जातीभेदाच्या भिंतीआड दडून बसलेला हजारो वर्षांचा अज्ञानाचा अंधार, उपेक्षितांच्या वाट्याला आलेलं युगायुगांचं हताशपण, शाहूराजा तुमच्या एका कर्तृत्व स्पर्शाने हा वाटा उजळून निघाल्या आणि आज त्या वाटांचे राजमार्ग तयार झाले आहेत.
(साभार @photowala_patil)
#शाहूवंदन#शाहूस्मृतीशताब्दी
नव्या युगाचे विचार फक्त बोलून न दाखवता प्रत्यक्ष कृतीत आणून खमकेपणाने राबवणारे महान राजे आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज ✊🙌
ऊद्या सकाळी १० वाजता #शाहूवंदन मी करणार! 🙏
आयुष्यभर ज्यांना आदर्श म्हणून मिरवावं वाटतं असे छत्रपती शाहू महाराज 🙏
१०० सेकंद कृतज्ञतेचे…
६ मे, २०२२ रोजी, सकाळी १०ः०० वाजता.
बरं ही कृतज्ञता म्हणजे काही उपकाराची परतफेडही नाही, खर तर ही स्वतःला जागं ठेवण्याची धडपड आहे.
#शाहूवंदन मी करणार! ✊🙏
सोलार पॉवर, विंड एनर्जी, बायोडिझेल, असो की इलेक्ट्रिक सिस्टम्स हे सर्व बॅकअप म्हणून उत्तम….. उर्जेचे नवे स्त्रोत शोधून त्यावर काम करणं गरजेचे आहे.
महाराष्ट्र आणि संपुर्ण देशभरात उर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्राधान्य हवे!
कौटुंबिक, खाजगी जिव्हाळा फार महत्वाचा असतो. समाजमाध्यमांवर काय टाकायचं अन काय नाही हे कळायला हवं.
आनंद, दुःख, क्रोध, असूया, तुलना हेच हवं की अजून काही हे ठरवायला जमायला हवं!
खर तर समाजमाध्यमं जबाबदारीने वापरायला शिकणं ही काळाची गरज बनलीये.