@SiddharthKG7 लोकसंख्या घनतेच्या बाबतीत बिहार, प. बंगाल, केरळ आणि उ. प्रदेश ही राज्ये सर्वात पुढे आहेत. इथल्या राज्य सरकारांनी लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष देणे आवश्यक आहे.
@PallaviDes88155 सहमत! @drmbct यांच्या कर्मचाऱ्यांना भारताची विविधताच मान्य नाही. सरकारी कर्मचाऱ्यांकडून अशी अरेरावी शोभत नाही. सदर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.
@mybmcWardS@mybmc भांडुप पश्चिमेकडील शिवाजी नगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ असलेल्या मनपा शाळेत बाजूच्या चाळीतील घरांना लागून असलेली काही झाडे खूप मोठी झाली आहेत, पावसाळा येण्यापूर्वी या झाडांची छाटणी करण्यात यावी, ही विनंती.
पश्चिम रेल्वे देशातील सर्व भाषा आणि आपल्या सर्व प्रवाशांचा सन्मान करते व विविधतेत एकतेवर विश्वास ठेवते.
आमच्यासाठी सर्व धर्म, भाषा, प्रदेशातील प्रवासी समान आहेत, त्यांना उत्तम सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे.
वरील विषयाची चौकशी केली जाईल आणि काही दोष आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.