📌राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातून दोन वैकल���पिक पेपर (विषय) वगळले.
📌आता १२५० गुणांची मुख्य परीक्षा, तर २७५ गुणांची मुलाखत होणार.
📌हा निर्णय २०२७ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून लागू.
महाज्योती फेलोशिप विद्यार्थ्यांची पोलिसांकडून अटक करणे ही अत्यंत खेदजनक आणि शरमेची बाब आहे. आम्ही मागणी करतो की विद्यार्थ्यांना कोणताही गुन्हा दाखल न करता, सन्मानपूर्वक मुक्त केले जावे. सरकारच्या दुपदरी भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो.
#Mahjyoti#Fellowship#WeWantJustice
🔸"सक्षम" आहेत म्हणून TCS & IBPS या कंपन्यांना सरकारने नोकरभरतीचे कंत्राट दिले आहे.
🔸900/1000 रुपये फी घेतली जाते. तरीही या "सक्षम" कंपन्या TCS iON च्या अधिकृत परीक्षाकेंद्रात परीक्षा आयोजन करू शकत नाहीत.
🔸परिणामी प्रत्येक वेळी उमेदवारांना आवाज उठवावा लागतोय.
@Dev_Fadnavis
@RealBacchuKadu बच्चू भाऊ दिव्यांग भरतीसाठी नवीन पदांना मान्यता देण्यात आली आहे. सदरील पदे ही तात्काळ भरण्याविषयी आपण एक पत्र मुख्यमंत्री महोदयांना लिहावे. तसेच काही पदांची पात्रता ही समाजकार्यातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम एस डब्ल्यू आहे. ती सेवा प्रवेश नियम बदलण्यात येऊ नये असे प्रयत्न करावे.
आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण।
वेदांचे वचन, न क��े आम्हा।
चोखा म्हणे माझा, भोळा भाव देवा।
गाईन केशवा नाम तुझे।।
आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजामध्ये ��नजागृती करणारे व आपले संपूर्ण जीवन विठ्ठलाच्या भक्तीसाठी समर्पित करणारे, भक्तश्रेष्ठ संत श्री. चोखामेळा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब 2014 पासून मधला काही काळ सोडला त्यानंतर आता पर्यंत आपण मुख्यमंत्री आहात. आपल्याला सरळसेवा ची एक सुद्धा परीक्षा पारदर्शक घेता आली नाह���ये. महापरिक्षा पोर्टल पासून ते आता tcs ibps पर्यंत सर्व घोटाळे बाज कंपन्यांना काम भेटले आहे.
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचे खरे वाटोळे 2014 पासून सुरू झाले हे सर्वांना माहीत आहे. याला सरकारचे खत पाणी नक्कीच आहे त्याशिवाय चौकशी होत नाही. जिथे गुन्हे नोंद झाले आहेत तिथे पुढचा तपास होत नाही. आपण विधिमंडळ मध्ये सांगितले होते आमच्या काळात पेपर फुटीचे 48 गुन्हे नोंद आहेत त्या गुन्ह्याचा तपास कुठ पर्यंत आला याची चौकशी करा तुम्हाला कळेल तुमचा विभाग कस काम करतोय. जे आरोपी आम्ही पकडुन दिले किंवा सापडले त्यापुढे कोणताच आरोपी नवीन पकडला नाहीये. झीरो तपास झालेला आहे बघा जरा तुम्ही यात तुम्ही पण सहभागी आहेत अशी शंका आता विद्यार्थ्यांना येत आहे. एक निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्रास लाभलेला आहे अशी चर्चा सध्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सुरू आहे. तुम्हाला झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडा ही नम्र विनंती.
यावर बघा विचार करा घोटाळा झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे काही करता आले तर बघा लाजत गाजत यावर SIT बसवा मुख्यमंत्री साहेब.
