देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राला महान राष्ट्र बनविण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणारे दूरदृष्टी असणारं नेतृत्व लोकप्रिय दमदार आमदार
मा.श्री.सत्यजित दादा तांबे पाटील
दादा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
@satyajeettambe@_SatyajeetFC
राजगुरूनगर नगरपरिषद...
जीवनावश्यक प्रश्न सोडवा, मग कर वाढवा
यासह विविध प्रश्नावर राजगुरूनगर शहरातील सोयी सुविधाबाबत युवक आक्रमक,
तरुणांनी प्रशासनाला धरले धारेवर...
पुणे-नाशिक रेल्वे हा देशातील पहिला सेमी हायस्पीड प्रकल्प असून अत्यंत कमी वेळात पुणे-नाशिक अंतर पार करणे ही या प्रकल्पाची युएसपी आहे.
ही रेल्वे सरळ मार्गाने झाली तरच पुणे-नाशिक हा 4 तासांचा प्रवास 1.45 तासात होणार आहे, पण जर ही रेल्वे नाशिक- शिर्डी- नगर मार्गे पुण्याला आणली तर या प्रवासाला 3. 30 तास लागणार आहेत, जो की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नाही!
म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही सिन्नर - संगमनेर - नारायणगाव - मंचर - चाकण अशी सरळ मार्गानेच झाली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे.
#Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Sinnar #Chakan
@RailMinIndia@AshwiniVaishnaw@Dev_Fadnavis@RajabhauW@_NileshLanke@kolhe_amol@Dwalsepatil@KokateManikrao@mibabajikale
वकील व्हावे ही माझी अनेक वर्षांची इच्छा, लवकरच ती इच्छापूर्ती करेन कारण याच वर्षी मी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे.
आज अहिल्यानगर (अहमदनगर) वकील संघाला भेट दिली व सर्व वकिल बांधवांशी संवाद साधला, योगायोगाने राहुरी येथील वकील दामपत्याच्या खून प्रकरणाच्या सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम साहेब कोर्टात आले होते तर त्यांचीही भेट झाली.
राहुरीच्या वकील दामपत्याच्या खून प्रकरणानंतर राज्यात वकीलांवरील हल्ल्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी कायदा करण्यासाठी मी आग्रही आहे व मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः एक वकील आहेत असे, देवेंद्रजी फडणवीस नक्कीच यात लक्ष घालतील. @Dev_Fadnavis
Becoming a lawyer has been a long-cherished dream of mine, and I am determined to fulfill it soon, as I’ve recently enrolled in law college this year.
Today, I visited the Lawyer’s Bar Association in Ahilyanagar (Ahmednagar) and interact with my fellow legal professionals. Coincidentally, senior advocate Ujjwal Nikam was present at the court, as he was appearing for the hearing of the tragic Rahuri lawyer couple murder case.
After the Rahuri lawyer couple’s murder, I strongly feel that there’s an urgent need for an act to prevent attacks on lawyers across the state. I am confident that Maharashtra’s Chief Minister, Devendra Fadnavis, who himself is a lawyer, will take this matter seriously.
राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
Congratulated newly elected Maharashtra CM Devendra Ji Fadnavis today.
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राला महान राष्ट्र बनविण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणारे दूरदृष्टी असणारं नेतृत्व व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार
मा श्री.सत्यजित दादा तांबे पाटील
दादा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
@satyajeettambe@_SatyajeetFC
वारसा नसताना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी खंबीर पाठबळ देणारा मार्गदर्शक ,मित्र, युवा नेता आ. @satyajeettambe दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🌱
नेता महाराष्ट्राचा,
तुमच्या आमच्या सामर्थ्याचा..
एनर्जी ड्रिंक हा प्रकार सध्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात बराच प्रसिद्ध झाला आहे. शाळा कॉलेजेस च्या आसपास हे कॅफेनचे धोकादायक प्रमाण असलेले एनर्जी ड्रिंक सर्रासपणे उपलब्ध असल्याने शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे एनर्जी ड्रिंक घेण्याचा प्रमाण खूप जास्त आहे, हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असता माननीय मंत्री महोदयांनी हे एनर्जी ड्रिंक शाळा, कॉलेजच्या परिसरात उपलब्ध नाही असं सांगितलं.
हे उत्तर देण्यापूर्वी शासनाने कोणत्या प्रकारची तपासणी केली, किती ठिकाणी छापे टाकले ? असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री महोदयांची तयारी असेल तर मी स्वतः त्यांना शाळा, कॉलेजच्या परिसरात हे एनर्जी ड्रिंक दाखवू शकतो असं ठामपणे सांगितलं.
५० रुपयांत नशेच्या गोळ्या बाजारात सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. या नशेला आपली भावी पिढी बळी पडत आहे.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात "नॉन अल्कोहोलिक" पेयांचे १६२ नमुने तपासले व त्यातील एकच नमुना अयोग्य आढळला अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली. एका वर्षात झालेली ती किरकोळ कारवाई संशयास्पद आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्रातील भावी पिढ्यांच्या भाविष्यासोबत खेळत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या दुधापैकी २५% दूध भेसळयुक्त आहे. लोकांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव अधिकाऱ्यांना नाही.
या बाबी गांभीर्याने घेऊन मागील एका वर्षात किती ठिकाणी कारवाई केली, काय कारवाई केली याची माहिती द्यावी. तसेच, माननीय सभापती महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे पुढील १५ दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय विभागांतील अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घ्यावी अशी विनंती सभागृहात केली.
यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी लवकरच प्रशासनाला सूचना देऊन शाळा, कॉलेजच्या ५०० मीटर अंतरात एनर्जी ड्रिंक विक्रीस प्रतिबंध करू, तसेच लवकरच बैठक आयोजित करून यावर शाश्वत उपाय करू असे आश्वासन दिले.
