा
नरेंद्र मोदी ने सुबह 4 बजे पुलिस भेजकर अंकिता के माता-पिता को गिरफ्तार करवा दिया.
'VIP' दुष्यंत गौतम को बचाने के लिए नरेंद्र मोदी ने हद पार कर दी है.
पहले उसे राज्यपाल बना दिया, अब जब अंकिता के माता-पिता इंसाफ मांग रहे हैं तो उनकी आवाज को कुचला जा रहा है.
शर्मनाक!
श्री.तुकाराम मुंढे यांना MPSC च्या सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी द्या. सध्या श्री.हरपाळकर यांची बदली झाल्याने ते पद रिक्त आहे. तसेच अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाच्या सचिव पदाची जबाबदारी देखील मुंढे यांच्याकडेच राहू द्या.
@CMOMaharashtra#MPSC#FDA@Tukaram_IndIAS
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह मध्ये आज जोरजोरात थाळ्या वाजवून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काहींनी गो भिमनवार गो अशी घोषणा देत थाळी वाजवली .
आज आंदोलनाचा १० वा दिवस आहे.
#Pune#Punenews#MPSCआंदोलन#पुणे
#India: We are concerned by reports of mass detentions of demonstrators, protest leaders, members of civil society organisations, lawyers and journalists, before and during today’s large-scale demonstrations in Delhi.
We call on the authorities to ensure that the right to peaceful assembly is fully respected and fulfilled.
https://t.co/tqrQyZoXBJ
वाराणसीत ज्याप्रमाणे गंगाआरती केली जाते त्याप्रमाणेच मनातील आणि वातावरणातील कलुषितता दूर करण्यासाठी आणि #MPSC मधील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीचं पाप धुऊन काढण्यासाठी तसंच भ्रष्ट अध्यक्षांना पदावरून दूर होण्यासाठी सद्बुद्धी मिळावी यासाठी पुण्यात मुठा नदीपात्रात #MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत महाआरती करण्यात आली. यावेळी सरकारलाही भ्रष्ट मित्राला वाचवण्याऐवजी माणुसकीला प्राधान्य देण्याची सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली. ही प्रार्थना लवकरच फळास येईल आणि MPSC सारखी संस्था भ्रष्टाचारमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षेचा पेपर फुटल्याचे आम्ही यापूर्वीच पुराव्यांसह सिद्ध केले आहे. या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच तीव्र असंतोष असताना, आता 'गट-ब' (कम्बाईन) परीक्षेबाबतही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत निवड झालेला मुख्य आरोपी विजय किंगर याला कम्बाईन पूर्व परीक्षेत १०० पैकी तब्बल ९० गुण मिळाले आहेत, जे अत्यंत संशयास्पद आहेत. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीतील दोन मुख्य आरोपी विजय किंगर आणि साजिद सांदे या दोघांनाही गट-ब मुख्य परीक्षेच्या पेपर-१ (भाषा) मध्ये अगदी एकसारखे १२८.५० गुण मिळाले आहेत! हा निव्वळ योगायोग कधीच असू शकत नाही.
आयोगाच्या या अनास्थेमुळे आणि वाढत्या भ्रष्टाचारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. MPSC चे संपूर्ण शुद्धीकरण केल्याशिवाय हे गैरप्रकार थांबणार नाहीत आणि सामान्य विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची संधी मिळणार नाही.
आपली ही लढाई व्यवस्था बदलण्याची आणि हक्क मिळवण्याची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने या सत्याग्रहाच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा द्यावा!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
#MPSC पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीचे 100 पैकी 90 गुण!
बऱ्याच जणांना 90 प्रश्नही सोडवता येत नाहीत, आणि या पठ्ठ्याने 90 गुण मिळवले.
विशेष म्हणजे त्याला पात्र होण्यासाठी फक्त 51.25 गुणांची गरज होती!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
माथाडी कामगार निरीक्षक पदाचा निकाल लागला त्यात पहिल्या 50 टॉपर मधील 22 जण हे एकाच सेंटरवरून निवड झाले आहेत.जवळपास सर्वांच्या शिफ्ट सारख्याच @Dev_Fadnavis साहेब सर्वात आधी @TCS या कंपनीस बॅन करा व या कंपनीने घेतल्या सर्व परीक्षांची चौकशी करा नाहीतर पदावरून पाय उतार व्हा
@RRPSpeaks
पुण्यातून पेटलेला विद्यार्थी आंदोलनाचा वणवा आता #छत्रपतीसंभाजीनगर पर्यंत पोहोचलाय…
उद्या हा धगधगता वणवा शहराशहरांत, गावागावांत कधी पोहोचेल, सांगता येत नाही!
सरकारने अंत बघू नये…
वेळीच या ज्वलंत प्रश्नावर ठोस तोडगा काढावा.
#MPSC#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह#PUNE
हा आहे पंचगंगेचं पाणी पिणारा कोल्हापूरचा पठ्ठ्या… विवेकानंद पाटील. #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रात्री एकटाच अडीच-तीन तास ‘बॅटिंग’ करत होता आणि सकाळीही जब्बर ‘टोलेबाजी’ केली. चौफेर वाचन, ग्रामीण आणि शहरी समज, सामाजिक-राजकीय परिस्थितीचा आवाका असलेला आणि प्रामाणिक… असे अनेक विद्यार्थी हे #MPSC ची तयारी करतात पण भ्रष्ट व्यवस्थेमुळं शेवटी त्यांच्या हाती केवळ निराशा येते. त्यामुळं #MPSC मधील भ्रष्टाचाराचं प्रमुख खोडच मुळासकट उपटून काढण्यासाठी हे विद्यार्थी सत्याग्रहाला बसले आहेत. एकदा भ्रष्टाचाराचं खोड हटवलं तर फांद्या आपोआप बाजूला होतात.. त्यामुळं भिमनवारांचा राजीनामा होईपर्यंत आता माघार नाही..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा__राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राख करणारे MPSC चे महाभ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठे मोर्चे झाले, पण अद्यापही भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. पुण्यातल्या ७ सप्टेंबर रोजीच्या विद्यार्थ्यांच्या भव्य आक्रोश मोर्चात अध्यक्षांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलनाची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार गणेशोत्सव झाल्यानंतर २६ सप्टेंबरपासून पुण्यात विद्यार्थ्यांसमवेत मी स्वत: आंदोलनाला बसणार असून याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवण्यात आलंय.
भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेले अध्यक्ष नेमावेत ही विद्यार्थ्यांची प्रामाणिक भावना आहे. भ्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, दिलेल्या शब्दाप्रमाणे २०२६ मध्ये ७० हजारांची मेगाभरती तत्काळ सुरू करावी आणि राजस्थानप्रमाणे १०० रु. च्या कार्डवर वर्षभर परीक्षा या तीन प्रमुख मागण्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करावं. नोटिसा द्यायच्याच असतील तर कोणत्याही विद्यार्थ्यांला त्रास न देता मला नोटिसा द्या!
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय हा होणारच असल्याने सर्वांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीला सहकार्य आणि ताकद द्यावी.