@CMOMaharashtra @DGPMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @BJP4India @RRPSpeaks @INCHarshsapkal @AUThackeray @abpmajhatv @LoksattaLive @GondaneDevesh
90च्या दशकापासून सतत डोंगर, दऱ्यात, वाड्या वस्तीवर जाऊन आपण सांगत होतो की कलेक्टर व्हा! कमिश्नर व्हा! तर आणि तरच आपली प्रगती होईल ... आज ते आपण सांगत होतो ते सत्यात खरं होताना दिसत आहे यांचा सार्थ अभिमान आहे.
उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला तरी या सत्काराची सर नाही!
या व्हिडिओच्या फ्रेम मध्ये जे दिसत आहे ती प्रत्येक गोष्ट अस्सल आहे.
सत्कारमूर्ती, स्टेज, पाहुणे आणि सन्मान चिन्ह पगडी घोंगडी !
IPS बिरदेव सिद्धाप्पा ढोणे! बिरोबाच्या नावाने चांगभलं!
जय मल्हार ! जय भारत !!
भविष्याची गुंतवणूक सरकारसाठी खर्च का वाटत आहे?
एकीकडे समाजातील सर्व घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे आणि संशोधनाला चालना मिळावी यासाठी सरकारने सारथी आणि महाज्योती यासारख्या विविध योजना सुरू केल्या. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने यांचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. उच्च शिक्षणाच्या वाटेवर असलेल्या बहुजन समाजातील मराठा, कुणबी, ओबीसी, ��टके, विमुक्त, एसबीसी प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी संघर्ष करावा लागत आहे हे दुर्दैवी आहे.
शासनाने संशोधक विद्यार्थ्यांची तटवलेली फेलोशिप आणि नोकरी न करण्याची घातलेली अट यामुळे संशोधन कसे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर असून संशोधनाला लागणारी पुस्तके, साहित्य, बाहेरगावी राहण्याचा, प्रवासाचा खर्च विद्यार्थ्यांना स्वत:च्या खिशातून करावा लागत आहेत. त्यामुळे ��िद्यार्थ्यी दुहेरी संकटात सापडले असून त्यांची अर्थिक अडचण आणि त्यातून आलेले नैराश्य या��ा सर्वोतोपरी सरकार जबाबदार आहे.
शिक्षण ही समाजासाठी गुंतवणूक असते पण सरकारसाठी ती खर्च वाटत असून हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अधिकारी म्हणत आहेत निधी नाही, अर्थमंत्र्यांना विद्यार्थ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नाही, व्यवस्थेला भान नाही आणि घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नाही. शिक्षण आणि सामाजिक न्याय विभाग कोणत्या धोरणानुसार चालतेय, हेच कळेनासं झालं आहे. सरकार संशोधनाला गती देत आहे की शिक्षणाचा आणि संशोधनाचा गळा घोटत आहे यात स्पष्टता नाही.
@AjitPawarSpeaks @SanjayShirsat77 @mahasjsa
आपण वारंवार मागणी करूनही आणि मंत्रिमंडळात सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व ठरले असले तरी अन्य संस्थांच्या तुलनेत ओबीसी महामंडळ, महाज्योती या संस्थांना होणारे निधी वाटप असमान आहे. आकडेवारीसह हा मुद्दा सविस्तरपणे आज सभागृहात मांडला आणि निधी वाटपात समानता आणण्याची, तसेच ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
#MahaBudgetSession2025 #maharashtra #अर्थसंकल्पीय_अधिवेशन
महाज्योतीचे संशोधक ���िद्यार्थ्यांना फेलोशिपची रक्कम देण्यात भेदभाव. पीएच.डी नोंदणी दिनांक पासून विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित. का..!!
विद्यार्थ्यांना लवकर न्याय मिळावा ही मायबाप सरकारकडे अपेक्षा...
महाज्योती चे विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत....
मायबाप सरकार आपण महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना केव्हा न्याय देणार
एकाच जीआर मधून निर्णय एक..
मग दोन संस्थांना नोंदणी दिनांक पासून 100 टक्के फेलोशिप मिळाली. तर महाज्योती संस्थेच्या विद्यार्थांना वर अन्याय का🙏🏻