आज ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानिमित्त पुणे येथे उपस्थित असताना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांनी भेट घेऊन त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या.
👉सदर उमेदवारांनी निदर्शनास आणून दिल्यानुसार, मागील काही वर्षांपासून राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदे रिक्त असूनही सदर रिक्त पदांच्या भरतीसाठी आवश्यक त्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, नगरपरिषद प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदांमुळे पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे.
👉जलसंधारण विभागातील भरतीबाबत संबंधित विभागाचे मा. मंत्री महोदय यांच्याकडून वेळोवेळी घोषणा करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
👉त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध रिक्त पदांची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करून, पदांची आवश्यक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कालबद्ध कार्यवाही करणे आवश्यक आहे.
👉MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत
नुकत्याच पार पडलेल्या MMRDA सहाय्यक अभियंता-२ पदाच्या परीक्षेच्या निकालाबाबत काही उमेदवारांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप उपस्थित केले आहेत.
काही उमेदवारांच्या प्राप्त गुणांमध्ये असामान्य स्वरूपाची तफावत असल्याचे तसेच काही विशिष्ट परीक्षा केंद्रांशी संबंधित निकालांच्या स्वरूपाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सदर आक्षेपांची सत्यता अथवा वस्तुस्थिती अधिकृतरीत्या पडताळून पाहणे आवश्यक असून, कोणत्याही निष्कर्षापूर्वी संबंधित परीक्षा यंत्रणेमार्फत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे तांत्रिक व स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे.
यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षा केंद्रांवरील CCTV चित्रीकरण, बायोमेट्रिक नोंदी, सर्व्हर लॉग, उमेदवारांची उपस्थिती नोंद, प्रश्नपत्रिका वितरण व संकलन प्रक्रिया, उत्तरपत्रिका/डिजिटल प्रतिसाद, गुणांकन प्रक्रिया तसेच इतर संबंधित इलेक्ट्रॉनिक नोंदींची पडताळणी करण्यात यावी.
सदर पडताळणीअंती वस्तुस्थिती स्पष्ट करून पात्र उमेदवारांच्या हिताचे संरक्षण होईल, अशा पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
👉पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेबाबतही काही उमेदवारांनी आक्षेप नोंदविले असून, सदर प्रकरणाची चौकशी/परीक्षण करण्यासाठी IBPS कडून अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अहवाल प्राप्त होऊन त्यातील निष्कर्षांचा विचार होण्यापूर्वीच नियुक्ती प्रक्रियेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला जात असल्यास, त्याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांचा सखोल विचार करूनच पुढील नियुक्तीविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.
👉वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने शासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी
1. राज्यातील विविध विभागांमधील स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदांची अद्ययावत संख्या जाहीर करावी.
2. आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
3. MMRDA सहाय्यक अभियंता-२ परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची स्वतंत्र व तांत्रिक पद्धतीने पडताळणी करावी.
4. आवश्यकतेनुसार CCTV, बायोमेट्रिक, सर्व्हर लॉग, परीक्षा केंद्रनिहाय माहिती व गुणांकन प्रक्रियेची तपासणी करावी.
5. पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेबाबत IBPS चा अंतिम अहवाल प्राप्त करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करावी.
6. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व गुणवत्ताधारित राहील याची दक्षता घ्यावी.
7. उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत संबंधित प्राधिकरणाने अधिकृतरीत्या वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
ही मागणी कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या विरोधात नसून, पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रिया पारदर्शक राहावी आणि शासकीय सेवेत गुणवत्तेच्या आधारे निवड व्हावी, या व्यापक उद्देशाने करण्यात येत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने सदर बाबींवर तातडीने सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करावी, ही अपेक्षा.
WRD JE CEA परीक्षा #MPSC मार्फत ऑफलाईन पद्धतीनेच झाली पाहिजे, WRD विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@girishdmahajan@RVikhePatil#WRD_JE
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
इंजिनियर्स असोसिएशन च्या वतीने #MMRDA#PMC पेपरफुटी तसेच अभियांत्रिकी संवर्गाच्या विविध प्रलंबित जाहिराती बाबत उमेदवारांनी आज युवासेना प्रमुख @AUThackeray साहेबांना
त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले......! @ShivSenaUBT_@OfficeofUT@rautsanjay61
विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश,
MMRDA भरतीला अखेर स्थगिती!