एनर्जी ड्रिंक्सच्या आक्षेपार्ह जाहिरातींवर बंदी आणावी अशीही मागणी मी सभागृहात केली. यावर सक्षम अधिकारी नेमून आक्षेपार्ह जाहिरातींवर कारवाई करावी अशा सूचना सभापती महोदयांनी दिल्या.
#MonsoonSession2024 #BudgetSession2024 #Maharashtra #DrugsFreeMaharashtra #Sting #EnergyDrink #Youth #FutureGenerations
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@SanjayDRathods@neelamgorhe
महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न मांडले :
- महाराष्ट्रातील ३५० पैकी 137 तालुक्यांमध्ये एकाही हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू नाही. हा असमतोल आपण कसा भरून काढणार ?
- बोगस रुग्ण दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्या हॉस्पिटल्सवर सरकार काय कारवाई करणार ?
यासंबंधी आरोग्य मंत्री मा. तानाजी सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
Key questions raised by me regarding the Mahatma Phule Jan Arogya Yojana:
- Among 350 talukas of Maharashtra, this scheme is not available in any hospital in 137 talukas. How will they bridge this gap?
- What will the government do to hospitals that defraud the exchequer by presenting fake patients?
The issues concerning these were positively responded to by Health Minister Tanaji Sawant.
#MonsoonSession2024 #BudgetSession2024 #Maharashtra #MJPJAY #Health
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TanajiSawant4MH
एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.
ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.
लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सौ.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !
@PawarSpeaks@supriya_sule
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखांपैकी केवळ १.५ लाख रुपये विमा कंपनी देणार असून उर्वरित ३.५ लाख रुपयांची हमी राज्य सरकार घेणार आहे.
यापूर्वी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृ्त्तीची हमी राज्य सरकारने घेतली होती, ही हमी पूर्ण करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने अनेक शिक्षण संस्थांना व विद्यार्थ्यांना ४-४ वर्ष शिष्यवृत्तीसाठी थांबावे लागते.
अशातच आता हॉस्पिटलची बिले जर सरकारने वेळेवर दिले नाहीत व त्यामुळे सामान्य नागरीकांना मनस्ताप सुरु झाला तर कोण जबाबदार असणार ?
#MonsoonSession2024 #BudgetSession2024 #Maharashtra #MJPJAY #Health
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TanajiSawant4MH
राज्य सरकारचे वाळू धोरण हे फसलेले धोरण आहे 600 रुपये ब्रास प्रमाणे नागरिकांना घरकुलासाठी वाळू देण्याचा निर्णय सरकारने घेतला मात्र अशा पद्धतीची वाळू कोणालाही मिळत नाही. ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी यांचे साटेलोटे असून पार्टनरशिप मध्ये हा धंदा सुरू आहे. असा आरोप करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली.
#MaharashtraAssembly
पुणे-नाशिक रेल्वेच्या कामाला गती मिळण्याच्या हेतूने मी आज महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश कुमार जयस्वाल यांची भेट घेऊन चर्चा केली.
हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. मात्र केंद्रशासन, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे महारेल यापैकी कोणी हा प्रकल्प करावा याचाच अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे या पूर्ण प्रकल्पाला खीळ बसली आहे.
त्यामुळे यावर तातडीने निर्णय घ्यावा व प्रकल्पाच्या विकासात येत असलेल्या अडचणी दूर कराव्यात यासंदर्भात मी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनाही विनंती करणार आहे की त्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करावा.
To expedite the Pune-Nashik railway project, I met with Mr. Rajesh Kumar Jaiswal, MD of Maharashtra Rail Infrastructure Corporation. The state government is committed to quick completion, but delays are caused by uncertainty over which authority will handle the project.
I will meet the Union Railway Minister to resolve this and request Deputy Chief Minister Mr. Devendra Fadnavis to intervene promptly.
#Pune #Nashik #HighSpeedRail #Sinnar #Sangamner #Narayangaon #Manchar #Rajgurunagar
@RailMinIndia@mieknathshinde
भारताचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षण संस्थांच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. #QualityOfEducation मध्ये देशात आपल्या महाराष्ट्राचा नंबर सातत्याने खाली घसरतो आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित 3 महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले.
- "स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल" प्रमाणे राज्यातील शिक्षण संस्थांनाही काही प्रमाणात विद्यार्थ्यांना प्लेसमेंट उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेऊ शकतो का ?
- स्कॉलरशिप देताना शिक्षण संस्थांना केवळ नॅक रँकिंग असणे बंधनकारक न ठेवता उत्तम रँकिंग असणे बंधनकारक करू शकतो का ?
- "नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क"च्या रँकिंगमध्ये देशात टॉप ५० मध्ये असलेल्या आघाडीच्या शिक्षण संस्थांकडून मार्गदर्शन घेऊन राज्यातील संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करणार का ?
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून सदर प्रश्नांबाबत सकारात्मक विचार होईल हा विश्वास आहे.
Raising concerns about the quality of educational institutions shaping India's future generations, I drew the attention of the assembly to Maharashtra's consistently declining rank in the Quality of Education index and asked three important questions related to students' futures:
1)Can educational institutions be mandated to provide placements like the Skill Development Council?
2) Can scholarships criteria require institutions to have excellent rankings and not just NAAC accreditation?
3) Will top 50 NIRF-ranked institutions provide guidance for state institutions?
I trust Higher and Technical Education Minister Mr. Chandrakantdada Patil will consider these positively.
#MonsoonSession2024 #BudgetSession2024 #Maharashtra #Education #Students #FutureGenerations #EducationalInstistutes
@ChDadaPatil