मित्रानो,Tweetsचा महापूर येऊ द्या आज.
मागणीची तीव्रता दिसण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.objective patternपुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येकाने tweet टाका.Account नसेल तर नवीन काढा.
18 october
10 AM to 12 PM ..
@Objective2027@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil
गेल्या पाच-सात दिवसांपासून या मुलांसोबत दिवसरात्र वेळ घालवतोय. त्यांच्याशी बोलताना, गप्पा मारताना त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या संघर्षाचा जवळून अनुभव घेता येतोय.
ही मुलं कुठल्या परिस्थितीतून येतात, कशा पद्धतीने अभ्यास करतात, किती स्वप्नं घेऊन या परीक्षेची तयारी करतात, हे जवळून पाहताना खूप काही शिकायला मिळतंय.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जेवणाची, पाण्याची व्यवस्था करताना कधी ही मुलं आपली झाली, हे कळलंच नाही. आज त्यांच्यासोबत बसून, त्यांच्या घासातला घास खाताना एक वेगळंच समाधान मिळतंय.
हा केवळ आंदोलनाचा अनुभव नाही, तर या मुलांशी जोडल्या गेलेल्या एका नात्याचा आणि आयुष्यभर लक्षात राहील अशा अनुभवाचा भाग आहे.
आमचे मित्र विजय सर यांची (राज्यात 4 था )Drug Inspector पदी निवड झाल्याबद्दल आणि कंबाईन Group B Pre मध्ये 90 🙄🙄 मार्क्स मिळाल्याबद्द हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🔥🌺💐🎁💫💫
#Drug_Inspector#mpsc_पेपरफुटी
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे उभा आहे हा विश्वास दिला.
सहा युवक गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. सरकार नमत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचे सामर्थ्य ते दाखवत आहेत. त्यांचे कौतुक झालेच पाहिजे. MPSC परीक्षेत घोटाळे होतात हे विद्यार्थ्यांना माहितच नव्हतं. पण पेपर लीक होण्याचे पुरावे बाहेर यायला लागले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला झटका बसला. खेड्यापाड्यातून मुलं MPSC ची तयारी करण्यासाठी शहराकडे येतात. कर्ज काढून मुलं, त्यांचे पालक या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पाठवतात.
तुम्हा सर्वांची मागणी न्याय्य आहे. परीक्षा पारदर्शी झाली पाहिजे, ज्यांच्या काळात हा गैरव्यवहार झाला त्या अध्यक्षांचा पायउतार झाला पाहिजे अशा माफक मागण्या तुमच्या आहेत. मला आश्चर्य वाटते आहे की, मुख्यमंत्री अध्यक्षांमध्ये इतके का गुंतले आहेत? दिल्लीत विद्यार्थ्यांच्या प्रचंड मोठ्या दबावानंतर प्रधानानांचा राजीनामा घ्यावा लागला. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करणे गरजेचे आहे. आम्ही १५ वर्षे सत्तेत होतो पण कधी MPSC चे पेपर फुटले नाही. त्या काळात आई वडील विश्वासाने मुलांना पाठवायचे. मात्र आज सामान्य नागरिकांचा सरकारी व्यवस्थेवरून विश्वास उडालेला आहे.
अद्याप पेपरफुटीवर चौकशी करण्यासाठी SIT नेमलेली नाही. परीक्षेत पारदर्शीपणा आणा इतकी साधी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. बेरोजगारी प्रचंड वाढत आहे, परदेशी गुंतवणूक कमी होऊ लागली आहे, खाजगी उद्योग केंद्रित होत आहेत. त्यामुळे या स्पर्धा परीक्षा मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. कष्टाचे फळ मिळेल हे स्वप्न घराघरात बघितले जात होते. मात्र हे स्वप्न भंग करण्याचे काम सरकारी व्यवस्था करत आहेत.
तुमच्या या आंदोलनास प्रतिसाद देत येत्या २-४ दिवसांत सरकार MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेतील, SIT नेमतील अशी अपेक्षा आहे. जर तसे झाले नाही तर विधासभेत यासाठी आवाज उठवण्याचे वचन तुम्हाला देतो. लोकं जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा राज्यकर्त्यांनी शहाणे व्हायचे असते, लोकं ठिय्या मांडून बसतात तेव्हा त्याची नोंद घेऊन ताबडतोब कारवाई केली पाहिजे. पण असा आडमुठेपणा जर केला तर आम्ही प्रखर विरोध केल्याशिवाय राहणार नाही.
#MPSCProtest #Pune #studentsunite
महाराष्ट्र के छात्र फडणवीस सरकार की शिक्षा व्यवस्था और अन्याय से त्रस्त हैं।
आदिवासी छात्र अपनी माँगें लेकर मुंबई पहुँचे - कुछ बस से, और कुछ पैदल चलकर।
उनकी माँगें क्या हैं? आदिवासी आश्रमशालाओं और छात्रावासों में बुनियादी सुविधाएँ। छात्रवृत्ति। वही चीज़ें जो किसी भी बच्चे का हक़ हैं।
मुंबई में रुकने की जगह नहीं थी, तो कांग्रेस ने उन्हें तिलक भवन में ठहराया। और आज सुबह होने से पहले - पुलिस कांग्रेस कार्यालय के अंदर घुसी और इन बच्चों को उठाकर ले गई। आज़ाद मैदान पर प्रदर्शन शुरू होने से पहले ही। जो बच्चे नासिक से पैदल चलकर आए, उनको ये जवाब मिला।
उधर पुणे में MPSC के अभ्यर्थी सत्याग्रह पर बैठे हैं। ये माँगें नई नहीं हैं - मैंने मुख्यमंत्री फडणवीस से इन पर बात की थी। तब कुछ नहीं हुआ। इसीलिए आज ये बच्चे सड़क पर हैं।
मैं और कांग्रेस पार्टी महाराष्ट्र के छात्रों के साथ खड़े हैं। हम एक इंच भी पीछे नहीं हटेंगे।
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी, हक्कांसाठी आणि भवितव्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत आम्ही राहुलजी गांधी यांना विनंती करणार आहे की, त्यांनी पुन्हा एकदा पुण्यात यावे आणि MPSC विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की राहुलजी गांधी विद्यार्थ्यांची ही विनंती नक्कीच ऐकतील आणि त्यांच्या न्याय्य लढ्याला ठाम पाठिंबा देतील.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सहन केला जाणार नाही!