MMRDA च्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, Normalisation मधील गोंधळ आणि Raw vs Normalised Score बाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे!
MMRDA ने माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली असून, अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कारवाई स्थगित केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
१. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे.
२. Raw Score आणि Normalised Score मधील फरकाची तांत्रिक तपासणी करून Normalisationचे सूत्र आणि त्याचा प्रत्येक उमेदवाराच्या निकालावर झालेला प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट करण्यात यावा.
३. परीक्षा केंद्रांवरील CCTV फुटेज, सर्व्हर लॉग्स, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर सर्व संबंधित पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी.
४. TCSकडून मागविण्यात आलेल्या खुलाशाची स्वतंत्र तांत्रिक पडताळणी करण्यात यावी.
५. उच्चस्तरीय समितीचा अंतिम अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.
@RahulGandhi@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@Dhananjay4INC@INCMaharashtra@INCIndia@MahaChiefSec@MMRDAOfficial@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMMOCL_Official@MahaDgipr@PIBMumbai@PIB_India
MMRDA Recruitment Exam Row Questions Raised Over Perfect 200 Scores in Provisional Results | BMC परीक्षा में 8, 15 और 20 नंबर, MMRDA में 200 में 200? भर्ती रिजल्ट सामने आते ही पारदर्शिता पर क्यों उठने लगे सवाल? | Hindi News, शिक्षा https://t.co/gTFZ5tKev4
MIDC सरळसेवा पदभरती 2023 मधील Assistant Draftsman पदांच्या नियुक्ती आदेशांना आणखी किती विलंब?
MIDC सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत गट-ब व गट-क संवर्गातील जवळपास सर्व पदांचे नियुक्ती आदेश दोन आठवड्यांपूर्वी निर्गमित झाले आहेत. मात्र Assistant Draftsman पदांवरील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश अद्यापही प्रलंबित आहेत.
मागील तीन वर्षांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. निवड होऊनही केवळ नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना या अनावश्यक विलंबामुळे मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करायला लावणे अन्यायकारक आहे.
MIDC प्रशासनाने कोणताही विलंब न करता Assistant Draftsman पदांचे नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित करावेत आणि पात्र व निवड झालेल्या उमेदवारांना न्याय द्यावा.
निवड झाली आहे, आता नियुक्तीचा अधिकार मिळालाच पाहिजे.
@INCMaharashtra@midc_india@samant_uday@degree_holders
@CongressRojgar
#MIDC #MIDCRecruitment2023 #AssistantDraftsman #RojgarNyay #Jobs #DhananjayShinde #Dhananjay_Shinde
#CIDCO कडून डिसेंबर 2023 मध्ये account clerk पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु परीक्षा 16 महिन्यानंतर 10 जून 2025 रोजी झाली. निकाल व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ऑगस्ट 2025 मध्ये पार पडली. आता 1 वर्ष उलटून गेले तरी अद्याप अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी गुणवत्ता यादीसाठी होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. तरी CIDCO ने तत्काळ अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत कार्यवाही करावी, ही विनंती!
@mieknathshinde
Thank you AAJ TAK for supporting our students but students don't believe on this "clean chit" investigation committee we want court moniterd investigation bcz these scammers have very big nd deep nexus and they leak all paper's @MMRDAOfficial@DrSanMukherjee#MMRDA_SCAM
महायुति सरकार में अब एमएमआरडीए में इंजीनियर भर्ती घोटाला!.. २३५ पदों की भर्ती में गड़बड़ी, जांच की मांग | @incmaharashtra @SaamanaO https://t.co/0mFeX4DWso
@MMRDAOfficial मार्फत ही खासगी कंपनी मार्फत घेण्यात आलेली पहिलीच परीक्षा होती परंतु विद्यार्थ्यांनी अशा खूप साऱ्या परीक्षा दिल्या आहेत त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीमार्फत चौकशी समिती नेमण्यात यावी ही मागणी केली होती व
MMRDA भरती प्रकरणात काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश!
MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, Normalisation पद्धतीबाबतच्या गंभीर शंका आणि उमेदवारांच्या तक्रारींबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने आवाज उठवला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा प्रश्न सातत्याने लावून धरला. पत्रकार परिषद, माध्यमांमधून भूमिका मांडणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारी समजून घेणे आणि MMRDAकडे स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यापासून ते आज उच्चस्तरीय समिती नियुक्त होईपर्यंत काँग्रेसने हा विषय प्रभावीपणे पुढे नेला.
काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत MMRDAने अखेर माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली IIT Bombayचे प्रा. श्यामप्रसाद करगडे आणि प्रा. दासका सत्यनारायण मूर्ती यांची तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही स्थगित ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, आमचा लढा केवळ समिती नियुक्त करण्यापुरता मर्यादित नाही.
समितीने संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि तांत्रिक तपासणी करावी. Normalisationचे सूत्र, Raw Score आणि Normalised Score मधील फरक, CCTV फुटेज, डिजिटल लॉग्स आणि TCSची भूमिका यांची सखोल तपासणी झाली पाहिजे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट झाले पाहिजे आणि समितीचा अंतिम अहवाल सार्वजनिक केला पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र गैरप्रकार करणाऱ्यांची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये.
दोषींना संरक्षण नाही आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नाही!
काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत सुरूच राहील.
@INCMaharashtra@INCHarshsapkal@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MMRDA_TWEET@aajtak@timesofindia@htTweets@TV9Marathi@airnews_mumbai
#MMRDA #MMRDARecruitment #StudentsJustice #MaharashtraCongress #Congress #HarshwardhanSapkal #Normalization #ForensicAudit #JusticeForStudents
अखेर MMRDA मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांसह इतर काही पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगित देऊन परिक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची समिती स्थापन करण्यात आली. याबाबत मा. एकनाथ शिंदे साहेबांनी कालच आदेश दिले होते, याबाबत त्यांचे मनापासून आभार! ही चौकशी करताना प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही आणि ती निर्धारीत वेळेत पूर्ण होईल आणि तातडीने नव्याने भरती प्रक्रीया राबवण्यात येईल, ही अपेक्षा!
MMRDA भरतीतील गोंधळानंतर चौकशी समिती नेमली जाते.
मग PMC JE भरतीत विद्यार्थ्यांनी आंदोलन करून पुरावे दिले, गंभीर तक्रारी केल्या, तरी PMC अजूनही गप्प का?
पुरावे समोर असताना चौकशी न करण्यामागे नेमकं कारण काय? PMC ने तातडीने स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत.
@navalMH@PMCPune#PMCJE
MMRDA भरती परीक्षा : योगायोग की गंभीर प्रश्नचिन्ह?
MMRDA भरती परीक्षेतील काही उमेदवारांच्या यापूर्वीच्या स्पर्धा परीक्षांतील गुण आणि MMRDA परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
उदाहरणार्थ, काही उमेदवारांचे पूर्वीचे गुण अत्यंत कमी असताना MMRDA परीक्षेत १९२ ते २०० पैकी तब्बल १९८-२०० गुण मिळाले आहेत.
उदाहरणार्थ—
१) Tushar Funde — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 200/200
२) Aniket Dhere — BMC SE: 8.5/100 → MMRDA: 198.38/200
३) Gaurav Yekekar — Nagpur JE: 48/200 → MMRDA: 198/200 (Rank 7)
४) Akash Rakhade — PMC JE: 82/200 → MMRDA: 198/200 (Rank 11)
५) Yogesh Kumar Kathe — BMC SE: 7.5/100 → MMRDA: 192/200
हे आकडे स्वतःमध्ये गैरप्रकार सिद्ध करत नाहीत; मात्र अशा असामान्य गुणफरकाची स्वतंत्र आणि तांत्रिक चौकशी होणे आवश्यक आहे.
CCTV Footage, Server Logs, Login-Logout Records, IP/Device Mapping आणि Response Patterns यांची सखोल तपासणी करण्यात यावी.
हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि सरकारी भरती प्रक्रियेवरील विश्वासाचा हा प्रश्न आहे. आरोप खरे असतील तर दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि आरोप खोटे असतील तर निष्पक्ष चौकशीतून सत्य स्पष्ट झालेच पाहिजे.
परीक्षा पारदर्शक असलीच पाहिजे संशय निर्माण झाला असेल तर चौकशी झालीच पाहिजे!
#MMRDA #ExamTransparency #RecruitmentExam #PMCJE