प्रति,
मा. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री,
महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई.
विषय:नगरपरिषद पदभरती २०२३ अंतर्गत रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून भरण्यासंदर्भातील विनंती.
महोदय,
दिनांक ११ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरात क्रमांक ०१/२०२३/३८३८ अन्वये नगरपरिषद गट-क पदभरतीअंतर्गत ‘कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी’ पदासाठी निवड झालेल्या अनेक उमेदवारांनी अन्यत्र नोकरी स्वीकारल्याने ही पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.
परंतु, प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात होणारा विलंब चिंताजनक आहे. बहुतांश शासकीय विभाग रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून भरतात; मात्र, नगरपरिषद संचालनालयाकडून ही प्रक्रिया हाती घेतली जात नसल्याने पात्र उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागत आहे.
तरी, या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून तात्काळ भरण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
राज्य उपाध्यक्ष,
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र
@mieknathshinde
नगरपरिषद संचालनायाने जागा वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.याविषयी लवकरच मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेणार आहोत.त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. लवकरच पॉझिटिव्ह निर्णय येईल अशी अपेक्षा. 😊
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
नगरपरिषद भरती 2023
तात्पुरती निवड यादी जाहीर करून 'Opting Out' पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज
खूप मोठ्या संख्येने उमेदवार दुसऱ्या पदांवर निवडले गेलेत
उमेदवारांच्या हिताचा विचार झालाच पाहिजे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC#Declare_Exam_Date#Declare_PSI_2021_general_merit_list
👉 1. @mpsc_office आयोगाने पुढे ढकललेल्या , समाजकल्याण 2023, राज्यसेवा पूर्व 2024 आणि Combine गट ब, गट क पूर्व 2024 परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर कराव्यात. तसेच गट क मुख्य 2023 क्लार्क निकाल लवकर लावून स्किल टेस्ट ची तारीख जाहीर करावी.. स्पर्धा परीक्षा विध्यार्थी वतीने नम्र विनंती..
👉 2. सरकारने राज्यसेवा जाहिरात मध्ये सुधारीत जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक आणि Combined गट ब आणि क जाहिरात मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे द्याव्या. ही नम्र विनंती.. जून महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्यात पुन्हा पावसाळ्यात परीक्षा होणे अवघड होईल.. 🙏🙏
👉 3. मा.@mpsc_office आयोगाने PSI 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी ही विनंती, कारण हे प्रकरण न्यायाधीन असल्याने व न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेळ खाऊ असल्यानं त्याचा निकालावर खूप परिणाम होईल व विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे मा. आयोगाला विनंती आहे आपण General Merit list declare करावी,त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरवता येईल..🙏🙏
@AROM_GOM @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@GondaneDevesh@mpsc_office@Drsuvarnas@RRPSpeaks@NANA_PATOLE@mieknathshinde@LoksattaLive@lokmat@abpmajhatv
नगरपरिषद भरती 2023
तातडीने निकाल जाहीर करा
आचारसंहितेच्या नावाखाली विनाकारण उशीर करु नका
महाराष्ट्रातील निवडणुका होण्याच्या आधी कोणतीही हालचाल न झाल्यास सत्ताधाऱ्यांना मतदानात नक्की फटका बसेल
जागे होऊन निकाल जाहीर करा
@CMOMaharashtra@mieknathshinde
नगरपरिषद संचालनालय अजून किती रिस्पॉन्स शीट जाहीर करणार आहे?
जागा वाढ करायच्या नावाने ठणठण गोपाळ!
तातडीने गुणवत्ता यादी आणि अंतीम निकाल जाहीर करण्याची बेरोजगारांवर उपकार करा.
तुमच्या चुकीचे प्रश्न आणि बरोबर उत्तराच्या खेळात भरती निवडणुकीच्या प्रचारात बधीर कराल.
@CMOMaharashtra
सरळसेवा भरती २०२३ मधुन हजारो उमेदवारांची निवड होत असताना तातडीने नियुक्त्या मिळत नसल्यामुळे एक उमेदवार खूप साऱ्या जागा अडवून बसत आहे.
सर्व विभागांनी तातडीने नियुक्त्या देताना 'Opting Out' पर्याय देण्याची गरज.
सर्व विभागांनी याची अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra
जलसंपदा विभागाची (WRD) परीक्षा नगरपरिषदेच्या परीक्षेनंतर एका महिन्यानी होऊनही काल निकाल जाहीर झालाय
नगरपरिषद संचालनालय किती वेगाने भरती प्रक्रिया राबवत आहे?
जागा वाढवायचा पत्ता नाही?
फोनवर उमेदवारांना माहिती देत नाहीत
तातडीने मेरीट लीस्ट जाहीर करून निकाल लावा
@mieknathshinde
TCS कंपनी ज्यादिवशी फायनल रिस्पॉन्स शीट देते त्याच दिवशी गुणवत्ता यादी तयार असते.
असे असूनही नगरपरिषद गुणवत्ता यादी जाहीर करायला विलंब का?
आचारसंहितेत नगरपरिषद भरती प्रक्रिया अडकून पडणार नाही याची काळजी घ्यावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra