आझाद मैदानात १२ वाजता होणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनासाठी मी स्वतः उपस्थित राहणार होतो, परंतु डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात मारहाण झालेले डॉक्टर आणि परिचारीकांना भेटण्यासाठी लोकलने निघालो असून यामुळं शिक्षकांच्या आंदोलनाला वेळेत पोहोचू शकणार नाही. परंतु आदरणीय पवार साहेब यांची ३ वाजता एका महत्त्वा्च्या विषयावर विधिमंडळ आवारात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, ही बैठक झाल्यानंतर शिक्षक आणि स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. त्यांच्या या बैठकीला येण्याचा माझाही प्रयत्न असून ही बैठक संपताच शिक्षकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आझाद मैदानात येणार म्हणजे येणार… हा माझा शब्द आहे. इतर नेतेही यावेळी येतील, असा विश्वास आहे.
गेल्या वर्षी आझाद मैदानावर वाढीव टप्पा अनुदानासाठी राज्यभरातील हजारो शिक्षकांनी केलेल्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होऊन शिक्षकांच्या एकजुटीच्या जोरावर हा विषय सरकारकडून आम्ही मार्गी लावून घेतला होता.
वास्तविक पाहता यंदा सरकारने अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करून शिक्षकांना दिलासा देणे गरजेचे होते. परंतु दुर्दैवाने सरकारने यंदा अनुदानाचा वाढीव टप्पा अद्यापही मंजूर न केल्याने राज्यातील शिक्षकांना नाईलाजाने पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. समाजाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकांना आपल्या न्याय मागण्यासाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करावे लागत असेल तर हे महाराष्ट्र सरकारला साजेसे नाही .
यामुळे वाढीव टप्पा अनुदानाच्या संदर्भात सरकारने शिक्षक संघटनांशी त्वरित संवाद साधून हा विषय मार्गी लावावा अन्यथा गेल्यावर्षीप्रमाणे आम्हाला या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल.... शिक्षकांचा विषय महत्वाचा असल्याने सरकार या संदर्भात तात्काळ निर्णय घेईल, ही अपेक्षा...!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
@SunetraA_Pawar महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार.मॅडम तुम्ही केलेल्या या घोषणेचा शासन निर्णय (GR)अद्यापही आलेला नाही.तरी आपण या घोषणेचा शासन निर्णय लवकर काढावा ही विनंती. @RRPSpeaks@supriya_sule
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
♦️संयुक्त गट ब & क सेवा परीक्षा 2024 जाहिरात वेळापत्रकानुसार फेब्रुवारी महिन्यातच येईल.
♦️सर्व पदांची मिळुन 15,000+ जागांची जाहिरात यावी.
♦️शासनाने वेळेवर परिपुर्ण मागणीपत्रक MPSC कडे पाठवावे.
#COMBINE_2024_15000 शक्य आहे ✅
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षा 2024
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
दुय्यम निबंधक SR 200+
कर सहायक 600+
लिपीक 10,000+
#COMBINE_2024_15000
हे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची
घ्या मनावर
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा असल्याने राज्यसेवा परीक्षेसाठी जागावाढ तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, Dysp यासारख्या पदांचा समावेश करण्यासंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसोबत सामान्य प्रशासन विभागाचे अवर मुख्य सचिव नितीन गद्रे साहेबांची भेट घेतली. शासनाच्या सर्व रिक्त पदांचा आढावा घेऊन #MPSC कडे त्वरित पाठपुरावा करण्यासंबंधी त्यांना विनंती केली. जागावाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असून विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासित केलं.
तसंच केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने शासकीय पदभरतीच्या जाहिराती काढण्यास तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासंदर्भात मागणीपत्रे देऊन भरती प्रक्रियेला गती देण्याची विनंतीही यावेळी केली.
राज्यसेवा २०२२ च्या साधारण गुणवत्ता यादीमध्ये अपेक्षित रँक मिळवण्यात यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची स्वप्नं मोठ्या कष्टानं पूर्ण केली आहेत, आता प्रशिक्षणानंतर अधिकारी म्हणून उत्कृष्ट, प्रामाणिक आणि कार्यक्षम कारभार करून महाराष्ट्रातील गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करा, त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
राज्यसेवा २०२२ ची मूळ जाहिरात १६१ पदांची होती, त्यात वाढ व्हावी यासाठी मी तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो आणि मंत्रालयात पाठपुरावाही केला. त्यामुळे तुम्हा सर्वांसासोबत एक भावनिक नाते निर्माण झालेले असून तुमच्या सर्वांच्या यशाचा मला व्यक्तिगत पातळीवर मनस्वी आनंद झाला आहे. यानिमित्ताने मी मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो, कारण या दोघांनी २ वेळा जागावाढ करण्याची संवेदनशीलता दाखविल्यामुळेच अतिरिक्त ४६२ सामान्य कुटुंबातील लेकरांचे अधिकारी बनण्याचे स्वप्नं पूर्ण झाले आहे.
ज्या उमेदवारांचा निकाल अपेक्षेप्रमाणे आलेला नाही त्यांनीही निराश होऊ नये, राज्यसेवा २०२४ परीक्षेच्या जागवाढीसाठी मी निकराचे प्रयत्न करणार असून तुम्ही अधिक जोमाने अभ्यास करा. यश नक्की मिळेल.
#mpsc #राज्यसेवा
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
♦️राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.🙏
👉 राज्यसेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांची करुन खुप दिवसापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा ही विनंती.. आलेल्या राज्यसेवा पुर्व परीक्षा जाहिरात 2024 मध्ये रिक्त संवर्ग व जागा लवकरात लवकर शासनाने #MPSC कडे पाठवून आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती..🙏🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule
मनापासून धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब..
राजपत्रित तांत्रिक पूर्व परीक्षा 2024 मध्ये नवीन संवर्ग ऍड करण्यासाठी अडचण ठरणारा Gr रद्द करण्यासाठी पाठपुरावा करत आहात त्याबाबत मनापासून सर्व विध्यार्थी वतीने धन्यवाद.. तुमच्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळो हीच प्रार्थना..
👉 तुम्ही #Combined गट ब, गट क 2024 पूर्व जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी मा. @mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे पण पाठपुरावा करावा ही सर्व कम्बाईनच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती.. 🙏🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
राज्यभरातील युवा राज्यसेवा 2024 च्या जाहिरातीकडे डोळे लावून बसलेले असताना सरकारने मात्र 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले आहे.
काल प्रकाशित झालेल्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेच्या जाहिरातीत नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच (राज्यसेवा, वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एकूण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही.
सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवावीत, ही विनंती!
#जागावाढ
#2024_राज्यसेवा_1000_जागा
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks