🔥 फडणवीसांच्या काळातील नोकर भरती घोटाळ्याचा दुसरा सरकारी रिपोर्ट :
फडणवीसांच्या काळात, महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा झाला याचा मुख्य आधार, अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तयार केलेला तलाठी भरती मधील भ्रष्टाचाराचा रिपोर्ट.
नगर तलाठी भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना स्वतःचे नावही लिहिता येत नव्हते त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांचे सीसीटीव्ही महापरीक्षा पोर्टल कडून मागविले परंतु त्यांना सगळ्या उमेदवारांचे सीसीटीव्ही देण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी भरती रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. पण नगरचे प्रामाणिक जिल्हाधिकारी यांची बदली करून, भ्रष्ट तलाठी भरती पूर्ण करण्यात आली.
आज आम्ही जाहीर केलेल्या PwC रिपोर्ट मध्ये ज्या गंभीर बाबी आहेत त्याचा दुजोराच अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी बनविलेल्या रिपोर्ट मध्ये मिळतो. महाराष्ट्रात फडणवीसांच्या काळात नोकर भरतीत व्यापम पेक्षा मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आता वाढली आहे.
@Dev_Fadnavis .
स्वकर्तृत्वानं राजकारण आणि समाजकारण वर्तुळात स्वतःची एक दिलदार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचे आता सिद्ध झालंय, पोलीस भरती,वन विभाग भरतीचे पेपर फुटल्यावर आम्ही शांत होतो पण आता सहनशक्ती संपली आहे. तलाठी भरती याप्रकारे घेण्यात काही अर्थ नाही त्यामुळे आज आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत आहोत. आंदोलनाच्या तारखा लवकरच जाहीर करू.
@RVikhePatil